Monday, 23 December 2019

मी नंदेश नाथ - १०

तीर्थक्षेत्रान चे महत्व बोलावे,लिहावे तेवढे कमीच आहे. तेथील उर्जा, चैतन्य हे अनुभवायचे असते. सध्या सर्वजण ५-६ तासांचे प्रवास करून मंदिरात जातात आणि १० min दर्शन झाले कि लगेच माघारी येतात आणि ओरडून सांगतात खूप छान दर्शन झाले मूर्ती खूपच प्रसन्न होती शृंगार तर देखणा होता.

सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी दगडाची कोणतीही मूर्ती हि सजवल्यावर चांगलीच दिसणार आहे महत्वाचे आहे तेथील चैतन्यशक्ती.भारतात पवित्र, पावन असे अनेक क्षेत्र आहे त्यात १२ ज्योतिर्लिंग, ४ धाम, गिरनार, तिरुवन्नामलाई, हनुमंतांची, शनी महाराजांची, नाथांची, दशमहाविद्याची इतकी ठिकाणे आहेत कि संपूर्ण आयुष्य कमी पडेल.आपण त्यात कुठे जावे हे आपल्याला सदगुरु शिवाय कोणी सांगणार नाही. 

दगडा समोर कितीही डोकं आपटले किवा नाक घासले तरी फळ मिळणार नाही पण त्यात असणाऱ्या चैतन्य शक्ती ला भक्तियुक्त अंत करणाने नमस्कार करावा. भक्ती भोळी अंधविश्वास युक्त नसून श्रद्धा आणि विश्वास यांचा समन्वय असलेली असावी. 

4 comments:

  1. खरंच तुम्ही इतक्या सोप्या शब्दात आज च्या सत्य परस्थितीचें वर्णन केले आहे . तुमची आभारी आहे

    ReplyDelete
  2. Sadya paristhiti var sundar bhashya

    ReplyDelete

Privacy Policy

  Privacy Policy This privacy policy applies to the Gorakshsamruddhi app (hereby referred to as "Application") for mobile devices ...