Sunday, 5 April 2020

अक्षय तृतीय


अक्षय म्हणजे कधीही क्षय न होणारे सतगुरूंची कृपा हि अशीच कधीही क्षय न होणारी असते शिष्य कितीही रागावला किवा दूर असला तरी त्यांची शिष्याप्रती असणारी कृपादृष्टी हि दिवसानुदिवस वाढतच जाते. त्याच प्रमाणे भगवंताची कृपाद्रुष्टी असते मनुष्य योनी सोडून जसे भूत, पिशाच्च, देव, गंधर्व, किन्नर यांनी जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे वचन दिले तर ते मोडत नाही फ़क़्त मनुष्यच आपल्या स्वार्थी स्वभावानुसार आपण दिलेले वचन तोडून फ़क़्त आपलेच हित चिंतीत असतो.

अक्षय तृतीया या दिवशी केलेल्या कुठल्याही कार्याचे फळ हे कधीही संपत नाही त्यामुळे या दिवशी आपल्या पितृदेवतांना प्रसन्न करून त्यांचे शुभआशीर्वाद प्राप्त करून घ्यावे. त्यांना यथोचित तर्पण देऊन तृप्त करावे. मोक्ष गायत्री मंत्र जप करून त्यांना मोक्ष प्राप्त करून द्यावा. आपल्या जीवनातील ऐश्वर्य, कीर्ती, संतती, आयुष्य, मोक्ष प्राप्ती हे पितृ देवतांच्या हातात असते त्यामुळे त्यांचा  आदर करून सर्व प्राप्त करून घ्यावे.

मोक्ष गायत्री मंत्र -     
पितरांच्या नावाने ७ पिंड बनवून त्याबरोबर तुपाची ज्योत लावावी , त्याची पूजा करावी , मातीच्या मडक्यात गंगा जल आणि पंचामृत टाकून समोर ठेवावे , वरील मंत्राचा १५१ वेळेस जप करावा , शंखाच्या सहाय्याने ५-५ वेळेस पाणी वाहावे , खीर, हलवा पुडी इत्यादी पंचपक्वान्नचा नैवेद्य दाखवावा. 

सत नमो आदेश | गुरूजी को आदेश | ॐ गुरूजी | ॐ सों का सकल पसारा , अक्षय योगी सबसे न्यारा | सद्राला तोड़ चौदह चौकी यम की तोड़ हंसा ल्याऊ मोड़ हंसा तो ला कहा धरे अलष पुरुष की सीम  , हंस तो  निर्भय भया काल गया सिर फोड़ निराकार के जोत मै रती न खणड़ी हो , कौन कौन साधू भया ब्रम्हा विष्णु महेश , वे साधू ऐसे भये यम ने पकडे केश , मोक्ष गायत्री जाप सम्पूर्ण भया | श्री नाथजी गुरूजी को आदेश | आदेश | आदेश |  

14 comments:

  1. अक्षय तृतीया या दिवशी नक्की काय करावे याबद्दल खुपच चांगले मार्गदर्शन ...आदेश नंदेश नाथ

    ReplyDelete
  2. 🙏नंदेशनाथ आदेश. खूप उपयुक्त आणि कल्याणकारी माहिती. नक्की करू पूजा

    ReplyDelete
  3. धन्यवाद
    प्रत्येक वेळी आपण जे अमूल्य मार्गदर्शन करतात त्यामुळे कोणत्यावेळी काय करावे याचा योग्य मार्ग मिळतो

    ReplyDelete
  4. खूप छान माहिती दिली

    ReplyDelete
  5. धन्यवाद नन्देश नाथ 🙏

    ReplyDelete
  6. योग्य मार्गदर्शन दिले.खुप धन्यवाद

    ReplyDelete
  7. पितरांना फळांचा नैवेद्य दाखवल्या शिवाय प्रथम फळ जसा आंबा ह्या season मध्ये येतो तो खाऊ नये असा काही असता का?

    सागर

    ReplyDelete
  8. नंदेश नाथजी आदेश

    ReplyDelete
  9. खूप छान मार्गदर्शन

    ReplyDelete

Privacy Policy

  Privacy Policy This privacy policy applies to the Gorakshsamruddhi app (hereby referred to as "Application") for mobile devices ...