Sunday 5 January 2020

मी नंदेशनाथ - १६

नाथांना तुमच्याकडून कसलीही अपेक्षा नाही, फ़क़्त तुम्ही एखादे काम करताना त्यांना स्मरून सुरु केले आणि त्यांना काम झाले कि समर्पित केले कि त्या कामात विघ्न येत नाहीत. नाथ फ़क़्त तुमच्यातील आत्मिक शक्ती त्या कामाबद्दल किती आहे तेच बघतात.
साधना, सेवा करताना चुका अनेक होतात जसे मांडणी व्यवस्थित नसणे, मंत्र चुकणे, पूजा पद्धती माहित नसणे काही कामानिमित्त खंड पडणे. यासारख्या गोष्टी घडतात परंतु याने घाबरून जाऊ नये. सुरु केलेले कार्य पूर्णत्वास घेऊन जाणे जशी आपली जबाबदारी आहे, तशीच आपल्या सद्गुरूंची आणि नाथांची सुद्धा आहे त्यामुळे आपल्या मनातील भाव शुद्ध ठेऊन कार्य करत राहावे.

प्रत्येक साधकाला रोज अनुभव यायलाच पाहिजेल असे व्हायला नको, ज्याप्रमाणे प्रत्येकाची क्षमता वेगळी असते त्याप्रमाणे फळ मिळत जाते, अमुक व्यक्तीला किती छान अनुभव येतात मला येत नाही असे विचार सुद्धा मनात आणू नये. आपल्या साठी काही विशिष्ट नियोजन आहे हा भाव असावा. प्रत्येकाचे प्रारब्ध, संचित, कर्म, भक्ती, श्रद्धा, विश्वास वेगवेगळे आहेत त्यानुसारच अनुभव येणार आहे हे लक्षात असू द्या.    

तुम्ही जन्माला येण्याच्या अगोदर तुमचे नशीब लिहिलेले असते त्यामुळे नाथांचे नाव आपल्या मुखात आले कि ती त्यांचीच इच्छा आहे हे समजावे. नाथांच्या इच्छेशिवाय आपण त्यांचे नाव सुद्धा घेऊ शकत नाही. फ़क़्त आलेले नाम पुढे चालू ठेवायचे कि नाही हे फ़क़्त आपण ठरवावे.


मी नंदेशनाथ - १५ साठी येथे click करा.

13 comments:

  1. उत्कृष्टपणे मांडणी
    अनेक शंकाचे एका लेखात निरसन होणारा लेख

    ReplyDelete
  2. खूप छान विषय मांडला आहे छान मार्गदर्शन मिळाले

    ReplyDelete
  3. खूपच सुंदर विचार मांडला आहात, बरेच साधक मनात असा संकुचित भाव घेऊन जगत असतात, त्या साधकाला अनुभव आला मग मला का नाही, आणि त्या मुळे साधना खंडित होते, जवळ जवळ पोहचणार तो पर्यंत सर्व काही समाप्त होते,

    ReplyDelete
  4. खुप छान 👌👌 अनेकदा पूजा करतांना काही ना काही चुका नक्कीच होतात .....पण लेख वाचल्यावर 'ती'भीती कमी होऊन अजूनच श्रध्देने आणी विश्वासाने पूजा घडेल .......धन्यवाद 🙏 🙏

    ReplyDelete
  5. बऱ्याचदा एखादी पूजा मांडणी करताना मनात भीती असते की आपण चुकलो तर ,पण तुम्ही छान शब्दात इथे मांडलं आहे , धन्यवाद

    ReplyDelete
  6. kuthalihi navin pooja kartana manat kayam bhiti asayachi ki chukalo tar kay? Pan aaj tumhi chhan shanka nirsan kele

    ReplyDelete
  7. Khoop sunder shabdat samjavalaye

    ReplyDelete
  8. पूजा मांडणीत चूक झाली तर, ह्या विचाराने मन खूप साशंक व्हायचे, तुम्ही शंका दूर केलीत, धन्यवाद

    ReplyDelete

श्राद्ध न करनेसे हानि

अपने शास्त्रने श्राद्ध न करनेसे होनेवाली जो हानि बतायी है, उसे जानकर रोंगटे खड़े हो जाते हैं। अतः आद्ध-तत्त्वसे परिचित होना तथा उसके अनुष्ठा...