लोक म्हणतात देव रागवत नाही,नाराज होत नाही. पण तुम्ही साधनेची एक पातळी पूर्ण केली कि प्रत्यक्ष नाथ तुमची काळजी करायला लागतात हा माझा अनुभव आहे. त्याने रागवाव आपण परत साधना सेवा करून त्याला आपलस कराव हा खेळ कधी संपायलाच नको आस नेहमी वाटत.
नाथांना फ़क़्त सेवा हवी आहे " सेवा करा मेवा खा " ह्या उक्ती प्रमाणे नाथ तुम्हाला सोन्यात लोळवल्या शिवाय राहणार नाही. पण नाथांवर रागावणारे कोणी असेल हे सांगितले तर कोणाचा विश्वास बसणार नाही, गादीवर सतगुरु मी व माझे गुरुबंधू आम्ही तिघे असताना मी प्रत्यक्ष माझ्या सतगुरूंना नाथांवर रागावताना पाहिले आहे. कोणतीही तमा, मागचा पुढचा विचार न करता ते फ़क़्त बोलत होते आणि नाथ याचा राग आज आपल्याला ऐकावा लागणार या प्रमाणे ऐकत होते. तो अनुभव पुढील आयुष्यात कधीही नको हीच प्रार्थना मी नेहमी करेल. किती ते प्रेम, किती ती आपुलकी.
सेवेचे २ महत्वाचे नियम आहे १) नॉनव्हेज नको - कारण त्याने आपल्या रक्तात दोष निर्माण होतात जे मासं आपण भक्षण करतो त्याचेच गुण आपल्या शरीरात दिसायला लागतात २) मद्य प्राशन नको - त्याने बुद्धी भ्रष्ट होते आपण काय करतो आहे ते समजत नाही. हे दोन नियम जरी पाळले तरी तुम्ही नाथपंथाची दीक्षा घेऊ शकतात.
Amrutache bol Nandesh ji
ReplyDeleteNandesh nath ji 🙏
ReplyDeleteशिष्याने गुरूवर रागावणे ह्याचा प्रत्यक्ष अनुभव मी ही माझ्या गुरू बंधूंच्या बाबतीत ह्याची देही ह्याची डोळा घेतला आहे.पण त्या साठी शिष्याचे गुरूवर असणारे निरपेक्ष प्रेम,संपूर्ण समर्पण,विश्वास ह्या गुणांची आवश्यकता असते.
ReplyDelete