Sunday, 31 March 2024

योग मार्ग २ (yog marg)

साधना केल्यानंतर देह आणि इंद्रिये स्थिर होतात. प्राणस्पंदन स्थिर क नियमीत होते. चित्तवृत्तीचा निरोध होतो. आणि मग निर्मल निस्तरंग विषयसंग रहित, आत्मसमाहित अंतःकरणामध्ये स्वयंप्रकाशी आत्म्याचे स्वरूप प्रकाशित होते. हाच मोक्षप्राप्तीचा उत्तम उपाय आहे.

ज्ञानी लोक असे सांगतात की, विषयाचे अनित्यत्वादी दोष पाहिल्यानंतर, मनात असा विचार निर्माण होतो की, ह्या दृश्य जगताशी आत्म्याचा काडीचासुद्धा संबंध नाही. तसा दृढ निश्वय सुद्धा होतो. चित्त स्वभावतःच विषयविमुख होने. अगदी प्रशांत होते, कर्मप्रवृत्ती नष्ट होतात, आणि इंद्रिये स्थिर बनतात. देह, इंद्रिये, मन यांत मूलतः बासना वास करते आणि वासनेचे मूळ अज्ञानात आहे. अज्ञान हेच सर्व अनर्थाचे मूळ आहे. अज्ञानाची निवृत्ती झाली की, सर्व प्रकारच्या चंचलतेची निवृत्ती होते. त्यासाठी योगिक प्रक्रियेचे विशेष प्रयोजन ठरत नाही.

आत्मविषयक श्रवण, मनन आणि निदिध्यासन यांच्यामुळे आत्मस्वरूपाचे अपरोक्ष साक्षात्कार होतो. माया आणि मायेमुळे निर्माण झालेले सारे पदार्थ याविषयी वैराग्य उत्पन्न होते. आत्मध्वरूप प्राप्त झाल्यामुळे मायेपासून तो मुक्त होतो.

दोन्ही मार्गाचे मत असे आहे की, आत्मा स्वभावतःच शुद्ध आणि मुक्त स्वभावाचा आहे. प्रकृतीचे अथवा मायेचे गुण दोष आत्म्यावर आरोपिले जातात. आणि आत्म्याला बद्ध करण्याचा प्रयत्न केला जातो. आत्म्याला यथार्थ स्वरूपाची उप- छब्धी करून दिली की, मुक्तीचा लाभ होतो. हीच मुक्ती, दोन्ही मार्गांचे लक्ष्य आहे. परंतु त्यांची साधनप्रणाली ही वेगवेगळी आहे. साधनप्रणाली वेगवेगळी असली तरी दोन्हींचे साध्य एकच आहे.

No comments:

Post a Comment

Privacy Policy

  Privacy Policy This privacy policy applies to the Gorakshsamruddhi app (hereby referred to as "Application") for mobile devices ...