Tuesday, 14 January 2020

मी नंदेशनाथ - २१

आत्मसमर्पण,निरपेक्ष भाव, हे शब्द खूप मोठे असून त्याचा अर्थ माहित नसलेले सुद्धा आज भगवंताजवळ एकरूप झालेले मी पाहिले आहे. कसलीही मोह माया नाही फ़क़्त भगवंत आणि मी हि भावना त्यांना त्या ठिकाणी नेते. अज्ञानात सुख असते या वाक्याचे सूत्र अध्यात्मात पाहायला मिळते अनेक पुस्तके वाचून तत्वज्ञानाचे संभाषण करून भगवंत मिळेल हि खात्री कोणीही देऊ शकत नाही.

जे माहित नाही त्याचा जास्त विचार करत बसू नये फ़क़्त मी जे करतो आहे त्यात सातत्य कसे ठेवता येईल हा विचार मनात असावा. काहींना ५० पेक्षा जास्त वर्ष लागू शकतात अनुभूती येण्याकरता तर काही १-२ वर्षात आपल्या पूर्वकर्मानुसार भगवंत भेट होऊ शकते इतके वर्ष सेवा केली तर हे मिळणारच हि अपेक्षा फोल आहे.

प्रत्येकात काही उणीवा आहेत त्याचा उगाच बाऊ करण्यात अर्थ नाही भगवंत आपल्याला आपण जसे आहे तसे सांभाळतो स्वताला कमी लेखून विनाकारण त्याने दिलेल्या शरीराचा अपमान करू नये. जसे खोटी स्तुती ऐकू नये तसे आपण देखील कुणाची ती करू नये कारण समोरील व्यक्तीने त्यात केलेल्या पापांची शिक्षा आपल्याला भोगावी लागू शकते.
     

मी नंदेशनाथ - २० साठी येथे click करा

Friday, 10 January 2020

मी नंदेशनाथ - २०

आजच्या कलियुगात आपल्याला समाजात राहायचे असेल तर वेगळे आहोत असे वागून चालणार नाही भक्ती करून आपणही त्यातीलच एक आहोत हे दर्शवले पाहिजेल. नाथपंथात अनेक साधना अशा आहेत ज्या रात्रीकाल मधे करायच्या असतात कारण रात्रीकाल मध्ये त्या देवतेशी संबंधित स्पंदने जास्त कार्यरत असतात कितीही लोकांना महत्व सांगितले तरी त्यांना तो अघोरी प्रयोग वाटतो. हवन हे नाथपंथाचे मुख्य अंग आहे विशिष्ठ साधना कालभैरव जे रक्षणाचे कार्य करतात, धूमावती शारीरिक रोग बरे करते, बगलामुखी शत्रूपिडा साठी उपयुक्त आहे असे हवन रात्री केल्यास चांगले फळ देतात. तेच गणपती बुद्धी देतो, संकटांचे हरण करतो,  भुवनेश्वरी ऐश्वर्य प्रदान करते हे हवन सकाळी करावे. मंत्र-हवन करताना खूप मोठ्याने मंत्र जाप करू नये आपल्याला स्वत ला ऐकायला येईल एवढ्याच आवाजात म्हणावा.

महाराष्ट्रात गणपती, हनुमान, नवनाथ, कालभैरव, साडेतीन पीठे यांचीच नित्य नियमाने पूजा-अर्चा, हवन होते आधीच सांगीतल्याप्रमाणे प्रत्येक देवतेचे कार्य वेगळे आहे सर्वाना समान स्थान दिलेच गेले पाहिजेल दशमहाविद्या, अष्टभैरव  ज्याच्या बद्दल अनेक लोकांना माहित सुध्दा नाहीये फ़क़्त घरात वास्तृशांती, सत्यनारायण, नवचंडी करायची सर्वाना जेवायला बोलवायचे आणि स्वताला धार्मिक म्हणवून घ्यायचे हि आपली परिस्थिती आहे.

जमिनीत, शेतात आगीच्या समस्या आहेत,चोरीच्या समस्या आहेत त्या आपल्या आराध्याला सांगून त्यांचे निरासन होणार नाही कारण प्रत्येक ठिकाणी एखाद्या देवतेचे स्थान असते (म्हसोबा) तिथे त्यांना मान देणे गरजेचे आहे जे काम लिपिकाकडून होणार आहे त्या साठी जिल्हाधिकारी यांना त्रास देणे योग्य नाही आणि ते समजण्यासाठी अनुभवाचा आभ्यास महत्वाचा आहे.


मी नंदेशनाथ - १९ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ - १८ साठी येते click करा.

मी नंदेशनाथ - १७ साठी येथे click करा.

Wednesday, 8 January 2020

मी नंदेशनाथ - १९

विज्ञान जिथे संपते तिथे अध्यात्म सुरु होते हे निर्विवाद सत्य आहे परंतु याचा शोध घ्यायचे ठरवले तर  अध्यात्म हे निष्कर्षाचा विषय नसून अनुभवण्याचा विषय आहे. एकापेक्षा एक असे कर्मयोग, ध्यानयोग, हटयोग असे अभ्यासू विषय येथे आहे. प्रत्येक देवतेचे विविध अंग, वेषभूषा, मंत्र, साधना, प्राणायाम यात येतात, एक जन्म पुरणार नाही इतके सारे या अध्यात्मात आहे,  फ़क़्त मनशांती नसून ती दुसऱ्याला अनुभवायला देणारी चैतन्यशक्ती अध्यात्मात आहे.     

आपल्या ऋषीमुनींनी आधी अध्यात्माचा अनुभव घेतला त्यात विज्ञाण सापडले म्हणून अति चिकित्सा करू नये. काय खरे किवा खोटे हे उलगडण्यापेक्षा आपण स्वतः किती अनुभव घेऊ शकतो यावर लक्ष केंद्रित करावे. अध्यात्म हे गुपित ठेवावे कारण आपण घेतलेले अनुभव हे दुसऱ्या व्यक्तीला किती ओरडून सांगितले तरी त्याची किंमत राहत नाही आणि आपल्याला स्वतबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होतात. अध्यात्मात शक्यतो दुसऱ्याचे अनुभव वाचू नये, आपले मन प्रत्येक गोष्टींचे इतके बारीक चिंतन करत असते कि आपण तो अनुभव घेतला आहे किवा मला तो अनुभव येतो आहे असे भास आपल्याला होऊ शकतात.

स्वतला विज्ञानवादि समजणारे आपण विज्ञान आपल्याला काय देऊ शकते याची देखील कल्पना करू शकतो (अणुबॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब)  परंतु अध्यात्मात शिरलेले संत, महंत, ऋषी, मुनी यांनी आपल्याला आज पर्यंत काय दिलेले आहे हे आपल्याला माहित आहे जे सात्विक आहे ते फ़क़्त आपली सनातन संस्कृतीच आपल्याला देऊ शकते त्यामुळे आपण करत असलेल्या प्रत्येक अध्यात्मिक गोष्टीचा आपल्याला अभिमान असायलाच हवा. 


मी नंदेशनाथ - १८ साठी येते click करा.


Tuesday, 7 January 2020

मी नंदेशनाथ - १८

नोकरी लागत नाही, लग्न जमत नाही, संतती समस्या, घरात दारिद्र्य आहे, आजार आहे ह्या समस्या सोडून आज शक्यतो दुसरी कोणतीच समस्या उद्भवत नाही. कोणाकडे गेले कि सांगतात करा नारायण-नाग बळी आपण मनापासून करतो देखील परंतु पुढील १-२ वर्ष हे समजण्यात जाते कि नक्की कुठल्या उपायाने आपली समस्या दूर झाली आहे. परत २-३ वर्षा नंतर समस्यांचा ओघ वाढू लागतो आणि पूजा-पाठ-देव यावरचा विश्वास उडू लागतो.

नारायण-नाग बळी प्रत्येकी ३.५ वर्षांनी करावा असा अधिनियम आहे, आपण आयुष्यात एकदा करतो आणि आता सर्व समस्यांचे निरासन होईल अशी आशा बाळगतो. एक लक्षात असू द्या आपण आपल्या ७ पिढींचे उत्तर-दायित्व निभावत असतो प्रत्येक पितृ दैवताच्या आपल्याकडून अपेक्षा वेगळ्या असतात. आपण नारायण बळी विधी करताना ज्या व्यक्तींची नावे घेतो त्या पितृदैवतांना मुक्ती मिळतेच परंतु एकाच विधी मध्ये सर्वाना मुक्ती मिळेल असे नाही. व्यक्ती मरणासन्न अवस्थेत असताना जे विचार मनात येतात त्यानुसार आपल्याला पुढची गती प्राप्त होते आणि आपण करत असलेल्या पुण्याकर्माचे फ़क़्त ५%-६% इतकेच फळ आपल्याला मिळत जाते बाकीचे आपल्या स्वगोत्रीयांमध्ये वाटप केले जाते हा विधीचा नियम आहे. यातील प्रमाण वाढवायचे असल्यास रोज नित्यनियमाने सेवा,साधना करणे अत्यंत गरजेचे आहे.

पितृ दैवतांना खुश ठेवायचे असेल तर मोक्ष गायत्री मंत्र जाप नक्की करावा त्याने पितरांना मुक्ती मिळते. रोज पितृदैवतांना तर्पण दिल्यास आपल्यावर ऐश्वर्य, समृद्धी याचा वर्षाव सतत होत असतो. ज्यांना त्वचे संबंधित आजार आहेत त्यांनी रोज तर्पण केल्यास त्वचा उजळून निघते हा अनुभव मी घेतला आहे.


मी नंदेशनाथ - १७ साठी येथे click करा.

Monday, 6 January 2020

मी नंदेशनाथ - १७

साधना, सेवा, जप, तप करताना अनुभव येतात परंतु आलेल्या अनुभवांवर मन संतुष्ट नसते. अनेक सिद्धींची लालसा मनात घर करून असते परंतु हे लक्षात असू द्या हे कलियुग आहे. आज पर्यंत सर्व सिद्धी प्राप्त झालेले किती सिद्ध साधक आपण पाहिलेले आहेत? एकही नाही त्याचे कारणही तसेच आहे कलियुगात भक्तीमार्ग श्रेष्ठ दिला आहे त्यात फ़क़्त नामाचा जप करणे क्रमप्राप्त आहे. सिद्धी प्राप्त होण्यासाठी १२ वर्ष पूर्ण तप एकाजागी बसून डोळे बंद करून नाथांचे स्मरण करत करणे गरजेचे आहे एवढे करून जो योगी,महायोगी सिद्धी दाखवण्यात दंग झाला तर नियती त्याच्यावर नाराज होते म्हणून जे सिद्ध आहेत ते दाखवत नाही आणि जे छोटे,मोठे प्रयोग करतात हे जाहिरातबाजी करत फिरतात.

तुम्ही या जन्मात नाथांची सेवा करणार आहात हे जेव्हा ठरते त्या आधीच नियती अनेक सिद्धी तुमच्या जवळ आणून ठेवतात पण आपले मन अनेक वासनांनी भरलेले आहे त्यात स्वार्थ, मत्सर, द्वेष या भावना आपण जसेजसे मोठे होत जाऊ तसे वाढत जातात म्हणून आपल्या कडे लहानपणा पासून मुलांना स्तोत्र पठन, मंत्र जाप करायला सांगतात किंबहुना ते करायलाच हवे ज्यामुळे शुद्ध स्पंदणांचे वलय आयुष्यभर आपल्या सोबत असते.

आजही अनेक सिद्ध, योगी, महायोगी आपल्याकडे आहे जे हिमालयात निवास करून रोज शुद्ध स्पंदन भूतलावर आपल्यासारख्या भगवंतावर विश्वास न ठेवणाऱ्या लोकांसाठी अवकाशात सोडतात. त्यामुळे आपल्याला त्यांचे दर्शन जरी झाले तरी मनुष्य जन्म सार्थक झाल्यासारखे होईल, परंतु आपले प्रारब्ध त्यात आडवे येते म्हणून आपण ह्या सर्व गोष्टीचा अनुभव घेण्यावाचून वंचित राहतो.



मी नंदेशनाथ - १६ साठी येथे click करा.

Sunday, 5 January 2020

मी नंदेशनाथ - १६

नाथांना तुमच्याकडून कसलीही अपेक्षा नाही, फ़क़्त तुम्ही एखादे काम करताना त्यांना स्मरून सुरु केले आणि त्यांना काम झाले कि समर्पित केले कि त्या कामात विघ्न येत नाहीत. नाथ फ़क़्त तुमच्यातील आत्मिक शक्ती त्या कामाबद्दल किती आहे तेच बघतात.
साधना, सेवा करताना चुका अनेक होतात जसे मांडणी व्यवस्थित नसणे, मंत्र चुकणे, पूजा पद्धती माहित नसणे काही कामानिमित्त खंड पडणे. यासारख्या गोष्टी घडतात परंतु याने घाबरून जाऊ नये. सुरु केलेले कार्य पूर्णत्वास घेऊन जाणे जशी आपली जबाबदारी आहे, तशीच आपल्या सद्गुरूंची आणि नाथांची सुद्धा आहे त्यामुळे आपल्या मनातील भाव शुद्ध ठेऊन कार्य करत राहावे.

प्रत्येक साधकाला रोज अनुभव यायलाच पाहिजेल असे व्हायला नको, ज्याप्रमाणे प्रत्येकाची क्षमता वेगळी असते त्याप्रमाणे फळ मिळत जाते, अमुक व्यक्तीला किती छान अनुभव येतात मला येत नाही असे विचार सुद्धा मनात आणू नये. आपल्या साठी काही विशिष्ट नियोजन आहे हा भाव असावा. प्रत्येकाचे प्रारब्ध, संचित, कर्म, भक्ती, श्रद्धा, विश्वास वेगवेगळे आहेत त्यानुसारच अनुभव येणार आहे हे लक्षात असू द्या.    

तुम्ही जन्माला येण्याच्या अगोदर तुमचे नशीब लिहिलेले असते त्यामुळे नाथांचे नाव आपल्या मुखात आले कि ती त्यांचीच इच्छा आहे हे समजावे. नाथांच्या इच्छेशिवाय आपण त्यांचे नाव सुद्धा घेऊ शकत नाही. फ़क़्त आलेले नाम पुढे चालू ठेवायचे कि नाही हे फ़क़्त आपण ठरवावे.


मी नंदेशनाथ - १५ साठी येथे click करा.

श्राद्ध न करनेसे हानि

अपने शास्त्रने श्राद्ध न करनेसे होनेवाली जो हानि बतायी है, उसे जानकर रोंगटे खड़े हो जाते हैं। अतः आद्ध-तत्त्वसे परिचित होना तथा उसके अनुष्ठा...