क्षमता
आज आम्ही जे सांगणार आहोत ते खूप महत्वाचे आहे.. होय आज आम्ही क्षमतेवर बोलणार आहोत.. कोणतेही कार्य करायची इच्छा असणे एक पण ते करायची क्षमता असणे ही भिन्न गोष्ट आहे..
हे सांगण्यामागचा उद्देश हाच की आज आम्ही जो हा पंथ निर्माण केला आहे त्याचा विस्तार होण्यासाठी आपल्यात ती इच्छा तसेच क्षमता विकसित होणे गरजेचे आहे..
आजवर अनेकांना अनेक साधना सांगितल्या पण याहीपेक्षा निवडक साधक सोडले तर कोणीही पंथ वाढीच्या दृष्टीने केलेले प्रयत्न हे अत्यंत क्षुल्लक आहेत.. विस्तृतपणे सांगायचे झाले तर इच्छा आणि क्षमता हेच कार्यसिद्धी साठीचे मूलमंत्र आहेत.. त्यावर जो चालेल तो यशस्वी होईलच तसेच आमच्या कृपेस आजन्म पात्र राहील.. आम्हाला हे विशेष नमूद करावेसे वाटते की सर्वांना आम्ही समान समजतो म्हणजेच आमच्या दृष्टीने सर्वांची क्षमता सुद्धा सारखीच होती.. पण आमच्या विचारांवर चालणे याची इच्छा व क्षमता विकसित करण्यासाठी मेहनत घेणे गरजेचे आहे.. कोणी कधीही आम्हाला विचारले नाही की आमची क्षमता किती आहे? काहींनी ती सिद्ध केली तर काहींनी पूर्ण दुर्लक्ष केले.. कोणासही आम्ही क्षमतेबाहेर काम सांगितले नाही.. पण जितके ती पूर्ण करायची इच्छा होती तितकेच ते पूर्ण झाले.. काहींनी तर ' ओम दुर्लक्षाय नमः' चाच जप घेतला.. पण ज्याअर्थी आम्ही गुरुपद घेतले त्याअर्थी आम्ही आमचे वचन तोडले नाही.. प्रारब्धाच्या वेढ्यात जे अडकले त्यांच्यापण पाठीशी आम्ही उभे राहिलो.. आजवर महामारीने एवढे हातपाय पसरूनही आम्ही कोणावर दुर्लक्ष नाही केले..
पण मग आमचे कार्य प्रसारासाठी व विस्तारासाठी सर्वांचा आग्रही पुढाकार का नाही?
आजवर ज्यांना आम्ही लिखित स्वरूपात काही सांगितले त्यांनी पुढील आदेश कधी हे पण आम्हाला नाही विचारले.. सर्वजण हे स्व मध्ये जास्त गुंतले आहेत.. यातून बाहेर या... कार्यविस्तार करा.. पंथ वाढवा.. एवढे सारे मन्त्र आम्ही निर्मिले पण मोजकेच तुम्हाला दिले याचा कधी कोणाला प्रश्न नाही पडला.. रोज एक मंत्र मिळाला तरी आयुष्य संपेल पण मंत्र नाही.. त्यात गुरुमंत्र हा सर्वश्रेष्ठ आहेच... त्यात वाद नाही..... पण बाकी प्रगती व विकास च्या दृष्टीने साधना व आत्मज्ञान सुद्धा गरजेचे आहे..
दाता व याचक या मध्ये आम्ही दाता होतो पण दाता कडे किती आहे आणि आपल्याकडे किती आपण सामावून घेऊ शकतो याचा नुसता विचार न करता क्षमता वाढवा.. सेवा करा .. मग बघा ती याचकाची झोळी कशी भरभरून वाहते... आणि याचसाठी नवनवीन सेवेच्या इच्छा विकसित करा.. तसेच आम्ही सांगितलेल्या प्रसार कार्यात एकजुटीने सहभागी व्हा.. जो मागे पडला तो मागेच राहू शकतो.. तेव्हा तुमच्यातील स्वार्थी पणा जो आजवर काही ठिकाणी दिसला तो नाथकार्याला समर्पित करा.. आमचे आशीर्वाद आहेतच .. आज एवढेच..
*प्रसन्न कुलकर्णी*