एक विशिष्ट वेळ झाली की प्रत्यक्ष भगवंत आपली काळजी घ्यायला सुरवात करतो ती कुठल्याही प्रकारची असू शकते आपल्या कडून साधना करून घेणे पासून ती साधना त्या देवते पर्यंत पोहचविण्याचे कार्य आपले आरध्य करत असते, फक्त आपला आपल्या सत गुरुं वर असलेला विश्वास खूप महत्वाचा आहे तो जरा जरी कमी नको व्हायला हे लक्षात असू द्यावे.
अनेकांना साधनेत अनुभव येत नाही, साधना आपण कशासाठी करतो आहोत ते पण यात महत्वाचे आहे
विशिष्ट कारणासाठी केलेली साधना अनुभव शून्य असू शकते. काहींना साधना करताना आधी अनुभव येऊ लागतात मग काही दिवसांनी अनुभव येणे बंद होते आणि मग साधना बंद होते असे करू नये, अनुभव आले किंवा नाही साधना खंडित होऊ देऊ नये.
साधना खंडित झालेली साधना दैवतेला आवडत नाही तेवढी काळजी आपण नक्की घ्यावी.
काही स्वार्थ न ठेवता जी साधना आपण करतो ती साधना आपल्याला अनुभव देते .
नमो आदेश . एकदम योग्य शब्दात विचार मांडला आहे. धन्यवाद
ReplyDeleteDhanyavad
ReplyDelete