Monday, 30 December 2019

मी नंदेशनाथ - १५

सातत्यपूर्ण सेवा हेच भगवंतप्राप्तीचे साधन आहे. चराचरात तोच समाविष्ट आहे हि भावना आपल्यात भक्ती जागृत करते. भक्तीची उत्कट भावना म्हणजे अत्यानंदाची चाहूल आहे. आणि तोच आनंद म्हणजे मोक्ष ! इतकी मोक्ष प्राप्तीची व्याख्या सोपी आहे.

डोळे उघडे असताना मनुष्य सतत साधना,सेवा,अध्यात्म करण्याचा विचार करतो, काम करताना यातून वेळ मिळाला कि मंदिरात जाईल, मठात जाईल अशी भावना ठेवतो. पण तेच डोळे बंद करून बसला कि त्याला संसारातील करत असलेल्या कर्मांची जाणीव होते आणि साधना भंग होते. यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे रोज एक वेळ नामस्मरणाची ठरवून घ्यावी. रोज त्याच वेळेत भगवंत स्मरण झालेच पाहिजेल हा अट्टाहास असलाच पाहिजेल. साधना, सेवा करताना कसलीही फळाची अपेक्षा करू नये असे सर्व सांगतात पण आज कुठल्याही स्वार्थाशिवाय भक्तीकरने हि सोपी गोष्ट नाही हीच आपली खरी परीक्षा आहे.

दुखातून अध्यात्माचा मार्ग सुरु होते असे कितीतरी उदाहरण आपल्याकडे आज आहेत परंतु आनंद झाला म्हणून अध्यात्मात उतरलो असे बोटावर मोजण्याइतके लोक समाजात आहे. आनंद म्हणजे फ़क़्त पैसे मिळणे, सर्व कामे होणे, कुठलेही संकट नसणे हे नसून माझ्यातले मी पण संपवून परमेश्वरासोबत एकरूप होऊन तोच कर्ता-धर्ता आहे हि भावना ठेवणे होय.

आदेश |



मी नंदेशनाथ - १४ साठी येथे क्लिक करा.
tps://gorakshsamruddhi.blogspot.com/2019/12/blog-post_29.html








9 comments:

Privacy Policy

  Privacy Policy This privacy policy applies to the Gorakshsamruddhi app (hereby referred to as "Application") for mobile devices ...