Thursday, 19 December 2019

मी नंदेशनाथ - ५

मी हे करतो, मी ते करतो, इतके वर्ष झाली मी रोज नित्य नियमाने पूजा करतो आहे, देवावर माझा विश्वास आहे हे बोलून पण माझ्या समस्या संपत नाहीत अशा बोलणाऱ्या लोकांचा एक ग्रुप आपल्याकडे आहे. याला कारण एकच जेव्हा तुम्ही कोणतीही समस्या घेऊन कोणाकडे जातात तेव्हा तो व्यक्ती काही उपाय सांगतो, नंतर परत ओळखीचे, परिचयाचे यांच्या सांगण्यानुसार परत दुसऱ्या व्यक्ती कडे जातात आणि काहीतरी उपाय करतात, याने काय होत,

आपल्या आजूबाजूला सर्व स्पंदन आहे हे विज्ञानाला मान्य आहे, जेव्हा दोन स्पंदन (waves) एकमेकात मिसळतात तेव्हा दोन्ही नष्ट होऊ शकतात कीवा त्यातून वेगळ काहीतरी निर्माण होऊ शकत बरोबर हेच सर्वांच्या बाबतीत होत वेगवेगळे लोक वेगळ मार्गदर्शन आणि त्यामुळे सर्व एकत्र येत आणि निर्माण काही होत नाही म्हणजे काम होत नाही.

त्यामुळे आधी एक गोष्ट ठरवली पाहिजेल माझे आराध्य एकच कि काही झाल तरी मी त्यांचाच आणि ते माझे नाहीतर गेलो हनुमान मंदिरात परत दिसल देवीच मंदिर मग गेलो तिथे आस नको व्हायला.

"जाऊ देवाचिया गावा, देव देईल विसावा, करू सुखादुखाच्या गोष्टी" याप्रमाणे देवदर्शन नक्की करावे, तीर्थक्षेत्री जावे पण तिथली उर्जा अनुभवण्यासाठीच उगाच गाव जातंय म्हणून गेलो आस नको. प्रत्येक ठिकाणी सत्पुरुष्यांच्या, साधू-संतांच्या स्पर्शाने अनेक दैवी स्पंदन कार्यरत असतात आपण जाऊन फ़क़्त आपल्याला अनुभव येईल ते घ्यावे.

4 comments:

Privacy Policy

  Privacy Policy This privacy policy applies to the Gorakshsamruddhi app (hereby referred to as "Application") for mobile devices ...