यह एक नाथपंथी साधना के प्रचार हेतू बनाया है | Meditation और कुंडलिनी जागृती हेतू मंत्र दिये गये है | शंभूजती गुरु गोरक्षनाथ जी कि पूजा पद्धती और किसी भी संकट से मुक्ती हेतू साधना publish कि जायेगी | ये ब्लॉग किसी भी अंधश्रद्धा का प्रोत्साहन नही करता है | साधना के लिये किसीसे भी पैसे कि मांग नही करता है | कोई भी माला,यंत्र,पूजा सामग्री बेचते नही है और नाही कभी बेचेंगे | समाजकार्य के लिए साधना मुफ्त मै है |
Wednesday, 28 April 2021
अहं
Tuesday, 27 April 2021
श्री महामारी स्तोत्रम्
संयम
Saturday, 24 April 2021
निराकार
मी काय करू?
Friday, 23 April 2021
स्पंदन - भाग ३
Tuesday, 20 April 2021
तन
सद्गुरूंना शरण तन मन धन या तिन्ही ने जावे असे म्हणतात. यातील तन हा विषय म्हणजे आपले शरीर व त्याची कृती.. तन मन व धन या व्यतिरिक्त कोणतेच साधन अस्तित्वात नाही..
तन हे दृश्य वा अदृश्य असे कृती करण्याचे साधन आहे.. त्याची क्षमता बरेचदा मर्यादित असते.. पण खूप महत्त्वाची असते.. तनाने साथ दिल्यास असंभव सुद्धा संभव होऊ शकते.. एखादी साधना करायची म्हणाल्यास बैठक घेण्यासाठी तन हे प्राथमिक साधन आहे. खूप श्रम केलेले असल्यास तन साथ नाही देत.. थकवा आल्यास आपण अपेक्षित वेळ बैठक नाही घेऊ शकत.. त्यामुळे आपल्या तनाला तसे तयार करावे लागते.. उदा. लहान मुलाला चालण्यासाठी स्वतःच्या तनाला म्हणजे पायाला तयार करावे लागते मग एक एक पाऊल टाकायला तो शिकतो मग पळायला शिकतो तसेच आपण आपल्या शरीराला एखाद्या गोष्टीची सवय लावायला सुरुवात केल्यास ते त्याप्रमाणे तयार होते.. एखाद्या नवीन अध्यात्मिक क्षेत्रात आलेल्या माणसाला बैठक ही हळूहळू वाढवावी लागते पहिल्याच प्रयत्नात साडेतीन तास बैठक अशक्य आहे (सद्गुरू किंवा आराध्य कृपा नसल्यास अशक्य आहे असं).
याचे अजून एक खूप सुंदर उदाहरण म्हणजे स्वामी विवेकानंद. ते एका वाचनालयात जात असत व मोठं मोठी पुस्तके एका दिवसात वाचून नवीन पुस्तके घेऊन जात असत. एकदा वाचनालयातल्या माणसाने त्यांना त्यांच्या वाचनाबद्दल विचारले तर त्यांनी अगदी पान क्रमांक सकट त्यांनी नेलेल्या पुस्तकातील मजकूर त्यांनी सांगितला.. म्हणजे आपण अशक्य सुद्धा सवयीने शक्य करू शकतो तसे आपल्याला आपल्या शरीराला प्रशिक्षित करता येते.
जितेंद्रिय म्हणजे ज्याने आपली इंद्रिये जिंकली आहेत तो काहीही करू शकतो. व्यायाम शाळेत लोक जातात तर ते आपल्या तनाची शक्ती वाढवायलाच ना?
तनाची साथ असल्यास साधना करण्यास अडचण येत नाही.. झोप येत नाही, तहान लागत नाही, भूक लागत नाही माणूस त्या साधनेत लवकर प्रगती करतो. श्वासोच्छ्वास हे तनाचे कार्य आहे त्याद्वारे अजपाजप होणे हे सुद्धा साधनेचा प्रकार आहे.
आपली तनाची शक्ती आपणच मर्यादित ठेवतो. आज जे विश्वात नाव कमावणारे खेळाडू आहेत ते केवळ तनावार अमर्याद मेहनत घेऊन पुढे गेले आहेत.
तनाची योग्य काळजी घेणे सुद्धा एक गरज आहे. आपण स्वतःला जपल्यास इतरांना आपला त्रास कमी होतो. प्रत्येकाचे शरीर वेगवेगळे असते व ते जास्तीतजास्त कार्य करण्यालायक बनवणे आपल्या हातात आहे. सर सलामत तो पगडी पचास यानुसार राहावे. स्वतः सोबत आपल्या माणसांनाही जपावे.
अध्यात्मिक दृष्ट्या जर आपण तनाने सद्गुरूंना शरण गेलो तर आपल्या प्रत्येक कृतीवर त्यांचे लक्ष राहते व येणारे भोग सहन करण्याची व त्याचा त्रास कमी करण्याची आपली शक्ती वाढते. साधना उत्तम होतात, प्रारब्धात नसलेल्या चांगल्या गोष्टी घडतात इ. अनेक फायदे होतात. मुळातच प्रत्येक जण इथे जाण्यासाठी आला आहे. मग मृत्यूचे वृथा भय कमी होते. मृत्यू हे अंतिम सत्य आहे पण तत्पूर्वी आपण आयुष्य जगणे व मोक्षप्राप्तीसाठी मेहनत घेणे हे कार्य शरीराने साथ दिल्यास व सद्गुरू मार्गदर्शनने उत्तम रित्या करता येते.
मनातले विचार आणि त्यांचा प्रभाव
मनाचे काम हे विचार करणे आहे. आपण केलेला विचार आणि त्याचा आपल्यावर प्रभाव याचा नक्कीच खूप जवळचा संबंध आहे... जसा आपण विचार करतो तसे आपल्याभोवती स्पंदने निर्माण होतात..
उदा. एखाद्या धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी आपले मन तसा विचार करत असल्याने तशी स्पंदने निर्माण होऊन आपल्याला त्याची अनुभूती सुद्धा येते.
आपले विचार हे आपल्या भोवती स्पंदने निर्माण करण्याची शक्ति ठेवतात.. म्हणून आपल्याला कायम सांगितले जाते की अवघड परिस्थिती आली तरी सकारात्मक विचार करा.. तशी सकारात्मक स्पंदने ही परिस्थिती बदलण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.
याउलट नकारात्मक विचार हे विपरीत शक्तींना आमंत्रित करत असल्याने त्यातून काही चांगल्या गोष्टी घडण्याचे प्रमाण कमी असते..
सकारात्मक विचार हे कोणालाही जीवनात यशस्वी करण्या कामी सहाय्य करतात. अवघड गोष्टीं साठी प्रयत्न करण्याची ऊर्जा देतात.. जितकेपण वैज्ञानिक शोध झालेत ते सकारात्मक प्रयत्न आणि सकारात्मक विचार करून कार्यप्राप्ती साठी कष्ट केल्याने झालेत.. अध्यात्मात जी जी साधना आपण करतो त्यातील मंत्र हे त्या दैवताचा विचार करण्यासाठी असतात.. त्यातून ती आपल्यासाठी कार्य करते.. म्हणून आपल्याला सांगितले जाते की सकारात्मक विचार करा.. आपले मन हे सर्व प्रकारची विचार निर्मिती करते.. त्यामुळे आपल्याला सांगितले जाते की आपले मन हे आराध्याला अर्पण करा.. म्हणजे त्यातून आपले विचार कमी होतील व केवळ आराध्य निर्मित निर्मळ स्पंदने आपल्या भोवती तयार होतील.. सद्गुरुंचे निरंतर सान्निध्य पासून ब्रह्मांड भेदन पर्यंत अनेक गोष्टी या मन व त्यातील विचार सद्गुरूंना दान केल्याने शक्य आहेत. पण याचा सुद्धा फार थोडा अभ्यास केला गेला आहे.
वाईट बुद्धीचे तांत्रिक लोक हे बरेचदा आपले विचार ताब्यात घेण्याची क्षमता ठेवतात व त्यातील चांगली स्पंदने आकर्षित करून त्याची शक्ती त्यांच्या कामी वापरतात.. विचार हे एक शस्त्र आहे असं समजले तरी काही हरकत नाही तसेच विचार ही एक ढाल सुद्धा आहे.. मग ते आपण कसे वापरावे ते आपल्या हातात आहे. मनी वसे ते स्वप्नी दिसे.. काही स्वप्ने ही संकेत म्हणून पण येतात तर हे चक्र मनात तयार होते व सत्यात सुद्धा अवतरते. मन तारक असते तसेच मारक सुद्धा असते..
विचारपूर्वक विचार करा म्हणजे कृतीत दिसेल.
Pkul
धन
तन व मन यांच्या मुळे धन निर्माण होते म्हणून या साखळीत ते सर्वात शेवटी आहे.. धन हे कोणत्याही स्वरूपाचे असू शकते. व ते दान करण्यासारखे असते..
द्रव्य असो किंवा अध्यात्मिक संपत्ती असो धन हा विचार आणि कृती यांचे अंतिम स्वरूप (साधन) आहे. आपण कमावलेले नाव, साधनेत प्रसन्न झालेले दैवत हे सुद्धा तर धनच आहे.
काहीही केले तरी काय कमावले यास महत्त्व आहे. त्यातून आपली मेहनत दिसते.
धनाचा वापर करणे सुद्धा योग्य प्रकारे होणे गरजेचे आहे.
उदा. महिन्याला आपण जे द्रव्य कमावतो ते आधी आपल्या अत्यावश्यक गरजांना वापरणे व त्यानंतर थोडी बचत व त्यातून काही उरल्यास चैन करायला खर्च करणे महत्वाचे आहे.. आपण चैन करायला पाहिले सुरुवात केली तर आपल्या मुख्य गरजा दुर्लक्षित राहतील.
धन हे संपण्यासाठीच असते. आपल्याला मिळालेले आयुष्य हे सुद्धा धन आहे. जे खर्च होते आहे.. मग त्याचा वापर कसा करायचा ते आपल्या हातात आहे. योग्य तन व मन चा वापर केल्यास या आयुष्याला योग्य आकार येतो. जन्माला आला आणि पाणी वाहून मेला अशी आपली गत होण्यापेक्षा विधायक कार्यात आपले आयुष्यरूपी धन वापरले तर तेवढिच पुण्यप्राप्ती होऊन मोक्षप्राप्ती साठी वाट सुकर होईल. योग्य सद्गुरू मार्गदर्शन हे यासाठीच महत्वाचे असते.
आपले आयुष्य हे खूप गुंतागुंतीच विशाल चक्र आहे. सुख दुःख व भावना हे मनाचे खेळ आहेत. पण आपले आयुष्यच आपलं सर्वात मोठं धन आहे. व त्याचा योग्य वापर करावा हेच महत्वाचे.
प्रसन्न संध्या प्रदीप कुलकर्णी
Sunday, 4 April 2021
नैवेद्य
Thursday, 1 April 2021
स्थान
श्राद्ध न करनेसे हानि
अपने शास्त्रने श्राद्ध न करनेसे होनेवाली जो हानि बतायी है, उसे जानकर रोंगटे खड़े हो जाते हैं। अतः आद्ध-तत्त्वसे परिचित होना तथा उसके अनुष्ठा...
-
सिद्ध कुंजिका स्तोत्र YOUTUBE LINK - https://www.youtube.com/channel/UCV-iouc8aQUBO0lHZZ6gwpg Google ...
-
तारा महाविद्या साधना YOUTUBE LINK - https://www.youtube.com/channel/UCV-iouc8aQUBO0lHZZ6gwpg Google Play Store - ...
-
नवग्रह शाबर मन्त्र YOUTUBE LINK - https://www.youtube.com/channel/UCV-iouc8aQUBO0lHZZ6gwpg Google Play ...