आज ५०% पेक्षा जास्त लोकांना त्यांची कुलदेवता माहित नाही. गावची देवी, आम्ही खूप वर्षा पासून तिथेच जातो, लांब आहे जाणे शक्य नाही म्हणून हिलाच कुलदेवी मानले आहे - अशी सर्रास वाक्ये आपल्याला ऐकायला मिळतात. पण एक लक्षात असू द्या काहीतरी कारणानेच त्या जगतजननी ने वेगवेगळी रूपे घेतली आहे आणि आपली कुलदेवी म्हणून स्थापन झालेली आहे त्यामुळे शक्य असेल तर लवकर आपल्या कुलदेवी चा शोध घ्या कारण कुलदेवी एकदा प्रसन्न झाली तर त्या संपूर्ण कुटुंबाचे अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य अनेक संकटांनी मुक्त होते.
आज कुटुंबाला सलग ३३-३५ वर्ष पर्यंत लक्ष्मी ची प्राप्ती होत असते त्यानंतर कुलधर्म,कुलाचार नीट न केल्याने अधोगती होण्यास सुरवात होते आणि शेवटी दारिद्र येते. जर कुलदेवी माहितच नसेल तर जमल्यास कुलदेवीची मानसपूजा नक्की करावी आणि तिला प्रार्थना करावी, प्रार्थना फळास जाऊन मार्ग नक्की दिसतो.
कुलदेवी आणि कुलदेवता यात खूप फ़रक़ आहे, हे दोघे हि आपल्या कुळाचे आई-बाप आहे, त्यामुळे त्यांना कधीही नाराज करू नये. खूप लोकांच्या बाबतीत असे निदर्शनास येते कि ते फ़क़्त करतील तर कुलदेवीच आणि बाकी कसलच नाही कुलदेवी-कुलदेवता एकच आहे असा त्यांचा समज होतो पण तसे नसून आपण मनोभावे कुलदेवी-कुलदेवता यांना शरण जाऊन आज पर्यंत न केलेल्या कार्याबद्दल माफी मागावी, शेवटी ती आई आहे माफ तर करेलच.
महत्वाचे एक लक्षात ठेवा आज प्रत्येक घराण्यात पितृदोष आहे आणि पितृदेवतांना शांत करण्याचे कार्य हे फ़क़्त कुळाचे रक्षण करतेच करू शकतात इतर कोणाचीही मध्यस्थी त्यांना चालत नाही.
माहिती खूप महत्त्वाची दिली
ReplyDeleteयात थोडं नमूद करावेसे वाटते की काही जण कुलदेवीचे जे ठाण म्हणतात म्हणजे एखाद्या व्यक्तीला जुन्या पिढीतील तांदळा किंवा त्यांच्या सेवेखातर मंदिर बांधून त्याची सेवा सांगितली असेल तर त्याच ठाण्यावर पुढचे सगळे वंशज जातात कारण हेच आमचे आजोबा करतात पणजोबा करायचे
आम्ही इथेच सगळं करतो पण यात मला वैयक्तिक अस वाटत की ती सोय त्या एका व्यक्तिपूर्ती त्या देवतेने केली असावी बाकीच्यांनी मूळ स्थानीच सेवा रुजू करावी
आपलं या बाबतीत मार्गदर्शन द्यावं
जेणेकरून विचारांना चालना मिळून जे लोक अस करत असतील ते मूळ शोधतील
प्रत्येकाची कुलदेवता ठरलेली आहे, देवीचे जे स्वयंभू शक्तिपीठे आहेत त्यातलीच एक आपली कुलदेवता आहे हे निर्विवाद सत्य आहे.
Deleteत्यामुळे पूर्वज सांगतात, किवा ते तिथे जात होते म्हणून आपण तिथे जाणे योग्य नाही.
khupach chhan mahiti milalai
ReplyDeleteअतिशय योग्य आणी महत्त्वाची माहिती
ReplyDeleteकुलदेवी आणि कुलदेवता यांना नेहमीच एक मानलं जात , आस नसून ते आई बाप आहेत हे समजून घेणे महत्वाचे आहे ... नेहमीच तुम्ही छान माहिती देता , त्या बद्दल तुमची आभारी आहे
ReplyDeleteKuldevi and Kuldevta ekach asatat ha gairsamaj aaj dur zala...dhanyavad
ReplyDelete