हे तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला दिव्य अनुभव पाहिजे आहे की जे संकट आहेत, जे येतच राहणार आहेत त्यातून सुटका पाहिजेल आहे कारण दिव्य अनुभव हे काही कोणी देण्याची गोष्ट नाही मार्गदर्शन सर्व करतात पण अनुभव परमपिता परमात्मा देऊ शकतो याचं कारण असं की आपलं शरीर त्यासाठी परिपक्व झालं पाहिजे आज मी ** वर्ष झाले नाथांची सेवा करतात त्यावेळेस मला जे अनुभव येत आहेत ते शब्दात वर्णन करू शकत नाही कदाचित त्या अनुभव तुम्हाला दोन वर्षात येतील पंधरा वर्षांतील किंवा तीस वर्षे लागते परंतु ज्या वेळेस ते अनुभव तुम्ही घ्यायला सुरुवात करालं ज्यावेळेस कुंडलीने तुमची शुद्ध व्हायला सुरुवात होईल ते दिव्य अनुभव तुम्ही कोणाला सांगू शकणार नाही त्याचं वर्णन शब्दांमध्ये करता येणार नाही पण त्यासाठी मी काय केलं हे एका शब्दात सांगू शकतो ते म्हणजे माझं शरीर परिपक्व केलं असंख्य मंत्र, असंख्य जप , असंख्य मी हवन केले आकडेवारी सुद्धा मला सांगता येणार नाही आजकालचे दोन-तीन जप करतात आणि त्यानंतर शरीरावरती त्यांच्या बर्डन येतं प्रेशर येत त्यांना सुचत नाही की हा माझा मंत्राच्या बरोबर चालू आहे का नाही चालू आहे ते आणि मग मंत्र सोडून देतात आधी ठरवत नाही की नक्की मला काय करायचं आहे पैसा पाहिजे की अध्यात्मिक प्रगती पाहिजे
अध्यात्मिक प्रगती आणि पैसा याचा काही संबंध नाही अध्यात्मिक प्रगती ही कुठल्याही प्रकारच्या संकटांमध्ये तुमचा धैर्य सुटू देत नाही कुठल्याही प्रकारच्या दारिद्र्यामध्ये आता दारिद्र्याचे उदाहरण भरपूर आहेत त्याविषयी आपण येथे काही सविस्तर चर्चा करणार नाही परंतु कितीही प्रकारचा दारिद्र्या तरी आलं तरीसुद्धा तुमचं जे मन आहे ते खंबीर ठेवण्याचं काम आध्यात्मिकता तुमची सेवा साधारण करते कुठल्याही प्रकारचं चा जो ग्रह आहे त्या ग्रहाची जेव्हा महादशा सुरू असते तेव्हा तो ग्रह तुमच्या कुंडलीमध्ये नीच असेल किंवा चांगले फळ देत नसेल तर साधना सेवा केल्याने ते ग्रह सुद्धा चांगले फळ द्यायला प्रवृत्त होतात त्याचं कारण असं आहे मंत्राचा तुम्ही जप करतात त्याच्यातून जे स्पंदन निर्माण होतात ते स्पंदन तुमचा चक्र तुमचा ओरा तुमच्या सभोवताची परिस्थिती शुद्ध करण्याचं काम करतात परंतु त्यावेळेस काय होतं जसं फुलाचा सुगंध असा दरवळतो इकडे तिकडे, तसा साधना करणाऱ्या व्यक्तीचा सुगंध सुद्धा इकडे तिकडे द्रवळायला लागतो आणि मग त्याला जवळ घेतात त्या वासना त्या वासनांच्या तावडीतून तो व्यक्ती जसा जसा सुटेल तसा तसा तो पुढे जातो यामध्ये साधना खंडित सुद्धा होते ती परत सुरु करावी लागते आपण काही कोणी संन्यासी नाही की आपल्याला कुठलाही टेन्शन नाही आपल्याला सकाळी उठून कुठे जायचं नाही तर भगवंताची आराधना करायची आहे असे आपण नाही आपण गृहस्थी आहोत आपल्याला सर्व प्रकारचे कर्म करून गृहस्थाश्रमाचे जे कर्म आहेत ते सर्व कर्म करून आपल्याला आध्यात्मिक उन्नती साधायची आहे.
गोरक्षनाथार्पणमस्तु
No comments:
Post a Comment