सद्गुरूंना शरण तन मन धन या तिन्ही ने जावे असे म्हणतात. यातील तन हा विषय म्हणजे आपले शरीर व त्याची कृती.. तन मन व धन या व्यतिरिक्त कोणतेच साधन अस्तित्वात नाही..
तन हे दृश्य वा अदृश्य असे कृती करण्याचे साधन आहे.. त्याची क्षमता बरेचदा मर्यादित असते.. पण खूप महत्त्वाची असते.. तनाने साथ दिल्यास असंभव सुद्धा संभव होऊ शकते.. एखादी साधना करायची म्हणाल्यास बैठक घेण्यासाठी तन हे प्राथमिक साधन आहे. खूप श्रम केलेले असल्यास तन साथ नाही देत.. थकवा आल्यास आपण अपेक्षित वेळ बैठक नाही घेऊ शकत.. त्यामुळे आपल्या तनाला तसे तयार करावे लागते.. उदा. लहान मुलाला चालण्यासाठी स्वतःच्या तनाला म्हणजे पायाला तयार करावे लागते मग एक एक पाऊल टाकायला तो शिकतो मग पळायला शिकतो तसेच आपण आपल्या शरीराला एखाद्या गोष्टीची सवय लावायला सुरुवात केल्यास ते त्याप्रमाणे तयार होते.. एखाद्या नवीन अध्यात्मिक क्षेत्रात आलेल्या माणसाला बैठक ही हळूहळू वाढवावी लागते पहिल्याच प्रयत्नात साडेतीन तास बैठक अशक्य आहे (सद्गुरू किंवा आराध्य कृपा नसल्यास अशक्य आहे असं).
याचे अजून एक खूप सुंदर उदाहरण म्हणजे स्वामी विवेकानंद. ते एका वाचनालयात जात असत व मोठं मोठी पुस्तके एका दिवसात वाचून नवीन पुस्तके घेऊन जात असत. एकदा वाचनालयातल्या माणसाने त्यांना त्यांच्या वाचनाबद्दल विचारले तर त्यांनी अगदी पान क्रमांक सकट त्यांनी नेलेल्या पुस्तकातील मजकूर त्यांनी सांगितला.. म्हणजे आपण अशक्य सुद्धा सवयीने शक्य करू शकतो तसे आपल्याला आपल्या शरीराला प्रशिक्षित करता येते.
जितेंद्रिय म्हणजे ज्याने आपली इंद्रिये जिंकली आहेत तो काहीही करू शकतो. व्यायाम शाळेत लोक जातात तर ते आपल्या तनाची शक्ती वाढवायलाच ना?
तनाची साथ असल्यास साधना करण्यास अडचण येत नाही.. झोप येत नाही, तहान लागत नाही, भूक लागत नाही माणूस त्या साधनेत लवकर प्रगती करतो. श्वासोच्छ्वास हे तनाचे कार्य आहे त्याद्वारे अजपाजप होणे हे सुद्धा साधनेचा प्रकार आहे.
आपली तनाची शक्ती आपणच मर्यादित ठेवतो. आज जे विश्वात नाव कमावणारे खेळाडू आहेत ते केवळ तनावार अमर्याद मेहनत घेऊन पुढे गेले आहेत.
तनाची योग्य काळजी घेणे सुद्धा एक गरज आहे. आपण स्वतःला जपल्यास इतरांना आपला त्रास कमी होतो. प्रत्येकाचे शरीर वेगवेगळे असते व ते जास्तीतजास्त कार्य करण्यालायक बनवणे आपल्या हातात आहे. सर सलामत तो पगडी पचास यानुसार राहावे. स्वतः सोबत आपल्या माणसांनाही जपावे.
अध्यात्मिक दृष्ट्या जर आपण तनाने सद्गुरूंना शरण गेलो तर आपल्या प्रत्येक कृतीवर त्यांचे लक्ष राहते व येणारे भोग सहन करण्याची व त्याचा त्रास कमी करण्याची आपली शक्ती वाढते. साधना उत्तम होतात, प्रारब्धात नसलेल्या चांगल्या गोष्टी घडतात इ. अनेक फायदे होतात. मुळातच प्रत्येक जण इथे जाण्यासाठी आला आहे. मग मृत्यूचे वृथा भय कमी होते. मृत्यू हे अंतिम सत्य आहे पण तत्पूर्वी आपण आयुष्य जगणे व मोक्षप्राप्तीसाठी मेहनत घेणे हे कार्य शरीराने साथ दिल्यास व सद्गुरू मार्गदर्शनने उत्तम रित्या करता येते.
khupch mahatvache margdarshan
ReplyDeletekhupch mahatvache margdarshan
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDelete