Wednesday, 19 February 2020

गोरक्ष समृद्धी व्रत अध्याय - १२

   


श्री गणेशनाथ करतो आदेश तुम्हास ।। रिद्धी सिद्धी सहित ।।  तुम्ही यावे ह्या अध्याया प्रकरणी ।। ।। शके सत्राशे दहापर्यंत।। प्रकटरूपे मिरवले होते महित।। अवतार कार्य संपवून जागो जागी ।। समाधी निर्मून स्वर्गालागी गेले असे।। 2 ।। तरी मही लागी ।। गोरक्ष अडबंग चरपट चौरंगी ।। गुप्त रूप महीवरती वास ।। भक्ता लागी अवलोकीत असे।। धावा केलिया त्यांचा साक्षात्कार घडत असे।। 3 ।। जरी अवतार कार्य संपले असे आपण म्हणालो तरीही वृथा बडबड ।। भक्तांच्या हाके लागी धावीत असे अजूनही क्षणात ।। तेच ते गोरक्षनाथ साधक सबळ व्हावा हाच त्यांचा हेत ।। ४ ।। भक्ता लागी कली माजी ।। साधना रूपी सनद ठेऊन ।। अवतार संपवित असे।। परी सूक्ष्म देहे ।। महीवरी फिरत असती अजूनही ।। जाणतात साधू संत सिद्ध जपी तपी संन्यासी ।। ५ ।। साधकास आत्मबोध व्हावा ।। साधना सफल होऊनि ।। दर्शन घडावे हे ठेऊन मनात ।। नाथ मार्गदर्शन करीत स्वमुखे ।। पुढील प्रमाणे ।। ६ ।।साधकाने प्रथम आराधावा गणेशनाथ ।। कलश स्थापूनी पटलावर ।। मध्यभागी चर्तूदल  कुंकूमाची रेखावी आकृती ।। डावी उजवीकडे स्वस्तिक चीन्ही ।। रिद्धी सिद्धी स्थापाव्यात ।। ७ ।। गणेशाचे सहा रिद्धी चे तीन सिद्धी चे तीन ।। गणा माजी स्थापावे चहू दिशी ।। ८ ।। सिद्धी नव्हे साधी भोळी ।। ही तर साक्षात महासिद्धी ।। तिच्याच उप अष्टसिद्धी अनुक्रमे ।। प्राप्ती प्रकाम्या अणिमा गरीमा ।। ईशीत्वा वशीत्वा प्रथिमा महिमा ।। ह्या आपच येति साधका पाशी ।।विश्वासावर स्वार होऊन ।। एकवीस दिनी दीड घटी ।। ओम ग्लोम गं गणपतये नमः ह्या मंत्राने आराधावा ।। ९ ।। साधना सिद्ध झाल्या परी ।। निर्विघ्न होऊनि साधक ।। जात असे सिद्ध मार्गी ।। १० ।। कुळाचारा प्रमाणे कुळदैवत असती ।। महान त्यासी भजावे साधकाने ।। आराध्य असला सबळ तरी ।। कुळदैवत माता पिता ।। थोर सांभाळतील लडिवाळपणे ।। ११ ।।  कुळदैवत आचरण्यापूर्वी ।। पितृ दैवत संतोषावे ।। आपले पूर्वज असती नरका माजी ।। अनेक दुःख भोग यातना ।। देती साधका माजी।। आयु , पुत्र , यश, स्वर्गवास ।। पुष्टबळ , सुख, समृद्धी ।।  हे सर्व पितृ देवतांच्या हाती ।। १२ ।। साधक पितृदैवता माजी ।। संतुष्ट करिती जरी तरी ।। साधकास मोक्ष मार्ग ।।  हमखास ह्या जन्मी ।। १३ ।। तुम्ही म्हणाल रीत कोणती ।। पितृ आराध्यावे पितृमासी ।। पंधरा दिन बीजबाला मंत्राचे पठण करावे।। पितृ येति ज्या दिवशी घरी ।।  तो दिवस संजीवनी पाठ करावा ।। अमावस्या माजी मोक्षगायत्री सप्त पिंड रूपी आचारावा।। १४ ।। त्या दिवशीचे व्रत हे थोर ।।  साधकास सुख शांती यश देणार ।। नैवेद्यामाजी वड्या पातवड्या,घाऱ्या पुऱ्या ।। कोशिंबिरी ,आंबेरायते, कढी, तळी वडे दह्यात  ।। भात, वरण, सार, आमटी असे षड्रसअन्न ।।  यथाशक्ती  नैवेदया लागी अर्पावे।। त्याने होईल त्यांची नरकातून सुटका ।।  तृप्त होऊन आशीर्वाद देती भरभरून ।। १५ ।। मग तिसरी साधना साधकाने रुद्र भजावा भक्तीने ।। ओम रुद्राय अस्त्राय फट ।।  ह्या मंत्राने साधना आराधावी ।। १६ ।। अंबे लागी होऊनी नतमस्तक ।। कलश रूपी स्थापावी ।। लाल वस्त्र परीधान करून ।।  उत्तर दिशे बैसावे ।। १७ ।। खीर मिठाई फळे फुले ।।  विडा अर्पावा भक्ती भावे ।। ओम ऐं ह्रिम क्लिं चामुंडायै विचै ।।  हा मंत्र घोकावा एकवीस दिनी ।। १८ ।। मग हाका मारुनी काळ भैरवास।। आपल्या रक्षणास प्रार्थवावा ।।उडीद वडा, गूळ फुटाणे ।। कींवा दही गूळ नैवेदय अर्पावा।। ओम भ्रम भ्रम भ्रम क्लिं भ्रम भ्रम भ्रम फट स्वाहा ।।  हा मंत्र घोकावा एकवीस दिन ।।१९ ।। बटुक भैरवावर टाकून जबाबदारी ।।  सुखे असावे साधकाने ।। वरील प्रमाणे नैवेद्य अर्पावा ।।  मंत्र आचारावा ओम ह्रिम बटुक भैरवाय आपदुदारणाय मम रक्षा कुरु कुरु स्वाहा ।। २० ।। असेच साधकाने अष्टभैरव साह्यासाठी ।। सिद्ध राहावे अष्ट साधने प्रति ।।  अष्ट भैरव हे ।। शिव अंश असती भूमीवरील ।।२१।। अष्ट दिशांचे रक्षण करितात ।।  तुमचे ही करतील ।। तुम्ही म्हणाला ते कोण ।। त्यांची नामे पुढील प्रमाणे जाण ।। काळ , व्याळ , वीर भैरव, भस्मकेत , सिद्ध भैरव, रुद्र , ईश्वर , गणभैरव हे अष्ट भैरव असती ।। 22 ।। ह्यांची साधना असे खूप लहान ।। फळ मात्र तिचे अति महान ।। नाथ साधक असाल जरी ।। नित्य घोकीत अजपा जाप जरी ।। रक्षण करावयासी भैरवांची गरज भासत असे ।। 23 ।। निस्सीम भक्तालागी आणावयासी विघ्न।।  अशुभ शक्ती आसुसलेल्या असती ।। त्याने साधकाची अधोगती होतसे निश्चित ।। २४ ।। मन विचार आचरण ।।  ह्यावर दुष्ट शक्तीचा ।।  जोरदार प्रहार नित्य करताती ।। त्याने निस्सीम साधक सेवेलागी मुकत असे ।। २५ ।। अशुभ शक्ती ठेवावयाची असेल जर दूर ।।  नामसाधनेसी साधनेचा आधार मुख्य  जाण ।। साधना तीन दिवसांच्या मासालागी दोन कराव्या साधकाने ।। २६ ।। ह्यापरी दशमहाविद्या शक्ती स्वरूप असतील अति थोर ।।  शिवा सांगे शक्ती जणू दुधात साखर ।। काली , तारा , त्रिपुरसुंदरी, भुवनेश्वरी , छिन्नमस्ता ।। भैरवी, धुमावती , बागलामुखी , मातंगी , कमला ।।  ह्या साधना थोर बलाढ्य करिती साधकासी ।। २७ ।। साधकाने चुकूनही जारण, मारणं, वशीकरण ।।  भूत प्रत्यक्षिकारं, कर्णपिश्याचीनि अघोर साधना करू नये ।। कराल जरी तरी तुमचा प्रवास नारकामाजी निश्चित जाणा ।। २८ ।। जगात व्यवहार पाच देणे ।।  काच घेणे त्याहूनि आगळा हा ।। साधकासी सर्व सुख अपार शुद्ध साधनेमाजी ।। अजपा मंत्राचा हा व्यवहार जगामाजी रोकठोक असे   ।। २९ ।। जपास सहास्य साधना उत्कंठ भक्तीची ।। प्रेरणा साधकामाजी रुजत असे ।। त्याचे अमृताहूने गोड फळ साधक नित्य चकित होत असे ।। 30 ।। जप तप पूजा अर्चा साधना नित्य नेम ।। आचारावा सदबुद्धीने ।। रिद्धी सिद्धीच्या मोहा पायी दुर्दशा होत असे ।। सिद्धीचा आवेग नाथ कृपेस बाधक असे ।। ३१ ।। परी दश महाविद्या ह्या शक्ती स्वरूप ।। रक्षतील साधकास सर्व काळ।। महाविद्या हे शक्तीचे अवतार ।। ३२ ।। जारण मारणं उच्चाटण चेडे कुडे ।। पिश्याच बाधा अघोर मंत्र असतील।। साधकावरी निवर्तेल ती कालिका भवानी ।। साधना तिची चतुर्थी चौदस पूर्णिमा अमावस्या करिदिन लागून करावी ।।ओम क्रीम क्रीम क्रीम कालिकाय नमः हा मंत्र घोकावा ।। 33 ।। दक्षिण दिशी मुख करून ।। कालशासाहित यंत्र स्थापून ।। उडीद वडा दही नैवेद्यालागी अर्पाव ।। ३४ ।।दुजी साधना ती तारा ।। नियम तिचा कालिका साधने परिस  ।। मंत्र उच्चरवा ओम तारा तुरी फट ।। मन हर्ष उल्हास करून ।।३५।। त्रितीय साधना त्रिपुर सुंदरी ।। साधकास वैभव देती अपार ।। सात्विक ती राज राजेश्वरी शुद्ध असती बहू ।। ओम स क ल ह्रिम अ स क ल ह्रिम स क ल ई ह्रिम हसरो फट स्वाहा ।। मंगळवार शुक्रवार आणि पूर्णिमा आवडतीते देवी लागून ।। ३६ ।। चतुर्थ ती साधना भुवनेश्वरी ।। भक्तावर अपार सुखाचा वर्षाव करी ।।भौतिक सुखे नानाविध मिळतील।। मंत्र तो ओम ह्रिम ओम म्हणावा ।। ३७ ।। पंचम साधना छिन्नमस्ता ।। सिद्ध होण्यास कठीण अति दुर्लभ।। साधक वेखंड योगात निष्णात होत असे ।।संकटाचा करील खंड सुख भोगील अपार ।। एक्केचाळीस दिन व्रतस्थ राहून ।। ओम वज्र वैईचेरीणी नमः हा मंत्र घोकावा रात्रं दिन ।। ३८ ।। पुढील साधना ही भैरवी ।। शिव शक्तीचा असे मेळ ।। अनेक रहस्य भेद उलगडतील तियेच्या साधनेने ।। कुंडलिनी परम शक्ती भैरवी साधना ।। हा आधार मुख्य तयाचा ।। शुभ वार शुभ दिनी करावे साधना साधकाने ।। मंत्र अनेक असती भेद अनेक तिचे ।। रहस्य उलगडेना उच्च सधका माजी ।। ३९ ।। सप्तम ती साधना धुमावती ।। शत्रू नाश असंख्य बला ।। कपट मंत्र अनेक विकार बाधा ।। भक्षण करी हाच नैवेद्य तिचा ।। पूर्वापार चालत आला असे ।। ४० ।। अमावस्या शनिवार दिनी दक्षिणदिशे कडे तोंड करुनी ।। सरसो तेलाचा चौमुख दिवा लावूनी ।। लवंग,काळे तीळ ,काळे मिरे, मोहरी उडीद, काळा टीका लावून वहावे यंत्रावर ।। ४१ ।। मंत्र तिचा धुं धुं धुमावती ठाः ठाः ।। अकरा एकवीस एक्केचाळीस साधना दिन असे ।। ४२ ।। अष्टम ती बगलामुखी ।। शत्रू संहारीणि अतिदारुण ।। स्वपराक्रमे संपूर्ण शत्रू निवटून ।। अभय देत भक्ता लागे ।।  मंत्र तो ओम ह्रिम बागलामुखी मम् सकल शत्रूनाम वाचं मुखं पदं स्थंभय जिव्हा किलय बुद्धी विनाशय ह्रिम ओम फट स्वाहा ।। ४३।। पितांबरी नाम तिचे ।। पिवळा रंग अति सुखकारी ।। ४४ ।। नववी मातंगी ।।साधना आचरावी धुमावती प्रमाणे ।।ओम मतंगेई फट ह्या मंत्राचा जप करावा ।। ४५ ।। दशम ती कमला ।। कमळ पाकळ्या विराजित ।। कमल पुष्प अर्पून नानाविध भोग देऊन ।। तृप्त करावी जगत जननी ।। मंत्र तो कमला कमले प्रसिदत नमः ।। साधने माजी जपावा ।। ४६ ।। कुळींचे कुलदैवत सांभाळतील मात्या पित्याप्रमाणे करतील कोडकौतुक लडीवाडपणे ।।४७ ll नरसिंह हनुमंत अतिबलिष्ठ बलवान हे दैवत नाथपंथी साधकास रक्षणास उतावीळ हनुमंत ।।४८ll साधकाने जपावा ओम हं हनुमंतये नमः या मंत्राने।।४९ ll असतील जरी कितीही पीडा पनौती साडेसाती नानाविध संकट जसे हनुमंतास रक्षिले रामाने तो साधकास रक्षील पुढील प्रार्थनेने ll ५०ll हे दयार्णव कुळभूषणा ।।सितापते रघुनंदना ।। दशग्रीवांतका भक्तदुःख मोचना ।। धाव पाव वेगेसी ।। ५१ll हे करूननिधे ताटीकांतका ।। मुनिमनोरंजना रघूकूळटिळका ।। आयोध्याधीशा प्रतापार्का ।।धाव पाव वेगेसी।।५२ ll हे शिवमानसरंजना ।। चापधारक तापहरणा ।। शरयुतीरविहारा आनंदसदना ।। धाव पाव वेगेसी ।।५३ll हे श्रीराम श्यामतनुधारका ।। एक वचनी व्रतदायका ।।एकपत्नीबाणनायका ।। धाव पाव वेगेसी।।५४ ll हे पंकजनेत्रा कोमलगात्रा । बिभीषणप्रिया कोमलपात्रा ।। परमप्रिय कपिकूळगोत्रा । धाव पाव वेगेसी।। ५५ ll हे विश्व मित्रमखसिधिकारका ।। खरदूषणादिदैत्यांतीका ।। जलधीजलपाषाणतारका ।। धाव पाव वेगेसी ।। ५६ll  हे अहिमही दानवहारिता ।। शतमुखखंडी वैदेहिरता ।। मंगळधारणा कुशळवंता ।। धाव पाव वेगेसी।। ५७ ll हे अर्णव विहारा मारीचदमना ।। जटायूप्रिया मोक्षगहना ।। शिवचापभंगा मंगळधामा ।। धाव पाव वेगेसी।। ५८ ll हे दयार्णव राम करुणाकरू । मित्रकूळध्वज किर्तीधारू । ऐसें असुनी संकटपारू ।। सुख शयनी निजला अससी।। तरी आता धाव वेगीं ।। तव दूत या संकट प्रसंगी ।। मुक्त होऊ दे महिलागी । शरणागत तू म्हणवितोसी।। ५९ll रामा जसा तू आला मारुती कारण धावून तैसेचि आम्हा साधकांसाठी हनुमंतासी पाचारावे।।६०ll न येती हनुमंत ततक्षणी तुमच्या पायाची आण  जानकी मातेची आन अंजनी सुतासी सदैव असावी।।६१ll अंजनीच्या पोटी घेतला जन्म त्याची जाण असावी येऊन त्वरित संकट निवारावे साधकापरी।। ६२ ll भक्त संकटी पडता मार्ग असे खुंटता नसे सापडत मार्ग जरी तरी  अराधावा नरसिंह ll६३ll भक्तहित रक्षणासमर्थ असा तो उग्र नरसिंह भजावा नव्वद दिन उपरोक्त मंत्राने ll६४ll ओम उग्रवीर महाविष्णू ज्वलत सर्वतो मुखं भिष्णम भाद्रमच मृतुम मृतूम्च नमाम्यहम ll ६५ ll रक्षणास देईल कवच तो अतिबलीष्ट नरसिंह साधकास सोडू नका कास या नरसिंह कवचाची ll ६६ ll ॐ नमोनृसिंहाय सर्व दुष्ट विनाशनाय सर्वंजन मोहनाय सर्वराज्यवश्यं कुरु कुरु स्वाहा ll६७ll ॐ नमो नृसिंहाय नृसिंहराजाय नरकेशाय नमो नमस्ते ll६८ ll ॐ नमः कालाय काल द्रष्टाय कराल वदनाय च ll६९ ll ॐ उग्राय उग्र वीराय उग्र विकटाय उग्र वज्राय वज्र देहिने रुद्राय रुद्र घोराय भद्राय भद्रकारिणे ॐ ज्रीं ह्रीं नृसिंहाय नमः स्व ll७०ll  ॐ नमो नृसिंहाय कपिलाय कपिल जटाय अमोघवाचाय सत्यं सत्यं व्रतं महोग्र प्रचण्ड रुपाय ll७१ll ॐ ह्रां ह्रीं ह्रौं ॐ ह्रुं ह्रु ह्रु ॐ क्ष्रां क्ष्रीं क्ष्रौं फट् स्वाहा ll७२ll ॐ नमो नृसिंहाय कपिल जटाय ममः सर्व रोगान् बन्ध बन्ध, सर्व ग्रहान बन्ध बन्ध, सर्व दोषादीनां बन्ध बन्ध, सर्व वृश्चिकादिनां विषं बन्ध बन्ध, सर्व भूत प्रेत, पिशाच, डाकिनी शाकिनी, यंत्र मंत्रादीन् बन्ध बन्ध, कीलय कीलय चूर्णय चूर्णय, मर्दय मर्दय, ऐं ऐं एहि एहि, मम येये विरोधिन्स्तान् सर्वान् सर्वतो हन हन, दह दह, मथ मथ, पच पच, चक्रेण, गदा, वज्रेण भष्मी कुरु कुरु स्वाहा ll७३ll ॐ क्लीं श्रीं ह्रीं ह्रीं क्ष्रीं क्ष्रीं क्ष्रौं नृसिंहाय नमः स्वाहा ll७४ll     ॐ आं ह्रीं क्षौ क्रौं ह्रुं फट्, ॐ नमो भगवते सुदर्शन नृसिंहाय मम विजय रुपे कार्ये ज्वल ज्वल प्रज्वल प्रज्वल असाध्यमेनकार्य शीघ्रं साधय साधय एनं सर्व प्रतिबन्धकेभ्यः सर्वतो रक्ष रक्ष हुं फट् स्वाहा ll ७५ ll ॐ क्षौं नमो भगवते नृसिंहाय एतद्दोषं प्रचण्ड चक्रेण जहि जहि स्वाहा ll७६ll ॐ नमो भगवते महानृसिंहाय कराल वदन दंष्ट्राय मम विघ्नान् पच पच स्वाहा ll ७७ llॐ नमो नृसिंहाय हिरण्यकश्यप वक्षस्थल विदारणाय त्रिभुवन व्यापकाय भूत-प्रेत पिशाच डाकिनी-शाकिनी कालनोन्मूलनाय मम शरीरं स्थन्भोद्भव समस्त दोषान् हन हन, शर शर, चल चल, कम्पय कम्पय, मथ मथ, हुं फट् ठः ठः ll ७८ ll ॐ नमो भगवते भो भो सुदर्शन नृसिंह ॐ आं ह्रीं क्रौं क्ष्रौं हुं फट् ॐ सहस्त्रार मम अंग वर्तमान अमुक रोगं दारय दारय दुरितं हन हन पापं मथ मथ आरोग्यं कुरु कुरु ह्रां ह्रीं ह्रुं ह्रैं ह्रौं ह्रुं ह्रुं फट् मम शत्रु हन हन द्विष द्विष तद पचयं कुरु कुरु मम सर्वार्थं साधय साधय ll७९ll ॐ नमो भगवते नृसिंहाय ॐ क्ष्रौं क्रौं आं ह्रीं क्लीं श्रीं रां स्फ्रें ब्लुं यं रं लं वं षं स्त्रां हुं फट् स्वाहा ll८०ll ॐ नमः भगवते नृसिंहाय नमस्तेजस्तेजसे अविराभिर्भव वज्रनख वज्रदंष्ट्र कर्माशयान् ll८१ll रंधय रंधय तमो ग्रस ग्रस ॐ स्वाहा अभयमभयात्मनि भूयिष्ठाः ॐ क्षौम् ll८२ll ॐ नमो भगवते तुभ्य पुरुषाय महात्मने हरिंऽद्भुत सिंहाय ब्रह्मणे परमात्मने ll८३ll ॐ उग्रं उग्रं महाविष्णुं सकलाधारं सर्वतोमुखम् नृसिंह भीषणं भद्रं मृत्युं मृत्युं नमाम्यहम्ll ८४ ll ह्या साधना देत असती नाथ ।।सम्पूर्ण शक्ति स्वरूप ।। अफाट शक्ति संचय साधका परी ।। ८५ ।। हे गुह्यात गुह्य ज्ञान सोपविले गोरखनाथे ।। साधना सिद्धिस तो मुख्य आधार सद्गुरु कृपेचा ।। निस्सीम शरणांगत विनयशील ।। असा जो साधक साधेल अल्पावधित ।। ८६ ।। हे गुह्य तेचं गोरक्षनाथ स्वरूपे ।। अमृताचा वर्षाव करीत असे साधका प्रति ।। तन मन लाउन ।। शक्य तितकी साधना करून ।। सुखी व्हावे ह्या जगती ।। ८७ ।। सोळा विद्या चौसष्ट कलामध्ये ।। सोळा साधना अति थोर वर्णिल्या वर ।। विश्वासावर होऊन स्वार  ।। क्षणाचा विलंब नसावा साधने माजी ।। ८८ ।। जगा माजी अनेक साधना ।। गुप्त रहस्य भरले असे ।। पण जे शाप विमुक्त ।। अशी ही साधना देत असे ।। नाथ स्वमुखे करून ।। साधा आपले हित अति तत्पर ।। ८९ ।।  जगामाजी गोरक्षनाथ व्रतकथा अति गुप्त ।। उच्च साधक साधती आज पर्यंत ।। हे गुह्य व्रत उच्च कोटि साधक आचरत असती ।। दुर्मिळ अतिशीघ्र साधते साधका माजी ।। ९० ।। हे व्रत उघड़ करीत असे नाथ ।। भक्तावरी कृपेची आस म्हणुनी ख़ास व्रत हाती सोपवित असे।। द्यावयास नाथकृपेची सावली भक्तांना ति क्षणोंक्षणी ।। कृपेच्या सावलित बैसून आचारा हे महान व्रत ।। ९१ ।। निवटा पाठीचे विघ्न अति दारुण ।। व्रत केलिया जैसे कापसालागी वन्ही लागत  भस्म होइ क्षणात ।। तैसेच भक्तालागे संकट होईल भस्म लगोलगी ।। ९२ ।। व्रत अचरावे शुद्ध भावे ।। गुरुआज्ञेने किंवा शरणागतीने ।। हे ब्रम्ह चोज ।। जैसे रोगियास अमृत  निर्बळास बळ ।। करंट्यास लक्ष्मी ।। लक्ष्मीचा ओघ ।। ९३ ।। क्षुधा तृष्णा ज्यास त्यास राज भोज समजावा ।। जो साधक अपरिपक्व दुर्लक्षित।। त्यास सरस्वतीचे वरदान ।। ख़ास देणार नाथ महाराज ।। ९४ ।। व्रत करीता अपार सुख लाभेल साधकासी ।। जैसे आळश्यावर गंगानीर ।। पापियासी भोगवतीचे स्नान ।। लोहाकास परिस ।। साधकासी मोक्ष वाट हि असे ।। ९५।। सरकार दरबारी ज्यास जाच अनेक।। त्या माजी सुटका होईल ख़ास ।।  हे असे व्रत गोरक्षनाथ सामर्थ्य कथाद्वारे उघड़ित असे ।। ९६ ।।  कथा ही द्वादश अध्यायी ।। गोरक्षनाथ गुण गाण भरली असे ।। अवतार कार्यात नानाविध चमत्कार ।। प्रसंग रुपी आकलन व्हावे म्हणूनी ।। ९७ ।। ती कथा अति सुरस ।। देवादिकास दुर्लभ ।। गुरु कृपेचा शुद्ध हेत ।। म्हणून मानवा लागी व्रत आचरण्या मिळत असे ।। ९८ ।। अमुचे हे भाग्य थोर।।गुरुकृपा झाल्यावर अशक्य काही नसेची ।। हीच प्रचेति आम्हा लागी मिळत असे वारंवार ।। ९९ ।।तुम्ही आजपर्यंत आला कोरडे खात ।। तूप साखर मजपाशी ।। ते तुम्हा वाढावे म्हणून शंकरनाथ झटत असे रात्रं दिन ।।१०० ।। नाथ सावलित राहण्याचा आनंद ।। तुमच्याही हाती देत असे ।।तुम्ही बसावे सावलीला नाथांच्या आणि सद्गुरुंच्या ।। हा मानस माझा असे।। १०१ ।। रात्रं दिन विनंती करितो नाथास ।। साधक तुमचा सुखी व्हावा।। म्हणूनी नाथ गोरक्ष साहाय्य होत असे साधकास ।।गुह्य गुपित उघड़ित असे ख़ास व्रतामाजी ।। १०२।। हे व्रत जो आचारणार त्यावर ख़ास कृपा असेल नाथांची ह्यवर शंका नसेची ।। सद्गुरु साक्षी ठेऊन नाथ देत असे वचन ।। साधकासी अमुप पुण्य पदरी देत असे ।। १०३।। रविवार अमावस्या पूर्णिमा शुभदिन पाहून ।। व्रत आचरावे साधकाने ।। सुदिनी शुचिर्भूत होऊं अंगणी रांगोळी सजवावी ।। द्वारास लाउन तोरण ।। प्रसन्न अंतःकरणे ।। व्रत करण्यास असावे सिद्ध ।। १०४ ।। एक कलश स्थापुन त्यावर गणेशनाथ रिद्धि सिद्धि सहित। स्थपवा ।। पुण्यावाचन पीठ मंडून स्थापना करावी।। १०५ ।। दूजा चौरंग घेउनि ।। त्यावर भगवे वस्त्र अंथरुनी ।। नवनाथ चौऱ्यांशी यन्त्र स्थापवे ।।त्या माजी रुद्राक्षांचा करावा वापर ।। मध्य भागी कलश स्थापुन ।। त्यावर पूर्ण पात्र ठेऊन त्यावर स्थापावा आदिनाथ उमेसाहित ।। १०६ ।। आदिनाथ तोची शिव तेच गोरक्ष असती ।। त्यांचा करून आदर आवाहनादि मंत्राने ।। मग षोडशोपचार पूजन करावे रुद्राभिषेका लागुनी ।। १०७ ।। मग नैवेद्य करीता पक्का रोट किंवा मलीदा अर्पवा ।।रोट प्रसाद करण्याचे रीत गव्हाचे पीठ त्यात मोहन तूप साजुक ।। गोदुधामध्ये भिजवावा त्यात बडीशोप काळे मीरे पिठिसाखर ख़ास ।।१०८ ।। मिश्रण करूनि एकत्र गोल गोळे करूनि तुपामध्ये तळावे ।। त्या रोटाचा प्रसाद नाथालागी अर्पावा ।। मग आरती करून नाथ कथा ऐकून ।। भोजन समारंभ करावा ।। १०९ ।। त्यात वड़े खिचड़ी अम्बिल घुगरी हे मुख्य पदार्थ असावेत ।। अर्पून नाथांसी विडा संतोषावे नाथांसी ।। व्रत आचारल्या वरि सुख शांति ह्या दोन दासी त्यांच्या घरी ।। ११० ।।कोणी करिती एकतीस कोणी एक्केचाळीस संकल्पिति व्रता माजी ।। व्रताचे आचरण शुद्ध भाव ठेऊन करती सिद्ध।। तैसेची पै आपण करावे ।। १११ ।। ब्रम्ह इंद्रादी देवादिका असाध्य हे व्रत ।। मानवालागे सुलभ मिळत असे ।। मानव जन्म हा मोक्ष साधन ।। चौऱ्यांशी लक्ष योनि पालथी घालून मग जन्मला असे ।। ११२।। हा जन्म म्हणजे लक्ष चौऱ्यांशीचा फेरा ।। येर झरा चुकावी ।। संन्यासी असून व्रत ते करिती ।। नित्य त्यासी साधन हे अल्पतोषवित असे ।। ११३ ।। संसारी असुनी जो साधक करी ।। महिन्या माजी दोनदा व्रत ।। किंवा महिन्यालागी एक पूर्ण श्रध्येने समारंभी ।। तो साधक अति पुण्यवान मही लगी ।। ११४ ।। संसारी साधकास प्रसन्न होती नाथ ।। अति तत्पर ते करून ।। दोन घटीचे हे व्रत ।। लक्ष चौऱ्यांशी योनि चुकावण्यास समर्थ ।। ११५ ।। आज पर्यंत हे व्रत पीर महंत योगी सिद्ध  आचरती ।। नाथ तो गोरक्ष ।। प्रसन्न होउनि चित्ती ।। उघड़ित असे हे ब्रम्हचोज ।। जो असेल भक्तिसि तहानलेला साधक ।। त्याने आपली तृष्णा भागवावी ।। ११६ ।। जैसा भाव तैसा देव ।। प्रत्यक्षीकरण नाथांचे सहज होतसे ।। साधकासी नको मोक्ष नको मुक्ति ।। गोरक्षगण म्हणून पाई तो विसावत असे ।। ११७ ।। नाथ सांगतिल ते काज।। करण्यास समर्थ तो साधक असे ।।भक्ति विना मुक्ति शक्य नसे ।। मुक्तिचे डोहाळे पुर्वित नाथव्रत आचरिता ।। ११८ ।। मुक्तिचे अनेक वेद ।। सायुज्जपर मुक्ति सहज मिळत असे ।।व्रत करण्यास कोण समर्थ ।। बाल अबाल प्रौढ़ आणि वृद्ध ।।कुमारिका स्त्रीस न वेगळे नियम ।। सर्वांमाजी खुले असे ।। ११९ ।। गुप्त गुह्य आत्मचोज ।। गोरक्ष देत असे आपल्या हाती ।। शिव आत्मलिंग तैसे जपावे ।। व्रता बद्दल ठेवतील कूड़े भाव।। अनेक खास करू आणतील विघ्न ।। रव रव नरकात खितपत पड़त असे ।। मही असे पर्यंत ।। १२० ।। नाहीं क्षमा त्यासी नाहीं उद्धार तयाचा ।। आपण बुडून बुडविल पूर्वजा घोर नरकामाजी ।। व्रत अचारिता साहाय्य जो करेल व ऐकेल मनोभावे ।। तो पुण्यास भागिदार अपार ।। १२१ ।। नाथ देहाचा वास तुमच्या घरी सूक्ष्मदेही ख़ास ।। जाणविल तुम्हास वृथा बड़बड़ नसे ही ।। भक्तिलागे साहाय्य ।। साधनेत सिद्ध व्हावयास ।। व्रत हे मैलाचा दगड़ परिमाण   ।। १२२ ।। साधकांच्या अंतरी खुण उमटेल ।। सूचक स्वप्नामाजी व्रताची परिपूर्णता जाणवेल ।। व्रत करितो हा अभिमान  बाळगु नये उराशी ।। भक्तियुक्त अंतःकरणाने शरण जावे गोराक्षनाथांसी ।। १२३ ।। शरण गेलिया साधक नसे दैन्य दुःख त्यासी ।। व्रतामाजी अभिमान हे उतरणीस कारण ।। १२४ ।। आपण ही करावे इतरांसही सांगावे ।। त्यात आत्मसुख हे अति निर्मळ।। साहाय्य त्यास नाथ असती ।। १२५ ।। साधकास नियम रोज आराधावा गोरक्षनाथ गुरुमंत्रे करून ।। मानसपूजे लागून पुजावा तो आपला आराध्य ।। गुरुसि आत्म भावत साक्षी ठेऊन।। नित्य आळवावा गोरक्षनाथ ।। सुखी व्हावे ह्या जगती ।। १२६ ।। धुप दीप नैवेद्य नसे शक्य तरी भावे अर्पवा ।। ना स्थळ ना काळ ना वेळ नकोति एक आसनी पद्धत ।। जमेल तसा भावे करून आपलासा करावा नाथ ।। १२७ ।। भजावा रात्रं दिन जैसा काळ तैसा वेळ ।। नको अवडंबर नको देखावा न लगे मोठेपण ।। फ़क्त नाम साधनेत रत असावे ।। १२८ ।। प्रत्येक नाथ सेवकाने अनुभवावा तो चमत्कार दवडू नये वेळ ।। हित साधा आपले आधी ।। मग जगाचा करा विचार ।। आप मेला जग बुडाले हे सामोर ठेऊन ।। आधी आपण आचरावावा  गोरक्षनाथ व्रतामाजी ।। १२९ ।। नाथ स्वयं ओढूनी अंग करतील काम तुमचे चांग ।। अशक्य काही नसेची ।।भाव तुमचा शुद्ध असुद्याहो नित्य ।। नका दवडु ही संधी ।। १३० ।। नाथ ही माय माउली ।। देतील साधकास सावली ।। वेळ प्रसंगी कठीण जरी ।। तरी साधकाचे हित ही रीत खरी ।। १३१ ।। जेवढे वर्णवे तेवढे थोड़े ।। मजलागी ही कोड़े उलगडेना ।। विना सायास नाथकृपा मिळणार ।। मग इतर उठाठेव का करावी ।। १३२ ।। पुन्हा पुन्हा शंकरनाथ विनवतो नाथांसी ।। जागा द्यावी हो पायी मजसी ।। अगाध कृपा असावी साधकावरी ।। किंचित आळस करू नये ।। १३३ ।। व्रत करीता हाक मारिता साधक ।। सूक्ष्म रूपे प्रकाटावे नाथानी ।। जैसा ज्याचा भाव तैसेची फल द्यावे साधकासी ।। १३४ ।। अल्पमति मी मंद बुद्धि ।। काय वर्णू तुमची ख्याति ।। शब्दाचे भांडार अपूर्ण मज जवळी ।। दाता तुम्ही याचक मी ।। पुन्हा विनवतो हात जोडूनी  ।। १३५ ।। साधकावर नित्य कृपा करावी वेळोवेळी ।। आपपर भाव नसावा ।। शुद्ध भाव मज ठाई द्यावा ।। ही विनवणि करतो तुम्हास ।।१३६ ।। चरणांवरी घालून लोटांगण ।। कायम आस ठेवितो प्रत्यक्ष दर्शनाची ।। रूप तुझे पाहून मन शांत व्हावे ।। ही तहान मज लागली असे ।। १३७ ।। कासाविस होतो मी ।। आता तरी प्रत्यक्ष दर्शन देऊन  तहान भागवावी मज लेकराची।। १३८ ।। रूप पाहण्याचा अट्टहास साक्षात् भेट मज हवी ।। जलाविना तडफड़े जैसा मासा ।। तैसाची कासविस मी होत असे ।। १३९ ।। तरी ह्या अंधळ्याची काठी बनून ।। नित्य असावे समीप ।। हा वेडा हट्ट पूरवावा ।। न तुम्हास हे अशक्य कदापि ।। जाणितो आम्ही म्हणून ठेवली आस तुजपाशी ।। १४० ।। नको दुर्लक्ष मज आणि साधकासी ।। चरा चरात वास तुमचा ।। एकदा तरी दर्शन दे मज पामरासी ।। धरूनी हात माझा ।। ब्रह्मांड भेदन शिकवावे ।। १४१ ।। सूक्ष्मरुपी तीर्थयात्रा घडावी तुज सोबत ।। एकविस स्वर्गाचा मारू फेरफटका ।। भोगवतीचे स्नान करूनि ठेवावे नित्य तुमच्या सोबती ।। १४२ ।। ह्यावर नसे जास्त मागणे माझे ।। कृपा करी मजवरी ।। वचन देतो तुम्हास ।। आत्मभाव साक्षी ठेऊन ।। प्रत्येक साधक परिपूर्ण व्हावा ।। हां अट्टहास बाळगतो मनी ।। १४३ ।। सनातन धर्माची पुन्हा नाव ।। तरु द्या ह्या भुवनी ।। तुमच्या अवरातील एक रहस्य भेद उजगारकारिता आपण ।। ते साधकाच्या हाती देता ।। धन्य मनीतो मी स्वताला ।। १४४ ।। अशीच कृपा सर्वांवरी करी।। हात जोडितो तुम्हास ।। व्रत हे सांगेल जगामाजी न्यून मी पडणार नाही।। त्यासी साहाय्य असावे नित्या नित्य ।। १४५ ।। दुल्लु देवल ह्या स्थानी आपला नित्य वास सतयुगा पासुनि ।। त्या स्थानीच महिमा अति अपार ।। हे व्रत रुपी परिस मज गवसले ।। १४६ ।। हे देत असे संतोषुनी सर्वसामान्यांच्या हाती ।। आश्विन मासी शुद्ध पक्षी पूर्णिमा।। तिथिसी आश्विनि म्हणती तिस।। तैसेची पूर्ण प्रकाश साधकावरी करावा ।। विनवितसे हर्षनाथ ,आचलनाथ ।। १४७ ।। जैसा अश्विनीचा व्रत महिमा दूध आणि साखर त्यात चंद्राचे अमृत किरण ।। तैसाच अमृत वर्षाव साधकावर करी नाथ व्रत आचरिता ।। १४८ ।। धन्य झालो मी ।। मज वर विश्वास ठेउनी ।। व्रत हाती सोपविले ।। १४९ ।।तरी गोरक्षनथाते शंकरनाथ हेचि विनवित ।। कि साधक असोत सुखरूपवंत ।। सर्व अर्थी सर्वदा ।। इति श्री गोरक्षनाथव्रत नाथार्पणमस्तु ।। १५० ।।

Tuesday, 18 February 2020

सतगुरु उपदेश - साधना

साधना म्हणजे , साधकाला आराध्यची गोडी लागावी , आराध्य आपले आहेत ही जाणीव व्हावी, ते फक्त सेवे नि आपलेसे करता येते बाकी कुठली ही जगातील मौल्यवान वस्तू किंवा चीज त्यांना आपलंसं करू शकत नाही , जेव्हा साधना रुपी वेळ & विशिष्ट जप घेतो  तेव्हा त्या देवता , साह्य  होतात , साधकाचे संकट दूर करतात ही प्रथम पायरी ,16 साधना म्हणजे 16 पॉईंट शरीरातील , त्यांना  सक्षम करणे *जसा पैलवान झुंजी साठी कसरत करतो तास साधक तयार  होतो*
संतांनी लिहल आहे:-
सोळा सांधे बहात्तर कोठडी (72 हजार  नाडी म्हणजे 72 कोठडी) हरी ने काया निर्मीयली 9 दरवाजे 10 खिडकी त्यात  आत्मा रुपी मूर्ती बसवली & हा देह देवालय केला *देह देवाचे मंदिर*
 जस घरात माजघर ओसरी स्वयंपाक घर  शयनगृह असे भाग बनवतो त्याला घर म्हणतात तस 16 साधना रुपी खांबावर  हे देहरूपी मंदिर उभारले आहेत , त्यात आराध्य विराजमान व्हावा असे वाटत असेल तर ते मंदिर रोज साफ करावं लावेल *साधनारूपी*  तर देव तिथं थांबेल नाही तर ते देवालय उकिरडा होईल मग त्या देह  रुपी मंदिरात , गाढव & डुकरं लोळतील , आपलं देह देवालय ठेवायचं की उकिरडा बनवायचं हे प्रत्येक साधकाने ठरवायचं 
आजून एक आम्ही साधं  भोळ करतो तस देव पण साधंच देतो जसा भाव तसा देव *काही लोक म्हणतात आम्हाला वेळ मिळत नाही तेव्हा आपल्या आरध्याला ही  वेळ नसतो आपल्या करता, जसे ज्याचे कर्म (सेवा) तसे फळ देतो रे ईशवर तेव्हा वेळ काढा सेवा साधना करा तर सर्व सुख पायाशी लोळतील नाही तर तुम्ही काबाड कष्ट करून लोळताल*

19 02 2020
स्थळ कामाख्या
सकाळी 6 15 ते 6 58 चिंतन

Monday, 10 February 2020

नवग्रह स्तोत्र




जपाकुसुम संकाशं  काश्यपेयं महद्युतिं ।  तमोरिसर्व पापघ्नं प्रणतोस्मि दिवाकरं ॥ (रवि) 

दधिशंख तुषाराभं  क्षीरोदार्णव संभवं ।  नमामि शशिनं सोंमं  शंभोर्मुकुट भूषणं ॥ (चंद्र)   

धरणीगर्भ संभूतं  विद्युत्कांतीं समप्रभं ।  कुमारं शक्तिहस्तंच  मंगलं प्रणमाम्यहं ॥ (मंगळ)   

प्रियंगुकलिका शामं  रूपेणा प्रतिमं बुधं ।  सौम्यं सौम्य गुणपेतं  तं बुधं प्रणमाम्यहं ॥ (बुध)   

देवानांच ऋषिणांच  गुरुंकांचन सन्निभं ।  बुद्धिभूतं त्रिलोकेशं  तं नमामि बृहस्पतिं ॥ (गुरु)   

हिमकुंद मृणालाभं  दैत्यानां परमं गुरूं ।  सर्वशास्त्र प्रवक्तारं  भार्गवं प्रणमाम्यहं ॥  (शुक्र)   

नीलांजन समाभासं  रविपुत्रं यमाग्रजं ।  छायामार्तंड संभूतं  तं नमामि शनैश्वरं ॥  (शनि)   

अर्धकायं महावीर्यं  चंद्रादित्य विमर्दनं ।  सिंहिका गर्भसंभूतं  तं राहूं प्रणमाम्यहं ॥  (राहू)   

पलाशपुष्प संकाशं  तारका ग्रह मस्तकं ।  रौद्रं रौद्रात्मकं घोरं तं केतुं प्रणमाम्यहं ॥  (केतु)   

फलश्रुति :   

इति व्यासमुखोदगीतं  य पठेत सुसमाहितं ।

दिवा वा यदि वा रात्रौ  विघ्नशांतिर्भविष्यति ॥
नर, नारी, नृपाणांच। भवेत् दु:स्वप्न नाशनं ॥
ऐश्वर्यंमतुलं तेषां आरोग्यं पुष्टिवर्धनं ॥
ग्रह नक्षत्रजा पीडास्तस्कराग्नि समुद्भवा ।
ता: सर्वा: प्रशमं यान्ति व्यासो ब्रुतेन संशय: ॥

इति श्री व्यासविरचित ।

आदित्यादि नवग्रह स्तोत्रं संपूर्णं ॥

Sunday, 9 February 2020

I am Nandeshnath - satguru & chakra

There are many complaints that our Guru does not pay attention to us . Today there is a situation where we get to see countless Gurus and each Guru has lakhs of shishyas. But the supreme power who has given a person Guru tatva ( the rights of being a Guru) also gives him/her a power that inspite of having lakhs of shishyas , he/she gives proper attention to each one of them.When a small lamp lit inside a dark room spreads its light all over the room , the same way after associating with the Guru or after meditating a Gurumantra  (after regular meditation) we can come under their light of knowledge.

In Adhyatma , every aspect depends upon purity or cleanliness of our body , trust , belief  and mantra jap(chanting our Guru Mantra). All these aspects have been engaged with each other and that is why never think of --- "I am capable enough , still I do not have anything. How could he get those rights ?" . 
The more you meditate the given Mantra , the more your body will become pure. Purity of body leads to purity of the chakras and purity of the chakras leads to achieve the ultimate Power of Universe. 

The purification of Adnya chakra means getting the vision of Earth-Water-Fire-Air-Sky  elements. 
The purification of Vishudha Chakra means the exchange of the feelings which are included in the Earth-Water-Fire-Air-Sky elements. 
The purification of Anahat Chakra means receiving / absorbing the knowledge which is in Earth-Water-Fire-Air-Sky elements. 
The purification of Manipur Chakra means ultimate power present in the five elements merges inside your soul.
The purification of Swadhishthan Chakra means  development of the five elements by yourself. 
The purification of Muladhar Chakra means your power on the five elements of Universe. The purification of Sahastradal Chakra means leaving the five elements and merging your soul with the Supreme power. 
The sequence here is given in the decending order because in Nath Pant you are asked first to concentrate on the Adgya Chakra and then other Chakras. 
When one of your Chakras get purified then the Chakra above and below the Chakra also starts getting purified. (You can observe the vibration )

Every chakra has its own responsibility or work by which we can receive many Siddhis ( miracle accomplishments ). But never follow those Siddhis. Never do glutton experiments for the purification of these Chakras , it is definitely going to harm you. 
These aspects are completely dependent on  Sadguru, that is why never say that your Guru does not pay attention to you.

मी नंदेशनाथ - २४

खूप साधकांना ज्योतिष, खडे, रत्न याबद्दल विलक्षण ओढ असते त्यात पडून ते अलौकिक असा वेळ व व्यर्थ असा पैसा खर्च करतात आणि पदरी काहीच येत नाही. ज्याप्रमाणे एक डॉक्टर पुढील ५ मिनटाचे निदान सांगू शकत नाही त्याप्रमाणे कोणताही ज्योतिषतज्ञ आपले भविष्य अचूक सांगू शकत नाही ते एक शास्त्र आहे ज्यात अभ्यास आणि तर्क यानुसार भविष्य कथन केले जाते.

प्रत्येकाचा त्यातील वेगळेपणा हा अभ्यास आणि अनुभवानुसार असतो. एका ज्योतिषतज्ञाने सांगितलेले आपल्याबद्दलचे भविष्य हे दुसऱ्या ज्योतिष तज्ञापेक्षा पूर्णपणे वेगळे असू शकते त्यामुळे सर्वांचे एकूण घेऊन आपल्याला जे योग्य वाटते ते करावे. जे नियतीने लिहिले आहे ते कोणाला चुकणार नाही त्यामुळे रत्न किवा ज्योतिष यांच्या अगदी आहारी जाऊन कार्य करू नये.

दत्तगुरू, नवनाथ, महाविद्या , कालभैरव यांची सेवा,साधना केल्यावर नवग्रहांची भिती राहत नाही या सर्व देवतांची संरक्षक कवच आपल्या सोबत असते त्यामुळे ग्रहातून निघणारी किरणे आपल्या सोबत बिघाड करू शकत नाही. आपण जर साधना वगैरे करत नसाल तर नवग्रह मंत्र जाप नियमित केल्याने कुठलेही अशुभ ग्रह आपल्या कुंडलीत राहत नाही सर्व शुभ फल देतात.


There are many seekers who have a keen interest in astrology , stones , gems. They waste their precious time , energy and money but do not succeed. As a doctor cannot exactly predict the circumstances in the next 5 minutes , the same way an astrologer cannot exactly predict the future. It is a science in which future can be predicted through study and logic.

Everyone has a different opinion in it according to his studies and experiences. A future predicted by one astrologer can be completely different from another astrologer . That is why you must listen to everyone and follow your own path. Nobody can change the things written in a destiny. So , do not surrender to astrology and gemology.

Serving  yourselves to Datta Guru, Navnath , MahaVidya , Kalbhairav and doing the appropriate sadhanas, one will overcome the fear from Navagrahas because the protection armour of them will follow you. That is why the rays from each Graha cannot do deterioration to you. If you do not wish to do any kind of Sadhanas , then a regular chanting of  Navagraha Mantra will help you in such a way that an inauspicious graha will not stay in your Kundali and will give you only auspicious effects.

मी नंदेशनाथ - २३ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ - २२ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ - २१ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ - २० साठी येथे click करा

मी नंदेशनाथ - १९ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ - १८ साठी येते click करा.

मी नंदेशनाथ - १७ साठी येथे click करा.

Friday, 7 February 2020

मी नंदेशनाथ - २३

संकल्प शक्ती हि खूप मोठी आहे. कुठल्याही गोष्टीची पूर्णता संकल्पात आहे. परंतु संकल्प घेताना तो आपल्याकडून पूर्ण होईल कि नाही याची काळजी जसा भगवंत करत असतो तशी आपल्याला हि हवीच. कारण जल,अग्नी साक्षी ठेऊन ठराविक कार्यासाठी आपण जीवनशैलीत बदल करून एका गोष्टीकडे मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करणार असतो.

आपण हा प्रयत्न करणार आणि त्यात अशुभ शक्ती आडवी येणार नाही आस होऊ शकत नाही त्यासाठी आपल्या मनाची ध्रुढता महत्वाची आहे. अनेक साधकांना संकल्प कसा घ्यावा याचे ज्ञान नसते आणि ते घेण्याचे ते कष्ट देखील घेत नाहीत.

साधारणपणे संकल्प घेताना आपले गोत्र-नाव यांचा उच्चार महत्वाचा आहे. त्यानंतर आपण कुठे बसून हा संकल्प घेत आहोत याचा देखील उच्चार करावा. आजचे नक्षत्र-वार-करण-तिथी-चंद्र राशी-सूर्य राशी याचे ज्ञान असणे आवश्यक आहे परंतु जर आपल्याला ते माहित नसेल तर आपण त्याऐवजी आपल्या आराध्याचे नाव घेऊन संकल्प पूर्ण करू शकतो.

संकल्प घेताना तो कोणत्या कार्यासाठी घेत आहोत ते देखील महत्वाचे आहे शक्यतो दुसऱ्यासाठी संकल्प आपण घेऊ नये कारण त्या व्यक्तीने ते कार्य पूर्ण केले नाही तर आपण ते कार्य पूर्ण करण्याचे उत्तराधिकारी ठरतो. संकल्पात खूप काही मागू नये आराध्य देवतेचा आशीर्वाद मिळावा इतके करून पाणी सोडून द्यावे.

खूप लोकांचे संकल्प घेऊन ते पूर्ण झालेले नसतात त्यात काही अडथळा येऊन मार्गक्रमण पुढे होत नाही तेव्हा संकल्प करताना आधी पितृदेवतांचे तर्पण करावे त्यामुळे पितृदेवतांची पूर्ण साथ आपल्याला मिळते. कुलदेवतेला मनोभावे पूर्ण निष्ठेने नमन  करून संकल्पास सुरवात करावी.    

एकदम २१,४१ दिवसांचे संकल्प करून जर ते पूर्ण होत नसतील तर आधी ३ दिवसांचे मग ११ दिवसांचे मग २१ दिवसांचे आणि त्यानंतर ४१ दिवसांचे संकल्प करावे. संकल्प करून जर मधेच साधना सेवा खंडित होत असेल तर परत पहिल्या पासून सुरवात करावी त्याआधी समजून घ्यावे कि साधना दैवत आपली परीक्षा घेत आहे.


मी नंदेशनाथ - २२ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ - २१ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ - २० साठी येथे click करा

मी नंदेशनाथ - १९ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ - १८ साठी येते click करा.

मी नंदेशनाथ - १७ साठी येथे click करा.

Thursday, 6 February 2020

मी नंदेशनाथ - २२

इथे जन्मलेल्या प्रत्येकाला जगायचे आहे लवकर मरण कोणाला नको आहे परंतु तरी हि आयुष्यात अपघाती मरण, शारीरिक व्याधी किवा आजार याने मरण किवा आत्महत्या यासारख्या प्रकारामुळे मरण येते. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात तीन वेळेस मरण लिहिलेले आहे असे शास्त्र सांगते त्यातून जर तो वाचत गेला तर आयुष्याची पूर्ण वर्ष तो जगतो.

हे मरण आपले व भगवंताचे अंतर-भाव-भक्ती वाढवण्यासाठी नियोजित केलेले असते. परंतु आज नास्तिकांची फौज इतकी भरलेली आहे कि पहिल्याच बॉल ला सर्वांची विकेट जाते. आपल्यावर आलेले संकट हे भगवंत नियोजित असून त्यावर मार्ग काढणे हे देखील सोपे आहे हे लक्षात येत नाही आणि अनेक साधक परमार्थापासून लांब जातात

नित्यनियमाने जर नामस्मरण, कुलाचार केले गेले तर हे तीनही अल्पमरण टाळता येऊ शकतात. आज अपघात,आजार यांनी मरणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे सरळ साधे मरण लवकर येत नाही. आता खर तर ते येण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कारण वेदना ह्या शरीराला होत असतात आत्मा आधीच हे सर्व जाणून असतो

मी नंदेशनाथ - २१ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ - २० साठी येथे click करा

मी नंदेशनाथ - १९ साठी येथे click करा.

मी नंदेशनाथ - १८ साठी येते click करा.

मी नंदेशनाथ - १७ साठी येथे click करा.

श्राद्ध न करनेसे हानि

अपने शास्त्रने श्राद्ध न करनेसे होनेवाली जो हानि बतायी है, उसे जानकर रोंगटे खड़े हो जाते हैं। अतः आद्ध-तत्त्वसे परिचित होना तथा उसके अनुष्ठा...