Sunday, 22 December 2019

मी नंदेशनाथ -९

अध्यात्मात सातत्य हे अत्यंत आवश्यक आहे. कोणतीही गोष्ट जोपर्यंत आपण मिळवत नाही तोपर्यंत आपल्याला तिची किंमत खूप जास्त असते एकदा हातात आली कि किंमत नष्ट होते असे भगवंताच्या बाबतीत नको व्हायला. नाथांना मिळवन खूप सोप आहे पण त्यांची साथ,सहवास टिकून ठेवण खूप अवघड.

एखादी साधना सुरु केल्यावर वेळ जमून येत नाही, महत्वाची कामे येतात, वृद्धी, सुतक लागणे असे प्रकार घडतात तेव्हा समजावे कि ज्या देवतेची आपण साधना करतो आहे ती देवता आपल्यावर नाराज नाही पण परीक्षा घेत आहे. साधना म्हणजे तुमची श्रद्धा आणि विश्वास मोजण्याचे एक साधन आहे.

गणपती, कुलदेवता, आराध्य यांच्या साधना करतात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो अनेक वेळा साधना नव्याने सुरु करावी लागते अशा वेळेस घाबरून जावू नये किवा मधेच सोडून देऊ नये. साधना नव्याने सुरु करावी आणि आपल्या सतगुरूंना शरण जावे म्हणजे ते मध्यस्थी करून आपली आणि साधना दैवताची सांगड घालून देतात.     

4 comments:

Privacy Policy

  Privacy Policy This privacy policy applies to the Gorakshsamruddhi app (hereby referred to as "Application") for mobile devices ...