एकदा का अध्यात्मिक मार्गाला लागलो की माणसाला अनेकानेक रस्ते दिसू लागतात. इथे प्रत्येक गोष्टीला किंवा प्रश्नाला उत्तर आहे याची त्याला जाणीव होते. मग त्याला समजते की या मार्गात जेवढे करू तितके ते थोडे आहे.
प्रत्येक साधनेचा वेगवेगळा अनुभव व परिणाम जीवनावर होत असतो. या मार्गात करोडो शुद्ध व सिद्ध मंत्र आहेत. अगदी मार्गतले अडचणी दूर करण्यापासून विविध सिद्धी मिळवण्यासाठी अनेक प्रकारचे मंत्र आहेत.
पण मग कोणत्या वेळी कोणती साधना करणे आवश्यक आहे ते काही केल्या समजत नाही. यासाठी सद्गुरू मार्गदर्शन आवश्यक असते. आपल्या भूत व भविष्यात होणाऱ्या गोष्टींना अनुरूप तेच आपल्याला साधना देऊ शकतात.
बरेचदा आपल्याला वाटते की मला ही साधना काही कामाची नाही किंवा यापेक्षा मी दुसरी साधना करतो म्हणजे माझी आताची गरज भागेल पण जर आपल्या साधनेला सद्गुरूंचा पाठिंबा नसेल तर आपली सद्गुरुप्रति शरणागती कमी आहे असे समजावे. अशा प्रकारे केली गेलेली साधना ही वाया तर जातेच पण त्यासोबत आपले भविष्यातील संकट जास्त गडद करून जाते.
सद्गुरू शब्द प्रमाण मानून साधना करणे हेच या अध्यात्मिक मार्गातील यशाचे गमक राहिले आहे. तुम्हाला काय हवे आहे ते पाहून कदाचित सद्गुरू साधना नाही सांगणार पण तुमच्यासाठी काय योग्य आहे ते सदगुरु 100% सांगतील आणि हा विश्वास जोपर्यंत तुमच्यात रुजत नाही तोपर्यंत या अध्यात्मिक साधनेच्या समुद्रात आपण किनाऱ्यावरच आहोत असं समजावे.
सरतेशेवटी मी काय करू हा स्वतःला विचारलेला विषयच या मार्गात चुकीचा आहे कारण या मार्गात कर्ता करविता सद्गुरु असतो. हा प्रश्न या मार्गात कधीच स्वतःला विचारू नका तो कायम सद्गुरू आणि आराध्य यांना विचारा आणि मग बघा यश व सुख कायम तुमच्या घरी नांदेल.
आदेश
Pkul
सकल जीवन जगण्याचे सार /मर्म आपण सांगितले आहे
ReplyDeleteकृत कृत्य झालो आम्ही
आदेश
Aadesh
ReplyDeleteखूपच सोप्या शब्दात अमूल्य मार्गदर्शन
ReplyDeleteअप्रतिम मार्गदर्शन
ReplyDeleteअप्रतिम मांडणी
ReplyDelete