Thursday 19 December 2019

मी नंदेशनाथ - ६

 
कोणतीही गोष्ट डोळ्यांनी पाहिल्यावर आपण त्यावर विश्वास ठेवतो पण नाण्याच्या दोन बाजू असतात, जे पाहिलंय तसच असेल आणि तेच खर हा समज अत्यंत चुकीचा आहे. छोटे छोटे अनुभव आपली श्रद्धा वाढवतात तीच श्रद्धा आपल्याला काहीतरी वगळे प्रयोग करण्यास भाग पाडते. अध्यात्मात साधना सेवा करताना वेगवेगळे प्रयोग केल्याने नाथ खुश होतात हे मी अनुभवल आहे.

विचार करा संपूर्ण ब्रम्हांडात फ़क़्त तुम्हीच निवडले गेले आपल्या आराध्याची सेवा करण्यासाठी कारण पूर्व जन्मात कलेले कर्म, आणि जर नाथांन कडून तुम्हाला काही वेगळी अपेक्षीत असेल तर त्या सर्व लोकांपेक्षा काहीतरी वेगळ करण्याची जिद्द आपली असली पाहिजेल. वेगळ करण्याच्या प्रयत्नात अघोरी प्रयोग कधीच करू नये, नाथ पंथ त्याला कधीच दुजोरा देत नाही.

अघोरी प्रयोग करणाऱ्यांचे मृत्यू कधीच चांगले होत नाही अतिशय कष्टदायक असतात. आपल्या जीवनाचा शेवट हा फ़क़्त आपण डोळे बंद करून बसावे आणि नाथांचा हात आपल्या समोर यावा त्यांनी आपल्याकडे स्मित हास्य करून पाहावे आणि आपल्याला म्हणावे तुझी जाण्याची वेळ आली आहे असे म्हणून घेऊन जावे इतका अल्हादायक, आनंददायक असावा.

मोक्ष पाहिजेल असे म्हणनार्यांची संख्या काही कमी नाही पण मोक्ष प्राप्ती पेक्षा आपल्या आराध्याची सेवा करण्यासाठी आपण त्याच्या दरबारात सेवक म्हणून जरी रुजू झालो तरी केलेल्या सेवेचे सार्थक झाल्यासारखे होईल.   

8 comments:

  1. खुपच सुंदर 👌🙏 🙏

    ReplyDelete
  2. खुपच सुंदर 👌👌🙏 🙏

    ReplyDelete
  3. हृदयस्पर्शी

    ReplyDelete
  4. खूप छान मयूर 🙏.

    ReplyDelete
  5. मस्त सांगितले नांदेशनाथ जी

    ReplyDelete
  6. apratim...shevatache don para vachatana shahare ale....jabarjast Nandesh Nathji

    ReplyDelete

श्राद्ध न करनेसे हानि

अपने शास्त्रने श्राद्ध न करनेसे होनेवाली जो हानि बतायी है, उसे जानकर रोंगटे खड़े हो जाते हैं। अतः आद्ध-तत्त्वसे परिचित होना तथा उसके अनुष्ठा...