Friday 10 January 2020

साधक , अनुभुती

दिधले तुम्हा व्रतरुपी पियुषी 
 परी तुम्ही रममाण नाशवन्त आयुषी

साधकधर्म न तुम्हा समजला
अध्यात्म मार्ग तुम्ही बाजू सारला

वेळ न पाळे शब्द न कळे 
तरी दुसऱ्याच्या मिळकतीवर जळे

त्याग व निष्ठेचे पोकळ वचन
तरी आम्ही करतो सहन

कधी केला काहो या मनाचा विचार
कृती पुढे ते दिलेले शब्दही लाचार

विश्वास जे आम्हांवर दृढ ठेविती
त्याच्या झोळीत सुखे नांदती

अहंची बाधा त्यजून जे भजती
त्यांचीच होते खरी उन्नती
असे कसे प्रारब्ध हे मज जीवनी
माया मोठी भासे गुरुशब्दाहुनी

तगमग जीवाची असह्य होऊनि
पाझर फुटे आपसूकच या नेत्रातूनी
  *एक साधक ला आलेली नाथ उपज*

No comments:

Post a Comment

श्राद्ध न करनेसे हानि

अपने शास्त्रने श्राद्ध न करनेसे होनेवाली जो हानि बतायी है, उसे जानकर रोंगटे खड़े हो जाते हैं। अतः आद्ध-तत्त्वसे परिचित होना तथा उसके अनुष्ठा...