Friday, 20 February 2026

मूलांक 1 ( driver 1)

 रूप: मूलांक 1चे स्वरूप सरळ रेषा आहे. सरळ रेषा हे सशक्त आणि सुदृढतेचे प्रतिक. मूलांक 1च्या व्यक्ती शारीरिकदृष्टय़ा सक्षम असतात. सूर्यासारख्या तेजस्वी असतात. सहज आकर्षण शक्ती यांच्यात दिसते. 

 
स्वभाव: व्यावहारिक, मिळूनमिसळून वागणे असा यांचा स्वभाव आहे. पण सगळ्यांशीच ते असं वागत नाहीत. नेहमीच उत्साही असल्याने आजूबाजूचं वातावरणही उत्साही ठेवतात

व्यक्तिमत्त्व: दूरदर्शी आणि सुहृदयी असतात. सार्वजनिक कार्यात मग ते रंगमंच असो वा राजकारण, आपली विशेष छाप सोडण्यात यशस्वी होतात. जितके सामाजिक तितकेच कौटुंबिकही असतात. उच्च विचार, प्रबळ इच्छाशक्ती, कृतज्ञ, दिलेला शब्द पाळणारे आणि नि:स्वार्थीपणे सहाय्य करणारे असे हे व्यक्तिमत्त्व आहे. 
 
गुण: नेतृत्त्व गुण यांना सूर्यानेच प्रदान केलेला आहे. सतत प्रगतीशील असतात. कितीही अडचणींचा सामना करावा लागला तरी पुढे जाण्याचाच सतत विचार करतात. परिणामांचा प्रथम विचार करून मग कृती करतात. 
 
अवगुण: कधी रुक्ष स्वभाव आणि कटु भाषेचा प्रयोग केल्याने या व्यक्ती मैत्रीपूर्ण संबंध आणि शुभचिंतकांना दुरावतात. फार काळ कोणत्याही गोष्टीबाबत गुप्तता राखू शकत नाहीत. निडरपणा हानिकारक ठरतो.

मैत्री, प्रेम आणि विवाहासाठी भाग्यशाली अंक: ज्या व्यक्तींचा जन्मदिवस 1,2,7,10,11,16,19,20,25,28 आणि 29 असेल त्या व्यक्ती या मूलांकासाठी भाग्यशाली आहेत. यांच्याशी असलेले संबंध दीर्घकाळ टिकून राहतात. या व्यक्तींशी संबंध ठेवल्यास मूलांक 1च्या व्यक्तींना सुखशांती आणि आनंद मिळतो. मूलांक ४ या व्यक्तींसाठी शुभ आहे. 

शुभ रत्न: या मूलांकासाठी माणिक रत्न शुभ आहे. ५ कॅरेटपेक्षा अधिक वजनाच्या सोने किंवा तांब्यातील या रत्नास रिंग फिंगरमध्ये धारण करावे. 

  • तृत्व गुण: हे लोक स्वतःचे काम स्वतः करायला आवडतात आणि नेतृत्वाची भूमिका घेतात 
  • आत्मविश्वास आणि जिद्द: स्वभावाने आत्मविश्वासी, दृढनिश्चयी आणि कष्टाळू असतात 
  • सूर्यप्रभावी व्यक्तिमत्व: राजाप्रमाणे जगण्याची वृत्ती असते; ते स्वाभिमानी असतात 
  • बुद्धिमत्ता: निर्णय घेताना चपळ आणि बुद्धिमान असतात 
  • अहंकार: कधीकधी अति आत्मविश्वास किंवा अहंकारापायी अडचणीत येऊ शकतात 
  • शुभ दिवस: रविवार आणि सोमवार 
  • शुभ रंग: पिवळा, सोनेरी, केशरी 
  • उपाय: दररोज सकाळी सूर्याला अर्घ्य देणे आणि वडीलधाऱ्यांचा मान राखणे शुभ मानले जाते.

डेस्टिनी क्रमांक १ साठी लग्नासाठी सर्वात अनुकूल संख्या १, २, ३, ४, ५, ७, ९ आहेत. त्यांनी क्रमांक ६ आणि ८ शी लग्न करणे किंवा कोणताही संबंध ठेवणे टाळावे.जीवन मार्ग १ असलेले लोक मजबूत, स्वतंत्र आणि नेतृत्व करण्यासाठी जन्माला येतात. सर्वोत्तम करिअर: उद्योजक . व्यवस्थापक / सीईओ. चंद्र, मंगळ, गुरु, नेपच्यून आणि युरेनस हे सूर्याचे अनुकूल ग्रह आहेत. म्हणून, या ग्रहांच्या अधिपत्याखालील लोक देखील अंक १ च्या लोकांशी सुसंगत असतील. शुक्र आणि शनि हे सूर्याचे शत्रू आहेत , म्हणून अंक ६ आणि ८ हे अंक १ च्या लोकांसाठी अनुकूल नाहीत.

No comments:

Post a Comment

मूलांक 1 ( driver 1)

  रूप: मूलांक 1चे स्वरूप सरळ रेषा आहे. सरळ रेषा हे सशक्त आणि सुदृढतेचे प्रतिक. मूलांक 1च्या व्यक्ती शारीरिकदृष्टय़ा सक्षम असतात. सूर्यासारख्य...