Sunday, 31 March 2024

योग मार्ग - १ (yog marg)

अगदी प्राचीन कालापासून परमार्थनिष्ठ मुमुक्षूना, मोक्ष प्राप्तीसाठी दोन मार्ग उपलब्ध आहेत. एक ज्ञानमार्ग आणि दुसरा योगमार्ग. ज्ञानमार्ग हा तात्त्विक विचारांचे उत्तम साधन आहे. शास्त्राच्या सहाय्याने त्या मार्गाने स्थूल आणि सूक्ष्म, ऐहिक आणि पारमार्थिक विषयांचे अनित्यत्व, अशुचित्व, दुःखकरत्व आणि मोहजनकत्व वगैरे दोष आणि त्याचप्रमाणे आत्म्याचे नित्यत्व, असंगत्व, निष्क्रियत्व, सुखदुःखादीविहिनत्व, कार्यकारणातीत्व, सत्यज्ञानस्विरूपत्व वगैरे गुणांची पर्यालोचना करून, विषयसंपर्क - त्वजनपूर्वक चित्ताला आत्मस्वरूपात अथवा ब्रह्मस्वरूपात समाहित करणे ह। ज्ञानमार्गाचा मोक्षप्राप्तीचा उत्तम उपाय होय. योगीलोक सांगतात की केवळ विचारद्वारा वैराग्याची प्रतिष्ठाही होते, आणि परमतत्त्वात स्थितीपण प्राप्त होत नाही. जोपर्यंत प्राणाचे स्पंदन अनियमीतपणे चालू आहे- देह आणि इंद्रिये अस्थिर रहातात अंतःकरणात वृत्तीचे तरंग उठतात, अर्थात् जोपर्यंत इच्छाशक्तीचा प्रभाव प्राणावर, देहावर, इंद्रियांवर स्थैर्य संपन्न करीत नाही, चित्ताचा निरोध करू शकत नाही, तोपर्यंत वासनांचे निर्मूलन होण्याची शक्यता नाही. चित्ताची चंचलता दूर होणार नाही. अंतःकरण आत्मस्वरूपात समाहित होणार नाही. आणि त्यामुळे मोक्षप्राप्तीसुद्धा होण्याची सुतराम शक्यता नाही.

म्हणूनच यम-नियमांचे महाव्रत आचरायला हवे. अनुष्ठानाने देह आणि इंद्रियांचे दमन करायला हवे आणि आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment

Privacy Policy

  Privacy Policy This privacy policy applies to the Gorakshsamruddhi app (hereby referred to as "Application") for mobile devices ...