Friday, 5 April 2024

yog marg (योग मार्ग) ६ - खेचरी मुद्रा

जिभेचे छेदन, चालन आणि दोहन करून, जीभ लांब करायची आणि ती कपालकुहरामध्ये प्रविष्ट करायची म्हणजेच भ्रूमध्यावर दृष्टी लावायची याला खेचरी- मुद्रा म्हणतात. खेचरी मुद्रेचे फळ काय आहे तर लंबिकाच्या ऊर्ध्वामध्ये स्थित असलेले के कंठविवर आहे तेथून खेचरीमुद्रेद्वारा बिंदुपात न होऊ देणे मग व्यक्ति स्त्रीच्या बाहुमध्ये आलिंगन बद्ध असो अगर नसो. जर भगमंडलामध्ये बिंदू पडलाच तर शक्तीच्या सहाय्याने योनिमुद्रेच्या सहाय्याने त्याचे ऊध्र्वोत्यान होऊ शकते. ऊर्ध्वजिव्ह होऊन सोमपान केल्याने निदान एक दोन महिने तरी मृत्यूवर विजय प्राप्त करता येतो.

विपरीतकरणी मुद्रा अथवा नभोमुद्रा हे विधान करून सुद्धा अमृताची प्राप्ती करता येते.

नाडीशुद्धी केल्याने बिंदुस्थैर्य होते. नाडीशुद्धी, सुषुम्ना मार्ग यांच्या स्वच्छते- मुळे प्राण मनाचा सुषुम्नेमध्ये प्रवेश होतो व तेच शिवसामरस्य आहे.

No comments:

Post a Comment

Privacy Policy

  Privacy Policy This privacy policy applies to the Gorakshsamruddhi app (hereby referred to as "Application") for mobile devices ...