Thursday, 12 May 2022

पुण्यसंचय

तुमचे सद्गुरु एका ठराविक मर्यादेपर्यंत तुम्हाला मदत करतात. त्या मदतीसाठी ते तुमच्याच #विधिलिखितामधील_पुण्यसंचय, तुमची #सश्रद्धता आणि तुमची #साधना याचा इंधन म्हणून वापर करतात. त्यासाठी ते अनेक Permutations and combinations वापरुन बघतात. दुसरीकडे तुम्हाला स्वयंपूर्ण, बलवान आणि सकारात्मक होण्याची प्रेरणाही देत असतात. परंतु तुमचं होतं काय की सातत्याने आणि आयत्या मिळालेल्या मदतीने तुम्ही तद्दन आळशी आयतोबा झालेले असतात. आपली औकात नसतानाही काही वेळा अनपेक्षितपणे मिळालेल्या मदतीने कृतज्ञतेसोबत तुमच्यात थोडा मंदपणा आणि आळशीपणा आलेला असतो....

एका certain point ला सद्गुरुही थकतात. कारण, तुम्ही कृतीशुन्य झालेलं त्यांना खपत नाही. आणि मदतीचा प्रवाह आटू लागतो. "आतातरी उठ आणि कामाला लाग" हा शेवटचा संदेश येतो. तोही इग्नोर करुन तुम्ही भक्ती, जपजाप्य आणि नामस्मरणाची वेळकाढू आणि पळवाटी ढोंगे सुरु केली की सद्गुरुंना क्षणभर बाजूला जायला सांगून नियती शनीमहाराजांच्या मदतीने ढुंगणावर इतकी सणसणीत लाथ घालते की पार्श्वभाग चोळायचीही फुरसत मिळत नाही आणि माणूस विचित्र भानावर येतो....

#गुरुंनाही_मर्यादा_असते
#कार्यप्रवृत्त_व्हा
#आळस_झटका
#आध्यात्म_ही_पळवाट_नाही

- सतीश गडकर

Privacy Policy

  Privacy Policy This privacy policy applies to the Gorakshsamruddhi app (hereby referred to as "Application") for mobile devices ...