ज्ञानी झाला म्हणून काही कुणी योगी होत नसतो. आणि योगी झाल्याविना सत्यज्ञानाची प्राप्ती होत नसते. योग्यालासुद्धा शानाची आवश्यकताच आहे. अशा प्रकारे योग आणि ज्ञान परस्परांना सहाय्यकच आहेत. तरीसुद्धा योग हा श्रेष्ठ आहे. ज्ञान कनिष्ठ आहे. प्रत्येक माणसाला आपल्या जीवनात चार अवस्था प्राप्त होतात -
१) गुरु आणि भगवान यांच्या कृपाप्रसादाने पौरुष आणि अज्ञान दूर होते,
२) आपल्या साधनेमुळे माणसाला ह्या जन्माचे बौद्धिक ज्ञान प्राप्त होते.
३) बौद्धिक शानाचा उदय झाल्यामुळे बौद्धिक अज्ञानाचा नाश होतो.
४) पौरुषज्ञानाचा उदय होतो.
साधनेच्या द्वारे जर का बौद्धिक शान झाले नाही, त्या ज्ञानाचा उदय झाला नाही तर, तर त्याबरोबर पौरुष ज्ञानाचा उदय झाल्यामुळे आपली बुद्धी आपल्या ज्ञानाला प्रतिबंध करील. ह्या अवस्थेला दूर करण्यासाठी साधनेचे प्रयोजन आहे. गरुदीक्षा घेतल्यानंतरसुद्धा जर शानदीप प्रज्वलित झाला नाही तर आणि जीवनकालात जर का साधनेद्वारा जीवाचे आवरण अंधकार नष्ट झाला नाही तर मृत्यू झाल्यावर ते आवरण आपोआप नष्ट होते. म्हणूनच गुरूच्या सहाय्याने प्रज्वलित झालेला ज्ञान- दीप आपोआपच प्रज्वलित होतो. कारण एकदा प्रकाशित झालेला तो ज्ञानदीप पुन्हा विश्वला जात नाही.
नाथमार्गामध्ये ज्ञान आणि योग यांचे दोन अवस्थांच्या रूपामध्ये विवेचन आहे. सर्व प्रथम गुरुज्ञान प्रदान केले जाते, मग योगसाधना. योगाविना महाज्ञानाचा उदय कधीच होणार नाही. गुरूच्या सहाय्याने साधकाची दृष्टी आणि शक्ती उन्मुक्त होते आणि मग त्याला महाज्ञानाची प्राप्ती होते.
No comments:
Post a Comment