तन व मन यांच्या मुळे धन निर्माण होते म्हणून या साखळीत ते सर्वात शेवटी आहे.. धन हे कोणत्याही स्वरूपाचे असू शकते. व ते दान करण्यासारखे असते..
द्रव्य असो किंवा अध्यात्मिक संपत्ती असो धन हा विचार आणि कृती यांचे अंतिम स्वरूप (साधन) आहे. आपण कमावलेले नाव, साधनेत प्रसन्न झालेले दैवत हे सुद्धा तर धनच आहे.
काहीही केले तरी काय कमावले यास महत्त्व आहे. त्यातून आपली मेहनत दिसते.
धनाचा वापर करणे सुद्धा योग्य प्रकारे होणे गरजेचे आहे.
उदा. महिन्याला आपण जे द्रव्य कमावतो ते आधी आपल्या अत्यावश्यक गरजांना वापरणे व त्यानंतर थोडी बचत व त्यातून काही उरल्यास चैन करायला खर्च करणे महत्वाचे आहे.. आपण चैन करायला पाहिले सुरुवात केली तर आपल्या मुख्य गरजा दुर्लक्षित राहतील.
धन हे संपण्यासाठीच असते. आपल्याला मिळालेले आयुष्य हे सुद्धा धन आहे. जे खर्च होते आहे.. मग त्याचा वापर कसा करायचा ते आपल्या हातात आहे. योग्य तन व मन चा वापर केल्यास या आयुष्याला योग्य आकार येतो. जन्माला आला आणि पाणी वाहून मेला अशी आपली गत होण्यापेक्षा विधायक कार्यात आपले आयुष्यरूपी धन वापरले तर तेवढिच पुण्यप्राप्ती होऊन मोक्षप्राप्ती साठी वाट सुकर होईल. योग्य सद्गुरू मार्गदर्शन हे यासाठीच महत्वाचे असते.
आपले आयुष्य हे खूप गुंतागुंतीच विशाल चक्र आहे. सुख दुःख व भावना हे मनाचे खेळ आहेत. पण आपले आयुष्यच आपलं सर्वात मोठं धन आहे. व त्याचा योग्य वापर करावा हेच महत्वाचे.
प्रसन्न संध्या प्रदीप कुलकर्णी
Eye opener and totally different perspective
ReplyDelete