Thursday, 26 December 2019

मी नंदेशनाथ - ११

आपल्यातला मी पणा संपवायचा असेल तर स्वतची परीक्षा घ्यायला हवी. ती परीक्षा मानसिक,शारीरिक कष्ट दायक असायला हवी पण त्यातली सात्त्विकता आपण सोडू नये. नाथ आपली परीक्षा कधीच घेत नाही आणि घेतली तरी सांगून घेतात, त्यामुळे आपण त्याला पूर्ण तयार असायला हवे. कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अडचणी किवा रोग व्याधी ह्या भगवंताच्या परीक्षेच्या भाग आहे असे समजून आपण त्या भगवंताचा/नाथांचा अपमान करतो आहे हे लक्षात ठेवावे.

आपण जे पेरल आहे ते उगवणार हा नियतीचा नियम आहे नियतीच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही. या सृष्टी मध्ये कोणतीही गोष्ट परमपिता परमेश्वरच्या इच्छेशिवाय होऊ शकत नाही हे जरी खरे असले तर मानवी मनातले षडरिपू जे आहेत ते आपल्याला मिळालेले श्राप आहे ते आपण जे खातो, वाचतो, विचार करतो त्यातून निर्माण होतात त्यामुळे आपलाच फ़क़्त त्यावर ताबा असतो, नियतीच्या फेऱ्यात कोणीही ढवळा-ढवळ करीत नाही आणि म्हणूनच आपण प्राप्त परिस्थिती मध्ये आपल्या कडून भगवंताच्या नामाचा विसर पडणार नाही याची काळजी घ्यावी म्हणजे आपल्यावर संकटे येणार नाही आणि आले तरी त्याची झळ आपल्याला बसणार नाही.

मी जन्माला का आलो, सर्व संकटे माझ्यावरच का येतात, देव माझीच का परीक्षा घेतो हे प्रश्न  समोर येणे स्वाभाविक आहे परंतु ८४ लक्ष योनी मधून आपल्याला मनुष्य जन्म मिळाला आहे म्हणजे आपल्या कडून त्याची काहीतरी अपेक्षा असेल म्हणून त्याने आपल्याला ह्या लायक बनवल. त्यामुळे जास्त विचार न करता भगवंताच्या नामात बेभान होऊन त्याच्या जवळ जाण्याची आशा कायम ठेवावी.

आदेश.   

11 comments:

  1. खुप छान..सोप्प सामान्य माणसाला समजेल अस लिहिले आहे. 🙏 धन्यवाद

    ReplyDelete
  2. खुपच छान 👏👏👏👏👍

    ReplyDelete
  3. खूप छान सांगितले आहेस...👍... धन्यवाद

    ReplyDelete
  4. You explain it simply ..and small things can changes bib ...thanks for sharing

    ReplyDelete
  5. Thank you so much for creating awareness, we will surely follow ur blogs to keep ourself updated ..

    ReplyDelete
  6. अतिशय प्रभावी पणे सांगितले आहे नंदेशनाथ जी,खूप आवडले

    ReplyDelete
  7. Aap देलेल्या अभिप्रायासाठी आपले धन्यवाद

    ReplyDelete
  8. सुंदर साधी सोप्या मराठीत भाषेत किती छान समजावले आहे आपण काय करावे आणि मनात असलेला मी पना अहंकार दुर कसा करावा धन्यवाद मयुर .

    ReplyDelete
  9. Sopya bhashet avghad vishay hatalala aahe Nandesh Nathji

    ReplyDelete

श्राद्ध न करनेसे हानि

अपने शास्त्रने श्राद्ध न करनेसे होनेवाली जो हानि बतायी है, उसे जानकर रोंगटे खड़े हो जाते हैं। अतः आद्ध-तत्त्वसे परिचित होना तथा उसके अनुष्ठा...