Saturday 4 April 2020

मी नंदेशनाथ - २८

अनेकांचे म्हणणे असते ध्यानाला बसलो कि मन सैरभैर होते. लक्ष एकाच ठिकाणी राहत नाही सारखे काही विचार येत असतात किती लक्ष एकवटण्याचा प्रयत्न केला तरी होत नाही आणि मग ध्यान होत नाही.

मुळात ध्यान हि कल्पना म्हणजे आपले विचार शून्य करणे नाहीये मन हे चंचल असते त्याला थांबवू शकत नाही जर ते थांबले तर आपल्या भावना नष्ट होतील आपले मन एका क्षणात अब्जावधीचे अंतर पार करून जाऊ शकते त्यामुळे त्याला जर एकाच ठिकाणी  अडकवले तर  कल्पनाशक्तीच्या जोरावर आज पर्यंत जे अजरामर लिखाण केले गेलेले आहे ते यापुढे होणार नाही त्यामुळे आधी मनाला विनाकारण त्रास देन किवा दडपून ठेवण बंद केल पाहिजेल.

आपण सर्व गृहस्थी धर्माचे पालन करणारे आहोत सर्व कामकाज, व्यापार करून भगवंताला वेळ देतो हे त्याच्यावर केलेले उपकारच आहेत खर तर. दिवसभर केलेल्या कामाची आठवण हि ध्यान करताना येणारच आहे फ़क़्त आपल्याला त्याच्या वेग कमी करायचा आहे आज ध्यान करायला बसलो आणि ३ तास ध्यान लागले असे एक दिवसात होऊ शकत नाही त्यासाठी वर्षोनुवर्षे सवय करावी लागते.

ध्यानाची सुरवात हि प्राणायाम आणि योगासन यांनी करायला हवी. अति त्यांच्या आहारी जाऊ नये जे प्राणायाम करून आपला श्वासोच्छवास हा शुद्ध म्हणजे आपल्याला समजेल असा होणार आहे तेवढेच करावे जास्तीत जास्त १ किवा २ त्यापेक्षा जास्त नको आणि मग विशिष्ट मंत्राचा जप करावा आणि अनुभव घ्यावा.


मी नंदेशनाथ - २७ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ २६ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ - २५ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ -२४ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ - २३ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ - २२ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ - २१ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ - २० साठी येथे click करा

मी नंदेशनाथ - १९ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ - १८ साठी येते click करा.

मी नंदेशनाथ - १७ साठी येथे click करा

12 comments:

  1. अगदी अचूक बोललास। साधना नीट होत नाही असे नेहमी वाटते पण तरीही ती सातत्याने करावी । तुमचे भाव आणि सातत्य खूप महत्वाचे असते

    ReplyDelete
  2. विजय कुलकर्णी4 April 2020 at 21:19

    ध्यान आणि बैठकी बाबत अत्यंत उपयुक्त असे मार्गदर्शन

    ReplyDelete
  3. धन्यावाद...... या पेक्षा अजून काय पाहिजे... नाथांनी पहाटे विचारलेल्या अडचणीचे निवारण सकाळी सकाळी केले.... आभार..... 🙏

    ReplyDelete
  4. मन भटकले म्हणजे धयान ज़ाल नही या भावणेतून जी निराशा येते ती निघुन गेली । सागर

    ReplyDelete
  5. सगळ्याचे मनातले ओळखून खूप छान मार्गदर्शन ,नंदेश नाथ आदेश

    ReplyDelete
  6. खरच ध्यानाला बसल्यावर मॅन लागत नाही पण काय करावे ह्यावर काय करावे ह्याची उपयुक्त माहिती आपण दिली त्याबद्दल आपले धन्यवाद

    ReplyDelete
  7. ह्या तुमच्या मार्गदर्शयामुळे मनात येणाऱ्या खूपशा शंकांचे निरसन होते, धन्यवाद.

    ReplyDelete
  8. खरच मला या मार्गदर्शनाची आवश्यकता होती.धन्यवाद

    ReplyDelete
  9. खूपदा असंच होतं कि आपण नुसतं देवा समोर बसतो आणी मन मात्र अगदी काहीही विचार करत असतं ....अगदी काहीही ...पण तुम्ही सांगितलेले मार्गदर्शन मुळे विचारांना थोडी स्थिरता येईल 🙏 👍धन्यवाद नन्देश नाथ

    ReplyDelete

श्राद्ध न करनेसे हानि

अपने शास्त्रने श्राद्ध न करनेसे होनेवाली जो हानि बतायी है, उसे जानकर रोंगटे खड़े हो जाते हैं। अतः आद्ध-तत्त्वसे परिचित होना तथा उसके अनुष्ठा...