Monday, 6 January 2020

मी नंदेशनाथ - १७

साधना, सेवा, जप, तप करताना अनुभव येतात परंतु आलेल्या अनुभवांवर मन संतुष्ट नसते. अनेक सिद्धींची लालसा मनात घर करून असते परंतु हे लक्षात असू द्या हे कलियुग आहे. आज पर्यंत सर्व सिद्धी प्राप्त झालेले किती सिद्ध साधक आपण पाहिलेले आहेत? एकही नाही त्याचे कारणही तसेच आहे कलियुगात भक्तीमार्ग श्रेष्ठ दिला आहे त्यात फ़क़्त नामाचा जप करणे क्रमप्राप्त आहे. सिद्धी प्राप्त होण्यासाठी १२ वर्ष पूर्ण तप एकाजागी बसून डोळे बंद करून नाथांचे स्मरण करत करणे गरजेचे आहे एवढे करून जो योगी,महायोगी सिद्धी दाखवण्यात दंग झाला तर नियती त्याच्यावर नाराज होते म्हणून जे सिद्ध आहेत ते दाखवत नाही आणि जे छोटे,मोठे प्रयोग करतात हे जाहिरातबाजी करत फिरतात.

तुम्ही या जन्मात नाथांची सेवा करणार आहात हे जेव्हा ठरते त्या आधीच नियती अनेक सिद्धी तुमच्या जवळ आणून ठेवतात पण आपले मन अनेक वासनांनी भरलेले आहे त्यात स्वार्थ, मत्सर, द्वेष या भावना आपण जसेजसे मोठे होत जाऊ तसे वाढत जातात म्हणून आपल्या कडे लहानपणा पासून मुलांना स्तोत्र पठन, मंत्र जाप करायला सांगतात किंबहुना ते करायलाच हवे ज्यामुळे शुद्ध स्पंदणांचे वलय आयुष्यभर आपल्या सोबत असते.

आजही अनेक सिद्ध, योगी, महायोगी आपल्याकडे आहे जे हिमालयात निवास करून रोज शुद्ध स्पंदन भूतलावर आपल्यासारख्या भगवंतावर विश्वास न ठेवणाऱ्या लोकांसाठी अवकाशात सोडतात. त्यामुळे आपल्याला त्यांचे दर्शन जरी झाले तरी मनुष्य जन्म सार्थक झाल्यासारखे होईल, परंतु आपले प्रारब्ध त्यात आडवे येते म्हणून आपण ह्या सर्व गोष्टीचा अनुभव घेण्यावाचून वंचित राहतो.



मी नंदेशनाथ - १६ साठी येथे click करा.

13 comments:

श्राद्ध न करनेसे हानि

अपने शास्त्रने श्राद्ध न करनेसे होनेवाली जो हानि बतायी है, उसे जानकर रोंगटे खड़े हो जाते हैं। अतः आद्ध-तत्त्वसे परिचित होना तथा उसके अनुष्ठा...