Sunday, 16 July 2023

सकाम साधना - प्रसन्न कुळकर्णी

 सकाम साधना 


साधना साधारणपणे दोन वर्गात विभागली जाते. एक म्हणजे निष्काम साधना आणि दुसरी सकाम साधना. निष्काम साधना म्हणजे कोणतीही मागणी, विचार, अडचण इ. डोक्यात न ठेवता केलेली साधना तर सकाम साधना म्हणजे विशिष्ट हेतू साठी केलेली साधना.. आज आपण सकाम साधने वर बोलू. 

सकाम साधना करताना विशिष्ट संकल्प घेऊन आपण ती करत असतो म्हणजे काय तर आपली एखादी अडचण सुटावी म्हणून आपण साधना दैवतला विनंती करत असतो. तर ही साधना करताना काही गोष्टी आपण पाळायला हव्यात. ही साधना सर्वप्रथम समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचा योग्य विधी आणि त्याचे परिणाम सुद्धा समजून घेणे गरजेचे आहे. फलप्राप्ती होण्यासाठी साधना करायला दिलेली वेळ, नैवेद्य इ. अनेक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. त्या साधने आधी दिलेले न्यास सुद्धा करणे गरजेचे आहे आणि त्यासोबतच त्या दैवताला बोलवण्याआधी कोणत्या कोणत्या दैवतांना आवाज द्यायचा असतो तेपण समजुन घेणे गरजेचं आहे. या सर्व गोष्टी प्रामुख्याने पाळल्या गेल्या तर आपल्याला अपेक्षित फलप्राप्ती लवकर होते. साधना कोणतीही असो मंत्रचा उच्चार योग्यच असावा. 


या सर्व गोष्टींच्या व्यतिरिक्त एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण त्या दैवताला संकल्पात आपलं काम सांगितलेलं असत तर ते काम कोणत्या प्रकारे ते दैवत करत यावर त्या दैवताला आपण मार्गदर्शन करायची काहीच गरज नाही. आपल काम फक्त योग्य संकल्प घेणे व साधना योग्य प्रकारे करणे एवढच आहे. त्याच्या फलप्राप्तीचे नियोजन साधना दैवत स्वतःहून करते. त्यात कोणत्या पद्धतीने फलप्राप्ती व्हावी हा आपल्या विचारांचा मुद्दा होऊच नाही शकत.

उदाहरण द्यायचं झालं तर पैसा मिळावा म्हणून समजा एखादी साधना केली तर तो कोणत्या स्वरूपातून मिळावा यावर आपण विचार करू नये. साधना दैवतने अपेक्षित असलेला संकल्प केलेला पैसा हा कोणाच्याही माध्यमातून पाठवला तरी त्याचा स्वीकार करावा. त्यात अमुक मार्गानेच पैसा यावा असा विचार करू नये. 

सकाम साधना ही गुरू मार्गदर्शनाच्या आधारावरच सुरू करावी आणि थांबवावी. 


प्रसन्न कुळकर्णी

1 comment:

  1. मला या साधना शिकायच्या आहेत कृपया मार्गदर्शन कराल

    ReplyDelete

श्राद्ध न करनेसे हानि

अपने शास्त्रने श्राद्ध न करनेसे होनेवाली जो हानि बतायी है, उसे जानकर रोंगटे खड़े हो जाते हैं। अतः आद्ध-तत्त्वसे परिचित होना तथा उसके अनुष्ठा...