नाथपंथ हा उलटा पंथ म्हणतात. " सब घर भटके तो नाथ घर अटके " हि म्हण तंतोतंत खर आहे. अनुभव
घेण्यासारखा आहे.
पंथाच्या निर्मिती बद्दल खूप समज-गैरसमज-कथा आहे. कोणत्याही गोष्टीच्या मुळाशी जाण्याची गरज तेव्हाच येते जेव्हा त्यातून काही उत्पन्न होत नाही पण इथे सर्वांच्या मुळाशी नाथपंथ आहे म्हणून तो शोध न लावलेलाच बरा. कोणी शोधला, कधी शोधला, का शोधला याचे उत्तर शोधण्या पेक्षा त्यातून आपल्याला काय मिळत आहे ते घेऊ.
नाथपंथा चे मुळ हे गुरु-शिष्य परंपरा आहे. जगात कोणतीही गोष्ट कोणीतरी सांगितल्या शिवाय आपण करू शकत नाही किवा कोणाचे मार्गदर्शनाखाली आपण ती गोष्ट लवकर करू शकतो. म्हणून कोणीही येऊन मी हे केल आस म्हणू नये म्हणून त्या परमपिता परमात्म्याला स्वतः जन्म घेऊन गुरु करावा लागला. पण त्यातही कमी नाही, जेव्हा मच्छीन्द्रनाथ स्त्री राज्यातून बाहेर आले त्या नंतर त्यांना योगमार्गाची दीक्षा देणारे गुरु गोरक्षनाथच होते.म्हणजे गुरु ला परत शिष्य करणारे फ़क़्त नाथच होते.
गुरु प्राप्ती हि अनेक मार्गाने होते आपल्याला कधीही गुरु शोधावा लागत नाही, तो आपल्याला शोधतो. साधारण रुद्राचे १००० आवर्तन पूर्ण झाले कि गुरुची प्राप्ती होते. गुरु गायत्री मंत्राने सुद्धा गुरूंची प्राप्ती होऊ शकते. पूर्व जन्मातल्या संचीताने, आई-वडिलांच्या पुण्याईने आपल्याला गुरुची प्राप्ती होते. आपण ह्या जन्मात नाथांची सेवा करणार हे आधीच लिहिलेलं असेल बहुदा म्हणून आपल्याला जन्माला आल्यावर अनेक सिद्धी प्राप्त झालेल्या असतात.
Guru prapti badal je lihile aahe, tyacha mi anubhav gheto aahe
ReplyDeleteGuru Che mahatva Kay aplya la Anubhav ahech 🙏🙏
ReplyDeleteKhup uttam ritine samjavla
ReplyDeleteगुरू प्राप्ती विषयी मौलिक मार्गदर्शन
ReplyDelete