Monday, 20 April 2020

मी नंदेशनाथ - ३१

प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते हे खरे आहे कारण बऱ्याच लोकांना नेहमी वाटत असते मला भगवंताने दर्शन द्यायला हवे  सर्व देवी देवतां मला दिसायला हव्या. 

परंतु एक लक्षात असू द्या आपण मनुष्य आहोत  अंधाऱ्या खोलीत गेल्यावर ज्या प्रमाणे एखाद्या काठीला आपण साप समजतो आणि नंतर समजते की ती काठी आहे तसच भगवंता सोबत नको व्हायला अचानक देव समोर आले आपली पात्रता नसताना तर किती घाबरून जाऊ आपण  साधे डोळे बंद करून बसलो तरी किती विचार येतात मनात आणि अचानक कोणी आल तर मृत्यू येऊ शकतो. 

भगवंताचे दर्शन घेण्याची क्रिया अगदी सोपी आहे स्वतः आराध्याच आपली ती पात्रता करून घेतो आपल्याला साधनेची सवय लावतो आपल्याला कडून अनेक साधना करून घेतो योग करून घेतो मन हे चंचल असते ते शांत एकस्थिर करून घेतो ऊर्जा काय आहे तिची जाणीव करून देतो कुंडलिनी शक्तीचे अस्तित्व दाखवून देतो आणि मग समोर येऊन उभा राहतो. 

त्यामुळे घाई करू नका सत गुरूंनी दिलेल्या मार्गावर चालत रहा नाथ तुमची वाट बघत आहे. 

4 comments:

  1. खरं आहे मनाची घाई होतेच
    निरंतर स्थिर होऊन अविरत चालत राहणे हेच खरं

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. आपल्या आराध्य ला भेटायची घाई झाली असते ना म्हणून असे होते पण तुम्ही छान सांगितले आणि डोळे उघडले

    ReplyDelete
  4. नामों आदेश. योग्य मार्गदर्शन केल्या बद्दल धन्यावाद.

    ReplyDelete

Privacy Policy

  Privacy Policy This privacy policy applies to the Gorakshsamruddhi app (hereby referred to as "Application") for mobile devices ...