Saturday, 21 December 2019

मी नंदेशनाथ -८

ज्या प्रमाणे डॉक्टर स्वतचे ऑपरेशन स्वतः करू शकत नाही त्या प्रमाणे आपने सुद्धा आपले कोणतेच काम मार्गदर्शना शिवाय करू शकत नाही, संपूर्ण जग अनु रेणू यांनी भरलेले आहे आपल्याला जे हवे ते मागून घेतले नाही तर कधीच मिळणार नाही कारण अनेक अशुभ शक्ती तुमचे मार्ग रोखायला तयार असतात म्हणून भगवंत गुरुरुपात येऊन तुमचे दुःख हलके करू इच्छितो तेव्हा आपण त्यावर अविश्वास दाखवणे म्हणजे स्वतः हून नरका ची वाट धरण्या सारखे आहे. 

तुम्ही दिलेला उपाय करून पाहिलं पण काही झाले नाही असे बोल समोरचा जेव्हा बोलतो तेव्हा ते शब्द टोकदार वस्तू लागावी तसे वार करतात. 

आज अनेक स्वयं घोषित धर्म गुरु आपल्या आजूबाजूला आहेत प्रत्येक व्यक्ती एकसारखी नसते म्हणून प्रत्येकाला एकाच तराजूत मोजणे योग्य नाही. कुठल्याही गोष्टीची पारख केल्याशिवाय त्यात रमून जावू नये अन्यथा पदरी काही पडणार नाही. जिथे मूळ गुरुपरंपरा आहे तिथेच मस्तक टेकावे आणि नाथचरणी लिन व्हावे. 


3 comments:

Privacy Policy

  Privacy Policy This privacy policy applies to the Gorakshsamruddhi app (hereby referred to as "Application") for mobile devices ...