Sunday, 21 April 2024

यंत्र आणि यंत्रसिद्धी

यंत्र आणि यंत्रसिद्धी

भारतीय संस्कृती आणि साधना ह्या दृष्टीने पाहिले तर मध्ययुग, हा योग आणि तांत्रिक साधना यांचा सुवर्णकाळ होता. ह्या युगात ज्या संप्रदायांचा जन्म झाला त्यात नाथसंप्रदायाला फार महत्त्वपूर्ण असे स्थान आहे. ह्याच युगामध्ये अवतीर्ण झालेल्या संत- मतालाही कमी महत्वाचे स्थान आहे असे म्हणता येणार नाही. नाथमार्गाचे अनुयायी ज्ञानमार्गाचेही पथिक झालेले होते. तेव्हा संतमताने निर्गुण सगुण परमात्मतत्त्वाचे अनुशीलन चालविले होते.

नाथ ह्या शब्दामधील 'ना' ह्या अक्षराचा अर्थ अनादी रूप व 'थ' हथा अक्षराचा अर्थ भुवनत्रयामध्ये स्थापित होणे. नाथ हे असे एक तत्त्व आहे की जे अनादी आहे आणि जे भुवनत्रयाच्या स्थितीला एकमात्र कारण आहे.

नाथ संप्रदायाचे एकमात्र चरम लक्ष्य आहे अद्वय भाव; म्हणजेच कैवल्यपदाची प्राप्ती. ह्यासाठी सर्वप्रथम सद्‌गुरूच्या कृपेने चित्त-विश्रांती लाभ अवश्य मिळायला हवा, कारण त्याविना सामरस्थाची माप्ती संभत्रनीय नाही. जोपर्यंत चित्त देहात्ममूलक क्षोमा- पासून मुक्त झाले नाही तोपर्यंत शांती मिळणार नाही आणि ययार्थ साधनेचा प्रारंभसुद्धा होणार नाही. चित्तशांतीमुळे बहुधा भगवदानंद मिळतो आणि अनंत ज्योतींचा आविर्भात्रहोतो. ह्या अद्वैत प्रकाशाने द्वैतभाव निवृत्त होतो, वित्रशक्तीवा प्रकाश पवतो आणि योगी निज देहाचे पूर्ण शान प्राप्त करतो. याचे फळ म्हणजे फायसिद्धी भयया पिण्वसिद्धी. याचे नामांतर म्हणजे देहाचे अमरत्व. तीच सिद्धदेह अवस्था होय

हया लक्ष्याच्या सिद्धीसाठी नाथसंप्रदायाने कुंडलिनी साधनेचा म्हणजेच षट्- चक्रभेदनाचा आश्रय घेतला आहे. राजयोगात पारंगत झाल्यावर कुंडलिनी साधनेचा मार्ग सुलभ होतो आणि षट्चक्रभेदनाची प्रक्रिया प्रशस्त होते.

साधनेच्या दृष्टिकोनातून मानत्री शरीराला फारच महत्त्व आहे. चौऱ्याऐंशी लक्ष योनी भटकून झाल्यानंतर, परमात्म्याच्या अनुकंपेने जिवाला मानवी शरीराचा लाभ होतो. मानवी शरीराला महत्त्व मिळण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे सान्या विश्वाचे नियंत्रण करणारी पराशक्ती आपली सर्वश्रेष्ठ लीला बहुधा मानवी शरीराच्या माध्यमानेच प्रगट करते. ह्या आधारावरच देशकालाला अनुसरून अनेक गुप्त साधना, रहस्यमय उपासना आणि त्यांची कार्ये शात झाली. त्या 'तंत्र' इथा नावानेच प्रसिद्ध आहेत. तंत्र याचा अर्थ ज्ञानाचा विस्तार. कुंडलिनी हे पराशक्तीचे नामांतर आहे. ती महामाया महाविद्या रूप आहे. तिचे मूलकेंद्र मूलाधार चक्र आहे आणि उरलेल्या पाच चक्रांचा भेद ती क्रमाक्रमानेच करते. ती तिच्या विकासाची केंद्रे आहेत. हया सहा चक्रांखेरीज अथवा केंद्रांखेरीज आणखी तीन केंद्रे आहेत. कपाळाचा प्रदेश तीन मुख्य भार्गात विभागला गेला आहे.

१. मुख्य मस्तिष्क, २. लघु मस्तिष्क आणि ३. अषः मस्तिष्क अशी नावे आहेत. हे तीन भाग म्हणजे चक्रे अथवा तीन केंद्रे आहेत. तिसन्या भागाला योग- शास्त्रामध्ये सहस्रार चक्र म्हणतात ज्याच्या मुळाशी ब्रह्मरंध्र आहे. हथा नऊ केंद्रां- पैकी सात केंद्रांचा संबंध विश्वब्रह्माण्डाच्या सात भागाशी आहे. योगीगण हथामध्ये स्थित होऊन संबंधित लोक लोकांतराशी संबंध स्थापित करतात. हथा संबंधकालाचे नाव समाधी असे आहे. समाधी ही एक उच्च अवस्था आहे. त्या अवस्थेत प्रवेश करून योगीगण वेगवेगळ्या लोकांत भ्रमण करतात आणि तेथील निवासाशी अथवा मानवेतर दिव्य प्राण्यांशी संबंध स्थापन करतात. आणि विशिष्ट ज्ञान-विज्ञानाला उपलब्ध करून देतात. शरीरातील नऊ चक्रे ही नऊ शक्तिकेंद्रे आहेत. योगीगण मुख्यतः त्याच शक्तीचा अवलंब करतात. साधन राज्यातील ती यंत्र विशेष आहेत. जवळजवळ वीस वर्षांपूर्वी काशीच्या नारद घाटावर प्रच्छन्न रूपाने निवास करणान्या गुप्त तंत्रसाधक तरणी कोद ठाकूर यांना ह्या केंद्ररूपी यंत्रांविषयी बरेच शान होते, एक दिवस त्यांनी दाखवून दिले की, शक्तीचे जे सृष्टिरूप आहे ते योनिरूप आहे. म्हणूनच त्या केंद्राचे प्रतीक योनिप्रतीक त्रिकोण आहे. प्रत्येक केंद्राच्या शक्तीमुळे चार चार तत्त्वांची उत्पत्ती होते. हथाप्रमाणे ३६ तत्त्वांच्या ३६ वर्णमालिकांचा आविर्भाव होतो. प्रथम एक मूळ अथवा आदिपराशक्ती नऊ रूपांमध्ये विभक्त होते. नंतर त्या ३६ वर्णमातृकारूप ग्रहण करतात. 

कृ. म.बापटशात्री 


No comments:

Post a Comment

Privacy Policy

  Privacy Policy This privacy policy applies to the Gorakshsamruddhi app (hereby referred to as "Application") for mobile devices ...