Friday, 13 December 2019

मी नंदेशनाथ -१



लिहिण्यासारखे खूप काही आहे पण सुरुवात कुठून करावी हा खूप मोठा प्रश्न मला पडला होता. शेवटी सुरुवात करण्याचे ठरवले साधारण दोन वर्षापूर्वी काका मला म्हणाले होते की तू लिहीत जा पण मी मूर्ख, अडाणी बाकीचं सारखं मला लिहिता तरी कुठे ये त पण तरी जमेल तस आता लिहितो.

 नाथपंथ हा एका दृष्टिकोनातून पहायला गेलो तर महाराष्ट्रात वेगळा आणि महाराष्ट्राबाहेर वेगळा असाच आहे कारण महाराष्ट्रातली जनता गोरक्षनाथ,माया मच्छिंद्रनाथ, रेवन नाथ, चरपट नाथ, वटसिद्ध नागनाथ, भर्तरीनाथ, मीननाथ जालिंदरनाथ ,कानिफनाथ, अडबंगनाथ अशा सर्व नाथांना मानतो तेच महाराष्ट्राबाहेर गोरक्षनाथ, संतोषनाथ, सत्यनाथ, आदिनाथ, यांना नाथ म्हणतात.

महाराष्ट्रात नाथांना  मानणारे  मध्ये अंगात येणे ह्या सर्व गोष्टींना मान्यता आहे म्हणजे अप्रत्यक्षरीत्या मान्यता आहे असे आपण म्हणू शकतो पण जे साधू संत.जपी,तपी संन्यासी आहे  त्यांच्या अंगात येण्याचे कधी दिसत नाही मग जे नाथ आहेत ते फ़क़्त संसारी करण्याऱ्या भक्तांमध्ये च येतात का ?


देवावर विश्वास नाही, अंगात येत नाही सर्व खोट आहे, कर्म महत्वाचे, मी देवाला मानतो पण मंदिरात गेल्यावर मागत काहीच नाही असे म्हणणारे खूप लोक समाजात असतात पण मग लग्न जमत नाही, दारिद्र आहे, संकट येतात तेव्हा हेच लोक मठात, मंदिरात, अधिकारी व्यक्तीकडे जातात. आता यात दोष कोणाचाच नाही फ़क़्त काय तर आज मला गरज आहे म्हणून मी बघतो आहे करून किवा नातेवाईक म्हणता आहेत एकदा करून बघ काय होतंय ते पाहू  --- आता यात दोष कोणाचाच नाही, ना त्या व्यक्तीचा , ना  नातेवाईकांचा , ना जो उपाय सांगतो आहे त्याचा. पण समाजात ह्या सर्वांची गरज आहे चांगले बोलणारे, तटस्थ असणारे, माहित असून न मानणारे, अजिबात न मानणारे.

आणि अजून एक  गमतीची गोष्ट अशी कि फ़क़्त नाथ , देवी , भैरव हेच  फ़क़्त अंगात येतात, मग बाकीचे जातात कुठे नक्की, ३३ कोटी(प्रकार) चे देवी देव  आहेतआपल्याकडे  त्यातील सूर्य, रूद्र  हे आलेले ऐकण्यात नाही कधी. आणी कोणीच यावर निर्भीड भाष्य करीत नाही, जे करायचा प्रयत्न करतात ते मग श्रद्धे वरच हाथ घालतात. करायचं तर अति करायचं नाहीतर मग सर्वच अंधश्रद्धा आहे असे म्हणायचे.


 

6 comments:

Privacy Policy

  Privacy Policy This privacy policy applies to the Gorakshsamruddhi app (hereby referred to as "Application") for mobile devices ...