Saturday, 28 December 2019

मी नंदेशनाथ - १३

दुसऱ्याचे कर्म आपण घेणे म्हणजे जिवंतपणी नरक यातना भोगणे होय. नियती प्रत्येक कर्माचा हिशोब ठेवत असते त्यामुळे आपण इतरांच्या कर्मात आडवे गेलो तर त्याची फळे आपल्याला भोगाविच लागतात. म्हणून अध्यात्मात किवा जीवनात इतरांसाठी विनंती करणे धोक्याचे असू शकते, जो तो त्याच्या मार्गाने क्रमण करत असतो आणि प्रारब्धा प्रमाणे त्याला मार्गदर्शन मिळत असते म्हणून आपण दुसरा काय करतो आहे किवा त्याचे दोष काय आहे ते पाहू नये किंबहुना त्याचा विचार सुद्धा करू नये कारण ते स्पंदन आपल्याला सुद्धा त्रासदायक होऊ शकतात.

आपण चांगले करायला गेलो आणि कोणी आडवे आले नाही तर नवल झाल्यासारखे होते, प्रत्येक चांगल्या गोष्टीत अडथळे हे येतच असतात, अडथळ्यांची शर्यत पार करत भगवंता पर्यंत पोहोचणे म्हणजेच अध्यात्म. प्रत्येक अशुभ शक्तीला (negative energy ) ला तुमच्यात शुभ शक्ती ( positive energy ) विकसित झालेली आवडत नाही त्यामुळे सुद्धा मार्गात अडथळे येतात. त्यामुळे प्रत्येकाने जमल्यास एक कवच सिद्ध करून ठेवावे. गुरुआज्ञेनुसार सिद्ध कवच मिळाल्यास ब्रम्हराक्षस सुद्धा ते कवच भेदू शकत नाही.

इतरांच्या मागे शक्ती कोणती आहे, त्यांचे त्रास काय आहे हे शोधण्यासाठी व ते कमी करण्यासाठी परमेश्वर अधिकारी व्यक्तींची निवड करतो व त्याचे कार्य त्यांना सोपवतो. आपण आपले आई-वडील-भाऊ-बहिण-बायको--मुल फ़क़्त यांचाच विचार नेहमी करावा आणि यांच्याच भल्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी. इतरांची चिंता करू नये.



11 comments:

  1. खुप माहितीपूर्ण

    ReplyDelete
  2. 🙏 उच्च कोटी मधले साधकच असे विचार प्रगट करू शकतात... तुमचे खुप मोठे योगदान नाथ सेवेत आहे...
    👍

    ReplyDelete
  3. खुप छान नन्देश नाथ 👍तुम्ही खुपच मस्त लिहिता 🙏

    ReplyDelete
  4. छान माहिती दिली

    ReplyDelete

Privacy Policy

  Privacy Policy This privacy policy applies to the Gorakshsamruddhi app (hereby referred to as "Application") for mobile devices ...