प्राणिमात्रांना हा भवसागर पार करता यावा म्हणून महर्षि पतंजलीनी योगत्वे अनुशासन केले. असे सांगतात की हिरण्यगर्भाने रचलेली योगसूत्रे आज जरी लुप्त झालेली असली तरी त्याच्या प्रकाशात आणि आधारावर पतंजलीनी आपली योगसूत्रे रगलेली आहेत. त्यांनी अष्टांगयोगाचे प्रतिपादन केले आह
१ यम, २ नियम, ३ आसन, ४ प्राणायाम, ५ प्रत्याहार, ६ धारणा, ७ ध्यान व ८ समाधी ही योगाची आठ अंगे आहेत. त्यांनी ह्या आठ अंगांचे विस्तारपूर्वक असे आपल्या योगदर्शनात विवेचन करून सर्वांचे कल्याण केले. महाराजा भोज यांनी त्यांच्या ह्या योगसूत्रांची स्तुती केली आहे.
अंतःकरणाच्या अज्ञानमय अंधकाराचे निवारण करण्यासाठी चंद्रम्याच्या किरणा- प्रमाणे प्रकाशित करणारी अशी ती योगसूत्रे आहेत. त्या योगसूत्रांचे साधुपुरुष निरंतर अनुशीलन करतात व त्यामुळे त्यांचे मन आनंदमय बनते.
" जयन्ति वाचः फणिभर्तुरान्तर स्फुरत्तमस्तो मनिष्णकरत्विषः । विभाव्यमानः सततं मनांसि याः सतां सदानन्दमयानि कुर्वते ॥
महायोगी श्रीगोरक्षनाथ यांनी षडांग योगाचे विधान केले आहे. त्यांनी महर्षि पतंजलीची पहिली दोन अंगे-यम आणि नियम यांना आपल्या षडांग योगामध्ये यसहज अनुस्त केले आहे.
No comments:
Post a Comment