श्री कृष्ण पाहत असताना भगवान भोलेनाथ शिव जेव्हा बाल कृष्णा चे दर्शन करण्यासाठी येतात तेव्हा यशोदा त्यांना दर्शन घेऊ देत नाही कारण यशोदे ला वाटते की हे कोणी मायावी आहेत.
तेव्हा ते यशोदे ला सांगतात की आम्ही कैलास हून आलो आहे
तेव्हा यशोदा देवी म्हणतात की जर येवढ्या लांबून आले आहात तर तिकडे शिवाच दर्शन घ्यायचं होत एवढ्या लांब येऊन माझ्या बालकाचे दर्शनाचा हट्ट का करतात.
तेव्हा प्रत्यक्ष शिव जे एक जोगी बनून आलेले आहे ते म्हणतात,
की भगवंताचे दर्शन घेणे खूप सोपे आहे परंतु भगवंताने जो अवतार धारण केला आहे त्याचे दर्शन घेणे खूप अवघड आहे. आणि तो अवतार म्हणजे आपले सतगुरू हेच समजावे.
परम पिता परमात्म्याच्या अवतारी देहाचे दर्शन घेतल्यावर अनेको प्रतीचा आनंद प्राप्त होतो.
आपल्या सभोवताली सुद्धा अनेक सिध्द जपी तपी आहेत जे भगवंताचे अवतारी अंश आहेत की ज्यांच्या केवळ दर्शन मात्रेने आपले अनंत जन्माचे पाप नष्ट होऊन मोक्ष प्राप्ती होते परंतु आपल्याला ती दृष्टी नसल्याने आपण ते पाहू शकत नाही.
परंतु आपल्या शुद्ध अंतःकरणाने त्यांचा शोध घेण्याचा नक्की प्रयत्न करावा
कोणाचे मन दुखवू नये, कोणावर रागावू नये, अधिकार गाजवू नये नाहीतर अहंकार प्राप्त होऊन अधोगती होते.