Friday 5 April 2024

yog marg (योग मार्ग) ४

गोरखनाथांनी प्रतिपादलेल्या योगामृतमार्गामध्ये हेच अव्यक्त, अक्षर, शून्य, निरंजनपद ही परमानुभूती आहे. ही परमानुभूती योगाभ्यास, तन, मन, प्राण यत्ति संशोधन, अपरा कुंडलिनी जागरण, परा कुंडलिनी शक्तीची संभिती, नवचक्रभेदनाचे फलस्वरूप सहलारकडे सतत प्रवाहित झालेले परमामृतरसाच्या आस्वादनात सन्निहित आहे. परमशिवाच्या अनुवहानेच संभवनीय आहे. हया परमानुभूतीची प्राप्ती हाच गोरक्षयोगाचा परम-चरम उद्देश आहे. गोरखनाथांच्या योगामृतमध्ये आंतरिक साधना हीच प्रधान आहे. बाहय अभ्यास हा पूरकमात्र आहे. त्यामुळे सिद्ध देइ प्राप्त झाल्यामुळे शून्यपदात सहज विश्रांती मिळते.

भगवान् गोरखनाथांचे योगामृत महाज्ञान सनातन योग वाङ्मयाचे आदि स्वरूप आहे. कारण ते साक्षात् शिवप्रवर्तित आहे. महर्षी पतंजलींनी इथा महाज्ञानाची अनुशासनक्रिया दिली आहे.

गोरखयोगाची अशी विशिष्टता आहे की, त्यांनी योगशासन अथवा योग- प्रवर्तन केले. अनुशासन केले नाही. महर्षी पतंजलीनी अनुशासन केले, पातंजली - योगसूत्रे शिवप्रवर्तित - शिवगोरक्ष निर्दिष्ट योगज्ञानाचे महाभाष्य समजले जाते. तर त्यात फारशी अतिशयोक्ती आहे असे म्हणता येणार नाही. गोरक्षयोगाची हीच स्वीकृती आहे. पातंजल योगसूत्रे ह्या स्वीकृतीची परिपूर्ती आहे, अथवा विस्तृती आहे. हे केवळ अनुमान आहे असे मात्र समजता कामा नये. असे प्रतीत होते की, गोरक्ष- योग ज्ञानप्रकाशात सनातन परमात्मा शिवशंभोच्या अमृतस्वादनामध्ये हे प्रतिपादन संगत आहे ते उचित आहे. भगवान् गोरखनाथ योगीराजराजेश्वर आहेत. साक्षाद् शिवस्वरूप महायोगविज्ञानी अमरकाय योगसिद्ध आहेत. त्यांचे योगामृत अक्षय आणि निर्विकार आहे.

परमात्मा आपल्या शिवस्वरूपात आणि विष्णुस्वरूपात सदा योगीच आहे. योगीश्वर आहे. सर्व कामद आहे. शिवशंभो आणि श्री विष्णु यांच्यात भिन्नता नाही. अध्यात्मशास्त्रात ह्या अभिन्नतेचे प्रतिपादन केलेले आढळेल.

No comments:

Post a Comment

श्राद्ध न करनेसे हानि

अपने शास्त्रने श्राद्ध न करनेसे होनेवाली जो हानि बतायी है, उसे जानकर रोंगटे खड़े हो जाते हैं। अतः आद्ध-तत्त्वसे परिचित होना तथा उसके अनुष्ठा...