Saturday 22 July 2023

तिथी आणि साधना भाग -1

तिथी आणि साधना भाग -1
आपण जी साधना करतो तिचा आणि तिथीचा कसा थेट संबंध आहे ते आज पाहू. सुरुवात अमावस्या तिथी पासून करू.. 
बरेचदा उग्र देवतांच्या साधनेची सुरुवात अमावस्या पासून करायला सांगितली जाते.. याच कारण हेच आहे की अमावस्येला चंद्रबळ नसते.  चंद्रबळ नसणे आणि उग्र साधना दैवत यांचा थेट संबंध आहे.  चंद्रबळ हे सौम्यतेच प्रतीक आहे. चंद्राचा प्रकाश हा शीतलता देतो. त्यामुळे अमावस्येला त्याच्या अभाव असल्याने उग्रतेने किंवा अधिकच्या तीव्रतेने एखादी गोष्ट शक्य होते. उग्र साधना दैवतला दिलेला आवाज थेट पोहचतो. सुरुवातीपासूनच जर ती तीव्रता / उग्रता साधनेत आली तर प्रचंड ऊर्जा तयार होते आणि ती ऊर्जा त्या साधनेला अधिकच बळ देऊन जाते. 
चांगली सुरूवात आपल्याला अर्ध यश सुरुवातीलाच देऊन जाते असं म्हणतात. म्हणून ठराविक वेळेस ठराविक गोष्टी सुरू करायला सांगितल्या जातात.  
अनेकानेक महत्वाचे सण सुद्धा अमावस्येला असतात त्याच कारण पण तेच आहे. सूर्य हा तसाच असतो, त्याची तीव्रता तशीच असते. पण चंद्राचे बदलते स्वरूप तिथी ठरवत असते. 
भरती - ओहोटी वर ज्याप्रकारे चंद्रबळ परिणाम करते तसेच ते साधना सुद्धा नियंत्रित करते. 
या वेळी वाईट शक्तींची ताकद अनेकपटींनी वाढलेली असते, आणि त्यावर मात करण्यासाठी सुद्धा उग्र साधनेची त्यावेळेस आवश्यकता असते. काही ठराविक साधनेला किंवा कृतीला चंद्रबळची अजिबात आवश्यकता नसते म्हणून त्या अमावस्येला सांगितल्या जातात. पिढ्यन्पिढ्या काही गोष्टी अमावस्येला केल्या जातात. त्याचे सुद्धा हेच कारण आहे. उदा. पितृसाधना जास्तीत जास्त अमावस्येलाच करतात. आपण करत आहोत त्यावर पूर्ण विश्वास ठेऊन पूर्णत्वास नेणे गरजेचे असते. 


प्रसन्न कुलकर्णी

1 comment:

  1. नागमुर्तीची स्थापना नाथपंथी पद्धतीने कशी करावी.
    दि.२१-०८ -२०२३ या दिवशी साडेतीन फुटी नागमूर्तीची स्थापना
    रुद्रधाम भंडारदरा येथे करावयाची आहे.
    असा आदेश आला आहे. तरी मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
    ओम् शिव गोरक्ष
    आदेश

    ReplyDelete

श्राद्ध न करनेसे हानि

अपने शास्त्रने श्राद्ध न करनेसे होनेवाली जो हानि बतायी है, उसे जानकर रोंगटे खड़े हो जाते हैं। अतः आद्ध-तत्त्वसे परिचित होना तथा उसके अनुष्ठा...