Wednesday, 4 March 2020

मी नंदेशनाथ - २५

परमतत्व, शून्य, महाशुन्य, हे शब्द ऐकले असले तरी समजण्याच्या पलीकडे आहे. साधकाने जे दिसत नाही ते पाहण्याचा प्रयत्न करावा. जे समजत नाही ते समजून घेण्याचा प्रयत्न करावा. दिसलेले सर्व काही आपल्या चित्तात साठवून ठेऊन त्यावर विचार,विमर्श करणे गरजेचे आहे.


अध्यात्मात प्रगती करायची असेल तर ती हसत खेळत करायला हवी क्रोध जास्त येऊ देऊ नये. क्रोधीत होऊन कोणाशी बोलू नये, जमिनीवर पाय आपटून चालू नये याने आपल्या मनातील असलेल्या तत्वाला ठेच लागते. अन्नावर तुटून पडू नये अति जेऊ नये, अति झोपू नये याने आपली अध्यात्मातील वाटचाल मंदावते.

जे ज्ञानी असतात ते गंभीर स्वरूपाचे लोक आपल्या ज्ञानाचे कधीही प्रदर्शन करीत नाही. उथळ पाण्याला खडखडाट फार असे आपले होऊ देऊ नये. त्या अनाहत नाद ऐकण्याचा नेहमी प्रयत्न करावा ज्याने आपली या जीवन चक्रातून मुक्तता होणार आहे.     
चैतन्य

आपले मन हेच शिव तत्व आहे आणि मन हेच शक्ती तत्व आहे. त्या शिव-शक्ती तत्वाला पकडण्याचा प्रयत्न करावा तो प्रयत्न फ़क़्त योगमार्गातून साध्य होऊ शकतो. कोणत्याही प्रकारची मांत्रिक,तांत्रिक क्रिया आपल्याला अवधूत पदापर्यंत पोहोचवू शकत नाही.

मी नंदेशनाथ -२४ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ - २३ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ - २२ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ - २१ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ - २० साठी येथे click करा

मी नंदेशनाथ - १९ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ - १८ साठी येते click करा.

मी नंदेशनाथ - १७ साठी येथे click करा.

5 comments:

  1. 🙏 👏👏👏👏👏वा नन्देश नाथ तुम्ही दिलेल्या माहिती ने प्रथमच समजले की अध्यात्मात या छोट्या गोष्टी इतक्या महत्वाच्या असतात thnx 👍

    ReplyDelete
  2. तुमचे असेच मार्गदर्शन आम्हाला लाभावे ही नाथांच्या चरणी प्रार्थना....फारच छान मार्गदर्शन केलेत , धन्यवाद

    ReplyDelete
  3. खूप छान मार्गदर्शन करता, असेच तुमचे मार्गदर्शन कायम लाभो.

    ReplyDelete

Privacy Policy

  Privacy Policy This privacy policy applies to the Gorakshsamruddhi app (hereby referred to as "Application") for mobile devices ...