साधना म्हणजे , साधकाला आराध्यची गोडी लागावी , आराध्य आपले आहेत ही जाणीव व्हावी, ते फक्त सेवे नि आपलेसे करता येते बाकी कुठली ही जगातील मौल्यवान वस्तू किंवा चीज त्यांना आपलंसं करू शकत नाही , जेव्हा साधना रुपी वेळ & विशिष्ट जप घेतो तेव्हा त्या देवता , साह्य होतात , साधकाचे संकट दूर करतात ही प्रथम पायरी ,16 साधना म्हणजे 16 पॉईंट शरीरातील , त्यांना सक्षम करणे *जसा पैलवान झुंजी साठी कसरत करतो तास साधक तयार होतो*
संतांनी लिहल आहे:-
सोळा सांधे बहात्तर कोठडी (72 हजार नाडी म्हणजे 72 कोठडी) हरी ने काया निर्मीयली 9 दरवाजे 10 खिडकी त्यात आत्मा रुपी मूर्ती बसवली & हा देह देवालय केला *देह देवाचे मंदिर*
जस घरात माजघर ओसरी स्वयंपाक घर शयनगृह असे भाग बनवतो त्याला घर म्हणतात तस 16 साधना रुपी खांबावर हे देहरूपी मंदिर उभारले आहेत , त्यात आराध्य विराजमान व्हावा असे वाटत असेल तर ते मंदिर रोज साफ करावं लावेल *साधनारूपी* तर देव तिथं थांबेल नाही तर ते देवालय उकिरडा होईल मग त्या देह रुपी मंदिरात , गाढव & डुकरं लोळतील , आपलं देह देवालय ठेवायचं की उकिरडा बनवायचं हे प्रत्येक साधकाने ठरवायचं
आजून एक आम्ही साधं भोळ करतो तस देव पण साधंच देतो जसा भाव तसा देव *काही लोक म्हणतात आम्हाला वेळ मिळत नाही तेव्हा आपल्या आरध्याला ही वेळ नसतो आपल्या करता, जसे ज्याचे कर्म (सेवा) तसे फळ देतो रे ईशवर तेव्हा वेळ काढा सेवा साधना करा तर सर्व सुख पायाशी लोळतील नाही तर तुम्ही काबाड कष्ट करून लोळताल*
19 02 2020
स्थळ कामाख्या
सकाळी 6 15 ते 6 58 चिंतन
खुपच छान 👏👏👏🙏
ReplyDeleteही माहिती फार महत्वाची. साधकाला आत्म परीक्षण साठी उपयुक्त अशी आहे
ReplyDeleteधन्यवाद छान माहिती दिली
ReplyDeleteखूप छान सांगितलंत तुम्ही.👌👌
ReplyDelete