Friday, 27 December 2019

मी नंदेशनाथ - १२

आपल्या गुरुंच आपल्या कडे लक्ष नाही अशा अनेक तक्रारी नेहमी येत असतात, आज असंख्य गुरु आणि प्रत्येक गुरूंचे लाखो शिष्य अशी परिस्थिती पाहायला मिळते आहे. परंतु भगवंताने ज्यांना गुरु तत्व दिल आहे त्यांचे लाखो जरी अनुयायी असतील तरी आपल्या शिष्याच्या प्रत्येक कृतीकडे त्याचं बारीक लक्ष असत. जसे अंधाराच्या खोलीत एक दिवा पेटवल्या नंतर संपूर्ण खोली जशी प्रकाशमान होते तसेच गुरूंच्या सहवसात आल्यानंतर किवा गुरुमंत्र घेतल्या नंतर (नियमित जप केल्यानंतर) आपण त्यांच्या प्रकाशछायेत जातो.

अध्यात्मात प्रत्येक गोष्ट हि आपली शरीर शुद्धता, विश्वास, श्रद्धा, मंत्र जाप यांनी वेढलेली आहे. या सर्व गोष्टी परस्परात अडकल्या आहेत त्यामुळे मी योग्य असून मला काही न मिळता जो काही करत नाही त्याला अधिकार कसे मिळाले हा विचार करू नये.
जेवढा जास्त मंत्र जाप तेवढी शरीर शुद्धता, शरीर शुद्ध म्हणजे चक्र शुद्ध, आणि चक्र शुद्ध म्हणजे भगवंत प्राप्ती.

 आज्ञा चक्र शुद्ध होणे म्हणजे पृथ्वी-जल-अग्नी-वायू-आकाश  तत्व दिसणे, विशुद्ध चक्र शुद्ध होणे म्हणजे पृथ्वी-जल-अग्नी-वायू-आकाश तत्वात असणाऱ्या विचारांची देवाण घेवाण होणे. अनाहत चक्र शुद्ध होणे म्हणजे पृथ्वी-जल-अग्नी-वायू-आकाश या तत्वातील असलेले ज्ञान आपल्याला होणे. मणिपूर चक्र शुद्ध होणे म्हणजे पंच तत्वातील सर्व शक्ती तुमच्या अंतरंगात समाविष्ट होणे, स्वाधिष्ठान चक्र शुद्ध म्हणजे पृथ्वी-जल-अग्नी-वायू-आकाश तत्व स्वत विकसित करणे , मूलाधार चक्र शुद्ध होणे म्हणजे पंचमहा भूतांवर तुमची सत्ता असणे  आणि सहस्त्राद्ल चक्र शुद्ध होणे म्हणजे पंच तत्व सोडून भगवंता सोबत एकरूप होणे होय. यात क्रम हा उलटा दिला आहे कारण नाथ पंथ मध्ये साधना करताना आधी आज्ञा चक्रावर ध्यान करायला लावतात आणि मग बाकी चक्र.
जेव्हा तुमचे एक चक्र शुद्ध होते तेव्हा त्या चक्राच्या वरचे व खाली असलेले चक्र शुद्ध व्हायला सुरवात होते
(म्हणजे स्पंदन जाणवतात).

 प्रत्येक चक्राचे कार्य वेगळे आहे त्यातून अनेक सिद्धी प्राप्त होतात पण त्यामागे लागू नये, चक्र शुद्ध करताना किवा जागृत करताना कुठलाही अघोरी प्रयोग करू नये त्याने हानी निश्चित आहे. हे सर्व सतुगुरुंच्या अधीन आहे त्यामुळे आपल्या गुरूंचे आपल्यावर आपल्या वर लक्ष नाही असे म्हणू नये.

16 comments:

  1. Invaluable information thanks 🙏🙏🙏

    ReplyDelete
  2. अतिशय उत्तम माहिती दिली आहे

    ReplyDelete
  3. These are unknown facts , as a common man , personally I was not aware of these facts , thank you for creating awareness .

    ReplyDelete
  4. वा खुपच छान पद्धतीने उलगडून सांगितले .अशा सोप्प्या भाषेत आध्यात्मिक गोष्टी चा उलगडा झाला तर सगळ्यांना खुपच पटकन आत्मसात होऊ शकते ........🙏 🙏 🙏 ✌

    ReplyDelete


  5. धन्यवाद खुप सुंदर विवेचन
    या सगळ्याचा विचारशुद्धी साठी निश्चित उपयोग्य होणार यात शंकाच नाही
    सर्व गुरू आधीन म्हंटल्यावर काय केलं पाहिजे हा प्रश्नच राहत नाही
    योग्य वेळी योग्य गोष्ट सांगितली जाणारच



    ReplyDelete
  6. साधनेमुळे होणारी चक्रांची शुध्दता आणि त्याचे महत्त्व या विषयी खूप सुंदर माहिती.

    ReplyDelete
  7. खूप छान माहिती दिली आहे

    ReplyDelete
  8. Best thinking boss but difficult to quick result today

    ReplyDelete
  9. vividh Chakra vishayi khup abhyaspurna mahiti

    ReplyDelete

श्राद्ध न करनेसे हानि

अपने शास्त्रने श्राद्ध न करनेसे होनेवाली जो हानि बतायी है, उसे जानकर रोंगटे खड़े हो जाते हैं। अतः आद्ध-तत्त्वसे परिचित होना तथा उसके अनुष्ठा...