Friday, 5 April 2024

yog prakar (योग प्रकार)

१. मंत्रयोग, २. स्पर्शयोग, ३. भावयोग, ४. अभावयोग, आणि ५. महायोग.

मंत्रजपाचा अभ्यासवश मंत्राचा वाच्यार्थ, स्थित झालेली विक्षेपरहित मनाची जी अवस्था तो मंत्रयोग, मनाच्या त्याच वृत्तीने जर प्राणायामाला प्राधान्य दिले तर तो स्पर्शयोग, तोच स्पर्शयोग जर मंत्राच्या स्पर्शाने रहित झाला तर तो भात्रयोग. ज्याच्या- मध्ये संपूर्ण विश्वाचे रूपमात्राचे अवयव विलीन होतात त्यालाच अभावयोग म्हणतात. ह्यावेळी सद् वस्तूचे भान राहात नसते. त्याच्यात एकमात्र उपाधीशून्य शिवस्वभावाचे चिंतन बाकी उरते आणि मनाची वृत्ती शिवमयच होते. यालाच महायोग असे नाव आहे. बहुधा सर्व योग आठ अथवा सहा अंर्गानी युक्त आहेत. उपमन्यूने कथन केलेल्या महायोगाच्या विवरणामध्ये गोरक्षनाथ प्रतिपादित महायोगा मृत महाज्ञान याचेव तत्त्व अधिकतर सन्निहित आहे.

No comments:

Post a Comment

Privacy Policy

  Privacy Policy This privacy policy applies to the Gorakshsamruddhi app (hereby referred to as "Application") for mobile devices ...