Wednesday 8 January 2020

मी नंदेशनाथ - १९

विज्ञान जिथे संपते तिथे अध्यात्म सुरु होते हे निर्विवाद सत्य आहे परंतु याचा शोध घ्यायचे ठरवले तर  अध्यात्म हे निष्कर्षाचा विषय नसून अनुभवण्याचा विषय आहे. एकापेक्षा एक असे कर्मयोग, ध्यानयोग, हटयोग असे अभ्यासू विषय येथे आहे. प्रत्येक देवतेचे विविध अंग, वेषभूषा, मंत्र, साधना, प्राणायाम यात येतात, एक जन्म पुरणार नाही इतके सारे या अध्यात्मात आहे,  फ़क़्त मनशांती नसून ती दुसऱ्याला अनुभवायला देणारी चैतन्यशक्ती अध्यात्मात आहे.     

आपल्या ऋषीमुनींनी आधी अध्यात्माचा अनुभव घेतला त्यात विज्ञाण सापडले म्हणून अति चिकित्सा करू नये. काय खरे किवा खोटे हे उलगडण्यापेक्षा आपण स्वतः किती अनुभव घेऊ शकतो यावर लक्ष केंद्रित करावे. अध्यात्म हे गुपित ठेवावे कारण आपण घेतलेले अनुभव हे दुसऱ्या व्यक्तीला किती ओरडून सांगितले तरी त्याची किंमत राहत नाही आणि आपल्याला स्वतबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होतात. अध्यात्मात शक्यतो दुसऱ्याचे अनुभव वाचू नये, आपले मन प्रत्येक गोष्टींचे इतके बारीक चिंतन करत असते कि आपण तो अनुभव घेतला आहे किवा मला तो अनुभव येतो आहे असे भास आपल्याला होऊ शकतात.

स्वतला विज्ञानवादि समजणारे आपण विज्ञान आपल्याला काय देऊ शकते याची देखील कल्पना करू शकतो (अणुबॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब)  परंतु अध्यात्मात शिरलेले संत, महंत, ऋषी, मुनी यांनी आपल्याला आज पर्यंत काय दिलेले आहे हे आपल्याला माहित आहे जे सात्विक आहे ते फ़क़्त आपली सनातन संस्कृतीच आपल्याला देऊ शकते त्यामुळे आपण करत असलेल्या प्रत्येक अध्यात्मिक गोष्टीचा आपल्याला अभिमान असायलाच हवा. 


मी नंदेशनाथ - १८ साठी येते click करा.


15 comments:

  1. Mast samjun sangitly.

    ReplyDelete
  2. विज्ञान आणि अध्यात्म या दोन गोष्टी मधे माणूस शहानिशा करण्यात अडकून जातो ...जसं तुम्ही इथे मांडलं आहे अध्यत्मा ची शहनिषा करणेत न अडकता औंभव घेणे आवश्यक आहे ...

    ReplyDelete
  3. अद्वैत कळाले तर विज्ञान अध्यात्म असे मनातही येणार नाही. अनुभव किंवा अनूभूतीच्या पातळ्या वेगवेगळ्या असू शकतात मात्र एका ठराविक ठिकाणी दोन्हीही एकच असते.

    ReplyDelete
    Replies
    1. बरोबर आहे परंतु त्याची उकल करण्यात वेळ घालवू नये. नाथपंथाची कास धरावी आणि सुटका करावी.

      Delete
  4. मस्त .....✌ अध्यात्म फक्त अनुभवता येऊ शकते .....😌🙏

    ReplyDelete
  5. अध्यात्मातील अनुभूती विषयी सुंदर मार्गदर्शन.

    ReplyDelete
  6. मस्त लिहितोस रे

    ReplyDelete
  7. adhyatmala vidnyanachi choukat lavanyacha prayatna manus kayam karato ani tithech adakato

    ReplyDelete

श्राद्ध न करनेसे हानि

अपने शास्त्रने श्राद्ध न करनेसे होनेवाली जो हानि बतायी है, उसे जानकर रोंगटे खड़े हो जाते हैं। अतः आद्ध-तत्त्वसे परिचित होना तथा उसके अनुष्ठा...