Thursday, 16 April 2020

मी नंदेशनाथ -२९

नाथांना काही नकोय काही म्हणजे काहीच फक्त तुमचा वेळ आज गेले 6 वर्ष मी अनाहत पर्यंत पोहोचलो आहे. मागे जाऊन विचार केला तर समजत की मीच स्वतः किती उशीर केला ह्या गोष्टीला माझ्या कडे वेळ होता बसायला जागा होती परंतु ध्यानाला बसायचा कंटाळा केला.

आज अनाह द मधील तो सुखद असा अनुभव घेतल्या नंतर या आनं दा पेक्षा जगात काही वेगळ असूच शकत नाही ही जाणीव झाली. आज घरात नाथांचा एक फोटो सुद्धा नाहीये मी कधी धूप, दीप, अगरबत्ती सुद्धा लावत नाही फक्त डोळे बंद करून बसतो आणि जप सुरू करतो.

कितीतरी येणारे फोन हे रंभा, भैरवी साधना मागतात त्यातून उत्पन्न काय होणार आहे हे नाथच जाणे. पण एक मात्र नक्की ह्या बाह्य साधना भौतिक सुख लगेच देतात परंतु मोक्ष प्राप्ती साठी आराध्याचा बीज मंत्रच कामी येतो. 

खरी परीक्षा ही आलेल्या पहिल्या अनुभवा पासून सुरु होते हे लक्षात ठेवा एक अनपेक्षित अनुभव आला की त्या नंतर किती तरी दिवस अनुभव शून्य जातात आस वाटत की आपण बरोबर करतोय ना? की काही चुकतंय परंतु नाथां च आपल्या वर प्रत्येक क्षणी लक्ष आहे आपण करत असलेली प्रत्येक कृती ते पाहत असतात आपण जेवढे त्यांच्या जवळ जाऊ तेवढे ते आपल्या जवळ येतात हा माझा अनुभव आहे. 

2 comments:

  1. योग्य वेळी योग्य मार्गदर्शन

    ReplyDelete
  2. सुरेख मार्गदर्शन

    ReplyDelete

निद्रा मंत्र (Nidra Mantra)

  निद्रा मंत्र ॐ शिवगोरक्ष आदेश सत नमो आदेश, गुरूजी को आदेश, ॐ गुरूजी।। लोटपोट श्रीनाथ जी की ओट, पवन की मढ़ी वज्र का कोट। धरती करू बिछावन अम...