Monday, 30 December 2019

मी नंदेशनाथ - १५

सातत्यपूर्ण सेवा हेच भगवंतप्राप्तीचे साधन आहे. चराचरात तोच समाविष्ट आहे हि भावना आपल्यात भक्ती जागृत करते. भक्तीची उत्कट भावना म्हणजे अत्यानंदाची चाहूल आहे. आणि तोच आनंद म्हणजे मोक्ष ! इतकी मोक्ष प्राप्तीची व्याख्या सोपी आहे.

डोळे उघडे असताना मनुष्य सतत साधना,सेवा,अध्यात्म करण्याचा विचार करतो, काम करताना यातून वेळ मिळाला कि मंदिरात जाईल, मठात जाईल अशी भावना ठेवतो. पण तेच डोळे बंद करून बसला कि त्याला संसारातील करत असलेल्या कर्मांची जाणीव होते आणि साधना भंग होते. यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे रोज एक वेळ नामस्मरणाची ठरवून घ्यावी. रोज त्याच वेळेत भगवंत स्मरण झालेच पाहिजेल हा अट्टाहास असलाच पाहिजेल. साधना, सेवा करताना कसलीही फळाची अपेक्षा करू नये असे सर्व सांगतात पण आज कुठल्याही स्वार्थाशिवाय भक्तीकरने हि सोपी गोष्ट नाही हीच आपली खरी परीक्षा आहे.

दुखातून अध्यात्माचा मार्ग सुरु होते असे कितीतरी उदाहरण आपल्याकडे आज आहेत परंतु आनंद झाला म्हणून अध्यात्मात उतरलो असे बोटावर मोजण्याइतके लोक समाजात आहे. आनंद म्हणजे फ़क़्त पैसे मिळणे, सर्व कामे होणे, कुठलेही संकट नसणे हे नसून माझ्यातले मी पण संपवून परमेश्वरासोबत एकरूप होऊन तोच कर्ता-धर्ता आहे हि भावना ठेवणे होय.

आदेश |



मी नंदेशनाथ - १४ साठी येथे क्लिक करा.
tps://gorakshsamruddhi.blogspot.com/2019/12/blog-post_29.html








Sunday, 29 December 2019

मी नंदेशनाथ - १४





आज ५०% पेक्षा जास्त लोकांना त्यांची कुलदेवता माहित नाही. गावची देवी, आम्ही खूप वर्षा पासून तिथेच जातो, लांब आहे जाणे शक्य नाही म्हणून हिलाच कुलदेवी मानले आहे - अशी सर्रास वाक्ये आपल्याला ऐकायला मिळतात. पण एक लक्षात असू द्या काहीतरी कारणानेच त्या जगतजननी ने वेगवेगळी रूपे घेतली आहे आणि आपली कुलदेवी म्हणून स्थापन झालेली आहे त्यामुळे शक्य असेल तर लवकर आपल्या कुलदेवी चा शोध घ्या कारण कुलदेवी एकदा प्रसन्न झाली तर त्या संपूर्ण कुटुंबाचे अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य अनेक संकटांनी मुक्त होते.

आज कुटुंबाला सलग ३३-३५ वर्ष पर्यंत लक्ष्मी ची प्राप्ती होत असते त्यानंतर कुलधर्म,कुलाचार नीट न केल्याने अधोगती होण्यास सुरवात होते आणि शेवटी दारिद्र येते. जर कुलदेवी माहितच नसेल तर जमल्यास कुलदेवीची मानसपूजा नक्की करावी आणि तिला प्रार्थना करावी, प्रार्थना फळास जाऊन मार्ग नक्की दिसतो.

कुलदेवी आणि कुलदेवता यात खूप फ़रक़ आहे, हे दोघे हि आपल्या कुळाचे आई-बाप आहे, त्यामुळे त्यांना कधीही नाराज करू नये. खूप लोकांच्या बाबतीत असे निदर्शनास येते कि ते फ़क़्त करतील तर कुलदेवीच आणि बाकी कसलच नाही कुलदेवी-कुलदेवता एकच आहे असा त्यांचा समज होतो पण तसे नसून आपण मनोभावे कुलदेवी-कुलदेवता यांना शरण जाऊन आज पर्यंत न केलेल्या कार्याबद्दल माफी मागावी, शेवटी ती आई आहे माफ तर करेलच.

महत्वाचे एक लक्षात ठेवा आज प्रत्येक घराण्यात पितृदोष आहे आणि पितृदेवतांना शांत करण्याचे कार्य हे फ़क़्त कुळाचे रक्षण करतेच करू शकतात इतर कोणाचीही मध्यस्थी त्यांना चालत नाही. 

Saturday, 28 December 2019

मी नंदेशनाथ - १३

दुसऱ्याचे कर्म आपण घेणे म्हणजे जिवंतपणी नरक यातना भोगणे होय. नियती प्रत्येक कर्माचा हिशोब ठेवत असते त्यामुळे आपण इतरांच्या कर्मात आडवे गेलो तर त्याची फळे आपल्याला भोगाविच लागतात. म्हणून अध्यात्मात किवा जीवनात इतरांसाठी विनंती करणे धोक्याचे असू शकते, जो तो त्याच्या मार्गाने क्रमण करत असतो आणि प्रारब्धा प्रमाणे त्याला मार्गदर्शन मिळत असते म्हणून आपण दुसरा काय करतो आहे किवा त्याचे दोष काय आहे ते पाहू नये किंबहुना त्याचा विचार सुद्धा करू नये कारण ते स्पंदन आपल्याला सुद्धा त्रासदायक होऊ शकतात.

आपण चांगले करायला गेलो आणि कोणी आडवे आले नाही तर नवल झाल्यासारखे होते, प्रत्येक चांगल्या गोष्टीत अडथळे हे येतच असतात, अडथळ्यांची शर्यत पार करत भगवंता पर्यंत पोहोचणे म्हणजेच अध्यात्म. प्रत्येक अशुभ शक्तीला (negative energy ) ला तुमच्यात शुभ शक्ती ( positive energy ) विकसित झालेली आवडत नाही त्यामुळे सुद्धा मार्गात अडथळे येतात. त्यामुळे प्रत्येकाने जमल्यास एक कवच सिद्ध करून ठेवावे. गुरुआज्ञेनुसार सिद्ध कवच मिळाल्यास ब्रम्हराक्षस सुद्धा ते कवच भेदू शकत नाही.

इतरांच्या मागे शक्ती कोणती आहे, त्यांचे त्रास काय आहे हे शोधण्यासाठी व ते कमी करण्यासाठी परमेश्वर अधिकारी व्यक्तींची निवड करतो व त्याचे कार्य त्यांना सोपवतो. आपण आपले आई-वडील-भाऊ-बहिण-बायको--मुल फ़क़्त यांचाच विचार नेहमी करावा आणि यांच्याच भल्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी. इतरांची चिंता करू नये.



Friday, 27 December 2019

मी नंदेशनाथ - १२

आपल्या गुरुंच आपल्या कडे लक्ष नाही अशा अनेक तक्रारी नेहमी येत असतात, आज असंख्य गुरु आणि प्रत्येक गुरूंचे लाखो शिष्य अशी परिस्थिती पाहायला मिळते आहे. परंतु भगवंताने ज्यांना गुरु तत्व दिल आहे त्यांचे लाखो जरी अनुयायी असतील तरी आपल्या शिष्याच्या प्रत्येक कृतीकडे त्याचं बारीक लक्ष असत. जसे अंधाराच्या खोलीत एक दिवा पेटवल्या नंतर संपूर्ण खोली जशी प्रकाशमान होते तसेच गुरूंच्या सहवसात आल्यानंतर किवा गुरुमंत्र घेतल्या नंतर (नियमित जप केल्यानंतर) आपण त्यांच्या प्रकाशछायेत जातो.

अध्यात्मात प्रत्येक गोष्ट हि आपली शरीर शुद्धता, विश्वास, श्रद्धा, मंत्र जाप यांनी वेढलेली आहे. या सर्व गोष्टी परस्परात अडकल्या आहेत त्यामुळे मी योग्य असून मला काही न मिळता जो काही करत नाही त्याला अधिकार कसे मिळाले हा विचार करू नये.
जेवढा जास्त मंत्र जाप तेवढी शरीर शुद्धता, शरीर शुद्ध म्हणजे चक्र शुद्ध, आणि चक्र शुद्ध म्हणजे भगवंत प्राप्ती.

 आज्ञा चक्र शुद्ध होणे म्हणजे पृथ्वी-जल-अग्नी-वायू-आकाश  तत्व दिसणे, विशुद्ध चक्र शुद्ध होणे म्हणजे पृथ्वी-जल-अग्नी-वायू-आकाश तत्वात असणाऱ्या विचारांची देवाण घेवाण होणे. अनाहत चक्र शुद्ध होणे म्हणजे पृथ्वी-जल-अग्नी-वायू-आकाश या तत्वातील असलेले ज्ञान आपल्याला होणे. मणिपूर चक्र शुद्ध होणे म्हणजे पंच तत्वातील सर्व शक्ती तुमच्या अंतरंगात समाविष्ट होणे, स्वाधिष्ठान चक्र शुद्ध म्हणजे पृथ्वी-जल-अग्नी-वायू-आकाश तत्व स्वत विकसित करणे , मूलाधार चक्र शुद्ध होणे म्हणजे पंचमहा भूतांवर तुमची सत्ता असणे  आणि सहस्त्राद्ल चक्र शुद्ध होणे म्हणजे पंच तत्व सोडून भगवंता सोबत एकरूप होणे होय. यात क्रम हा उलटा दिला आहे कारण नाथ पंथ मध्ये साधना करताना आधी आज्ञा चक्रावर ध्यान करायला लावतात आणि मग बाकी चक्र.
जेव्हा तुमचे एक चक्र शुद्ध होते तेव्हा त्या चक्राच्या वरचे व खाली असलेले चक्र शुद्ध व्हायला सुरवात होते
(म्हणजे स्पंदन जाणवतात).

 प्रत्येक चक्राचे कार्य वेगळे आहे त्यातून अनेक सिद्धी प्राप्त होतात पण त्यामागे लागू नये, चक्र शुद्ध करताना किवा जागृत करताना कुठलाही अघोरी प्रयोग करू नये त्याने हानी निश्चित आहे. हे सर्व सतुगुरुंच्या अधीन आहे त्यामुळे आपल्या गुरूंचे आपल्यावर आपल्या वर लक्ष नाही असे म्हणू नये.

Thursday, 26 December 2019

मी नंदेशनाथ - ११

आपल्यातला मी पणा संपवायचा असेल तर स्वतची परीक्षा घ्यायला हवी. ती परीक्षा मानसिक,शारीरिक कष्ट दायक असायला हवी पण त्यातली सात्त्विकता आपण सोडू नये. नाथ आपली परीक्षा कधीच घेत नाही आणि घेतली तरी सांगून घेतात, त्यामुळे आपण त्याला पूर्ण तयार असायला हवे. कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अडचणी किवा रोग व्याधी ह्या भगवंताच्या परीक्षेच्या भाग आहे असे समजून आपण त्या भगवंताचा/नाथांचा अपमान करतो आहे हे लक्षात ठेवावे.

आपण जे पेरल आहे ते उगवणार हा नियतीचा नियम आहे नियतीच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही. या सृष्टी मध्ये कोणतीही गोष्ट परमपिता परमेश्वरच्या इच्छेशिवाय होऊ शकत नाही हे जरी खरे असले तर मानवी मनातले षडरिपू जे आहेत ते आपल्याला मिळालेले श्राप आहे ते आपण जे खातो, वाचतो, विचार करतो त्यातून निर्माण होतात त्यामुळे आपलाच फ़क़्त त्यावर ताबा असतो, नियतीच्या फेऱ्यात कोणीही ढवळा-ढवळ करीत नाही आणि म्हणूनच आपण प्राप्त परिस्थिती मध्ये आपल्या कडून भगवंताच्या नामाचा विसर पडणार नाही याची काळजी घ्यावी म्हणजे आपल्यावर संकटे येणार नाही आणि आले तरी त्याची झळ आपल्याला बसणार नाही.

मी जन्माला का आलो, सर्व संकटे माझ्यावरच का येतात, देव माझीच का परीक्षा घेतो हे प्रश्न  समोर येणे स्वाभाविक आहे परंतु ८४ लक्ष योनी मधून आपल्याला मनुष्य जन्म मिळाला आहे म्हणजे आपल्या कडून त्याची काहीतरी अपेक्षा असेल म्हणून त्याने आपल्याला ह्या लायक बनवल. त्यामुळे जास्त विचार न करता भगवंताच्या नामात बेभान होऊन त्याच्या जवळ जाण्याची आशा कायम ठेवावी.

आदेश.   

Monday, 23 December 2019

मी नंदेश नाथ - १०

तीर्थक्षेत्रान चे महत्व बोलावे,लिहावे तेवढे कमीच आहे. तेथील उर्जा, चैतन्य हे अनुभवायचे असते. सध्या सर्वजण ५-६ तासांचे प्रवास करून मंदिरात जातात आणि १० min दर्शन झाले कि लगेच माघारी येतात आणि ओरडून सांगतात खूप छान दर्शन झाले मूर्ती खूपच प्रसन्न होती शृंगार तर देखणा होता.

सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी दगडाची कोणतीही मूर्ती हि सजवल्यावर चांगलीच दिसणार आहे महत्वाचे आहे तेथील चैतन्यशक्ती.भारतात पवित्र, पावन असे अनेक क्षेत्र आहे त्यात १२ ज्योतिर्लिंग, ४ धाम, गिरनार, तिरुवन्नामलाई, हनुमंतांची, शनी महाराजांची, नाथांची, दशमहाविद्याची इतकी ठिकाणे आहेत कि संपूर्ण आयुष्य कमी पडेल.आपण त्यात कुठे जावे हे आपल्याला सदगुरु शिवाय कोणी सांगणार नाही. 

दगडा समोर कितीही डोकं आपटले किवा नाक घासले तरी फळ मिळणार नाही पण त्यात असणाऱ्या चैतन्य शक्ती ला भक्तियुक्त अंत करणाने नमस्कार करावा. भक्ती भोळी अंधविश्वास युक्त नसून श्रद्धा आणि विश्वास यांचा समन्वय असलेली असावी. 

Sunday, 22 December 2019

I am Nandeshnath -8

As we know a doctor cannot diagnosis himself,the same way we cannot do any of our work without the guidance of someone. The universe is full of the atomic energy, so until and unless we ask according to our wishes, we cannot achieve or get anything. The reason behind this is that there are many negative powers who are always ready to stop you from your goals. That is where the ultimate power and our Guru comes to us to lessen our pain. At that time if you mistrust them , then you have started your journey on the everlasting fire / hell - world. 
"I tried the remedy you gave me for my worries , but there was no effect " , these words by someone hurt as much as a sharpen weapon. 

In today's world there are several self announced Gurus around us. Every human being is not the same, so everyone should not be scaled same. 
Until and unless you have a deep study of anything, do not enjoy it or else you will not get anything. Wherever there is original Guru Parampara , you must surrender only there and absorb yourself on the feet of Nath ji.

मी नंदेशनाथ -९

अध्यात्मात सातत्य हे अत्यंत आवश्यक आहे. कोणतीही गोष्ट जोपर्यंत आपण मिळवत नाही तोपर्यंत आपल्याला तिची किंमत खूप जास्त असते एकदा हातात आली कि किंमत नष्ट होते असे भगवंताच्या बाबतीत नको व्हायला. नाथांना मिळवन खूप सोप आहे पण त्यांची साथ,सहवास टिकून ठेवण खूप अवघड.

एखादी साधना सुरु केल्यावर वेळ जमून येत नाही, महत्वाची कामे येतात, वृद्धी, सुतक लागणे असे प्रकार घडतात तेव्हा समजावे कि ज्या देवतेची आपण साधना करतो आहे ती देवता आपल्यावर नाराज नाही पण परीक्षा घेत आहे. साधना म्हणजे तुमची श्रद्धा आणि विश्वास मोजण्याचे एक साधन आहे.

गणपती, कुलदेवता, आराध्य यांच्या साधना करतात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो अनेक वेळा साधना नव्याने सुरु करावी लागते अशा वेळेस घाबरून जावू नये किवा मधेच सोडून देऊ नये. साधना नव्याने सुरु करावी आणि आपल्या सतगुरूंना शरण जावे म्हणजे ते मध्यस्थी करून आपली आणि साधना दैवताची सांगड घालून देतात.     

Saturday, 21 December 2019

मी नंदेशनाथ -८

ज्या प्रमाणे डॉक्टर स्वतचे ऑपरेशन स्वतः करू शकत नाही त्या प्रमाणे आपने सुद्धा आपले कोणतेच काम मार्गदर्शना शिवाय करू शकत नाही, संपूर्ण जग अनु रेणू यांनी भरलेले आहे आपल्याला जे हवे ते मागून घेतले नाही तर कधीच मिळणार नाही कारण अनेक अशुभ शक्ती तुमचे मार्ग रोखायला तयार असतात म्हणून भगवंत गुरुरुपात येऊन तुमचे दुःख हलके करू इच्छितो तेव्हा आपण त्यावर अविश्वास दाखवणे म्हणजे स्वतः हून नरका ची वाट धरण्या सारखे आहे. 

तुम्ही दिलेला उपाय करून पाहिलं पण काही झाले नाही असे बोल समोरचा जेव्हा बोलतो तेव्हा ते शब्द टोकदार वस्तू लागावी तसे वार करतात. 

आज अनेक स्वयं घोषित धर्म गुरु आपल्या आजूबाजूला आहेत प्रत्येक व्यक्ती एकसारखी नसते म्हणून प्रत्येकाला एकाच तराजूत मोजणे योग्य नाही. कुठल्याही गोष्टीची पारख केल्याशिवाय त्यात रमून जावू नये अन्यथा पदरी काही पडणार नाही. जिथे मूळ गुरुपरंपरा आहे तिथेच मस्तक टेकावे आणि नाथचरणी लिन व्हावे. 


Friday, 20 December 2019

मी नंदेशनाथ - ७

करोडो साधना,मंत्र आहेत (येथे करोड म्हणजे प्रकार नाही) इतक्या असंख्य साधना आपल्या गुरुमुखातून आपल्याला मिळतात पण त्यासाठी आपली पात्रता असायला हवी, म्हणजे भगवंत गुरुरुपात येऊन आपल्यास पूर्णत्वास नेतो. पण एक लक्षात ठेवायला हवय कि ह्या साधना फ़क़्त आर्थिक,भौतिक,सामाजिक,राजकीय सुख मिळण्यासाठीच कराव्या. प्रत्येक देवतेचे एक कार्य असते जसे,

धूमावती चे शारीरक व्याधी कमी करणे, भुवनेश्वरी चे ऐश्वर्य देणे, बगलामुखी चे शत्रुपिडा कमी करणे, काळभैरवांचे रक्षण करणे इत्यादी. पण हे सर्व फ़क़्त आपले आयुष्य असे पर्यंतच असणार आहे मृत्यू झाल्यानंतर फ़क़्त सोबत असणार आहे ते नामस्मरण.  

नाथपंथ मध्ये सर्वात आधी येतो तो गुरुमंत्र मग येतो बीज मंत्र (यालाच मोक्ष मंत्र म्हणतात) मग सुरु होतो तो परीक्षेचा काळ, प्रत्येक मंत्राचे २.५ कोटी संख्या पूर्ण झाली कि पुढचा मंत्र मिळतो, अशा पुढे मंत्राच्या पाच पायऱ्या आहेत. एक एक पायरी आपले आणि भगवंता मधील अंतर कमी करत जाते.

आपण २.५ कोटी मंत्र संख्या कधी पूर्ण होईल आणि पुढचा मंत्र कधी मिळेल हा विचार कधीच करू नये, शक्यतो त्या बाबतील नाथांकडे काहीही मागू नये कारण आपल्या नशिबात काय लिहिलंय हे आपले सतगुरू आणि नाथ हे सोडून कोणालाच माहित नसते.



There are crores of sadhana and mantras ( here crores doesn't mean the types of Sadhana). There are countless Sadhana which we  obtain or earn through Gurumukh ( meaning : any voice/command/mantra/sadhana directly from Guru's mouth) ;But we need to be capable enough for this fortunate opportunity , only then the universal life force comes in the form of Guru and takes us to the ultimate completeness.
In this journey we should keep in mind that these sadhanas should be done only for the financial , physical, social and political happiness.
Every deity has its own responsibility , For eg:

Goddess Dhumavati has the function to clean the disorders physically.
Goddess Baglamukhi has the function to reduce the pain caused from the enemy.,
Kalbhairav  to protect us., Etc.
All this is going to be there with us only till we live, after death the only thing we will have is to just recall our Gurumantra. 

In Natha Samraday the first step is the Guru Mantra. Then comes Beej Mantra ( it is also called the Moksha Mantra). Once you have earned Beej Mantra , then you start attending the tests . 
Every mantra has to complete 2.5crore only then you earn the next mantra. There are totally 5 steps like this.
Every step ahead reduces the distance between us and the ultimate power.

Never think about when will we complete this 2.5crore mantra and move forward. If possible , never ask for this  , neither to your Guru nor to Nath ji because  only they know whatever is written in our fate.

Thursday, 19 December 2019

मी नंदेशनाथ - ६

 
कोणतीही गोष्ट डोळ्यांनी पाहिल्यावर आपण त्यावर विश्वास ठेवतो पण नाण्याच्या दोन बाजू असतात, जे पाहिलंय तसच असेल आणि तेच खर हा समज अत्यंत चुकीचा आहे. छोटे छोटे अनुभव आपली श्रद्धा वाढवतात तीच श्रद्धा आपल्याला काहीतरी वगळे प्रयोग करण्यास भाग पाडते. अध्यात्मात साधना सेवा करताना वेगवेगळे प्रयोग केल्याने नाथ खुश होतात हे मी अनुभवल आहे.

विचार करा संपूर्ण ब्रम्हांडात फ़क़्त तुम्हीच निवडले गेले आपल्या आराध्याची सेवा करण्यासाठी कारण पूर्व जन्मात कलेले कर्म, आणि जर नाथांन कडून तुम्हाला काही वेगळी अपेक्षीत असेल तर त्या सर्व लोकांपेक्षा काहीतरी वेगळ करण्याची जिद्द आपली असली पाहिजेल. वेगळ करण्याच्या प्रयत्नात अघोरी प्रयोग कधीच करू नये, नाथ पंथ त्याला कधीच दुजोरा देत नाही.

अघोरी प्रयोग करणाऱ्यांचे मृत्यू कधीच चांगले होत नाही अतिशय कष्टदायक असतात. आपल्या जीवनाचा शेवट हा फ़क़्त आपण डोळे बंद करून बसावे आणि नाथांचा हात आपल्या समोर यावा त्यांनी आपल्याकडे स्मित हास्य करून पाहावे आणि आपल्याला म्हणावे तुझी जाण्याची वेळ आली आहे असे म्हणून घेऊन जावे इतका अल्हादायक, आनंददायक असावा.

मोक्ष पाहिजेल असे म्हणनार्यांची संख्या काही कमी नाही पण मोक्ष प्राप्ती पेक्षा आपल्या आराध्याची सेवा करण्यासाठी आपण त्याच्या दरबारात सेवक म्हणून जरी रुजू झालो तरी केलेल्या सेवेचे सार्थक झाल्यासारखे होईल.   

मी नंदेशनाथ - ५

मी हे करतो, मी ते करतो, इतके वर्ष झाली मी रोज नित्य नियमाने पूजा करतो आहे, देवावर माझा विश्वास आहे हे बोलून पण माझ्या समस्या संपत नाहीत अशा बोलणाऱ्या लोकांचा एक ग्रुप आपल्याकडे आहे. याला कारण एकच जेव्हा तुम्ही कोणतीही समस्या घेऊन कोणाकडे जातात तेव्हा तो व्यक्ती काही उपाय सांगतो, नंतर परत ओळखीचे, परिचयाचे यांच्या सांगण्यानुसार परत दुसऱ्या व्यक्ती कडे जातात आणि काहीतरी उपाय करतात, याने काय होत,

आपल्या आजूबाजूला सर्व स्पंदन आहे हे विज्ञानाला मान्य आहे, जेव्हा दोन स्पंदन (waves) एकमेकात मिसळतात तेव्हा दोन्ही नष्ट होऊ शकतात कीवा त्यातून वेगळ काहीतरी निर्माण होऊ शकत बरोबर हेच सर्वांच्या बाबतीत होत वेगवेगळे लोक वेगळ मार्गदर्शन आणि त्यामुळे सर्व एकत्र येत आणि निर्माण काही होत नाही म्हणजे काम होत नाही.

त्यामुळे आधी एक गोष्ट ठरवली पाहिजेल माझे आराध्य एकच कि काही झाल तरी मी त्यांचाच आणि ते माझे नाहीतर गेलो हनुमान मंदिरात परत दिसल देवीच मंदिर मग गेलो तिथे आस नको व्हायला.

"जाऊ देवाचिया गावा, देव देईल विसावा, करू सुखादुखाच्या गोष्टी" याप्रमाणे देवदर्शन नक्की करावे, तीर्थक्षेत्री जावे पण तिथली उर्जा अनुभवण्यासाठीच उगाच गाव जातंय म्हणून गेलो आस नको. प्रत्येक ठिकाणी सत्पुरुष्यांच्या, साधू-संतांच्या स्पर्शाने अनेक दैवी स्पंदन कार्यरत असतात आपण जाऊन फ़क़्त आपल्याला अनुभव येईल ते घ्यावे.

Wednesday, 18 December 2019

मी नंदेशनाथ - ४

साधू-संत 

खरे साधू कसे ओळखावे हा खरतर मोठा प्रश्न आहे? पण जो आतून शांत बाहेरून कठोर आहे ज्याची वाणी भगवंताचे नाम घेण्याखेरीस काहीही बोलत नाही तो खरा संत. आज पर्यंत खूप साधू संत पहिले पण त्यातले बोटावर मोजण्या इतकेच खरे निघाले, गिरनार चे पीर शेरनाथ बापू, पीर सोमनाथ बापू ह्यांना मी जवळून अनुभवल आहे काही विचारल तर जास्त बोलायचं नाही तेवढ्या पुरत बोलायचं जास्त हसायचं जो येईल त्याला हसून समोर जायचं, "नाम लेते राहो वो काम कर देगा" हे वाक्य जवळ जवळ ठरलेलेच.

माझे एक मित्र आहेत योगी दयानाथ किती शांत स्वभाव कितीतरी वेळेस फोन करून काम नाही झाल तरी रागावणार नाही चिडणार नाही, "फ़क़्त आपने जो सहयोग दिया उसके लिए धन्यवाद" इतकच बोलणार, खरच धन्यवाद त्या नाथांना ज्यांनी असे लोक या भूमीवर निर्माण केले कि ज्यांच्या नुसत्या सहवासाने किवा बोलण्याने मन शांती मिळते.

जे लोक पैसे देऊन काम करून देतो, गंडे, दोरे, तावीज देतो असे सांगतात आणि काम करतात अशाने लोकांचे प्रोब्लेम कधीच मूळ स्वरुपात नष्ट होऊ शकत नाही किंबहुना ते वाढतात. तुमच्या समस्या फ़क़्त तुम्हीच सोडवू शकतात, त्यासाठी फ़क़्त योग्य अधिकारी व्यक्तीच मदत तुम्हाला मिळायला हवी. कोणताही अधिकारी व्यक्ती तुम्हाला पैसे द्या काम करून देतो हे म्हणत नाही फ़क़्त आपले प्रारब्ध आपल्याला योग्य ठिकाणी पोहोचू देत नाही.

आपल्या देवतांन वर नसलेला विश्वास इतर धर्माच्या ठिकाणी जाऊन काम करून घेणे अतिशय चुकीची प्रथा आहे जीला आता संपवणे शक्य नाही. पण आपल्या पवित्र अशा सनातन धर्मात अनेक सत्पुरुष आहे ज्यांनी ठरवल तर ते समाजाला योग्य मार्गावर आणू शकतात आणि त्यांनी तस कराव हि त्यांना पण विनंती.

Tuesday, 17 December 2019

मी नंदेशनाथ - ३


लोक म्हणतात देव रागवत नाही,नाराज होत नाही. पण तुम्ही साधनेची एक पातळी पूर्ण केली कि प्रत्यक्ष नाथ तुमची काळजी करायला लागतात हा माझा अनुभव आहे. त्याने रागवाव आपण परत साधना सेवा करून त्याला आपलस कराव हा खेळ कधी संपायलाच नको आस नेहमी वाटत.

नाथांना फ़क़्त सेवा हवी आहे " सेवा करा मेवा खा " ह्या उक्ती प्रमाणे नाथ तुम्हाला सोन्यात लोळवल्या शिवाय राहणार नाही. पण नाथांवर रागावणारे कोणी असेल हे सांगितले तर कोणाचा विश्वास बसणार नाही, गादीवर सतगुरु मी व माझे गुरुबंधू आम्ही तिघे असताना मी प्रत्यक्ष माझ्या सतगुरूंना नाथांवर रागावताना पाहिले आहे. कोणतीही तमा, मागचा पुढचा विचार न करता ते फ़क़्त बोलत होते आणि नाथ याचा राग आज आपल्याला ऐकावा लागणार या प्रमाणे ऐकत होते.  तो अनुभव पुढील आयुष्यात कधीही नको हीच प्रार्थना मी नेहमी करेल. किती ते प्रेम, किती ती आपुलकी.

सेवेचे २ महत्वाचे नियम आहे १) नॉनव्हेज नको - कारण त्याने आपल्या रक्तात दोष निर्माण होतात जे मासं आपण भक्षण करतो त्याचेच गुण आपल्या शरीरात दिसायला लागतात २) मद्य प्राशन नको - त्याने बुद्धी भ्रष्ट होते आपण काय करतो आहे ते समजत नाही. हे दोन नियम जरी पाळले तरी तुम्ही नाथपंथाची दीक्षा घेऊ शकतात.  

मी नंदेशनाथ - २

नाथपंथ  हा  उलटा  पंथ  म्हणतात. " सब घर भटके तो नाथ घर अटके " हि म्हण तंतोतंत खर आहे. अनुभव
घेण्यासारखा आहे.

पंथाच्या निर्मिती बद्दल खूप समज-गैरसमज-कथा आहे. कोणत्याही गोष्टीच्या मुळाशी जाण्याची गरज तेव्हाच येते जेव्हा त्यातून काही उत्पन्न होत नाही पण इथे सर्वांच्या मुळाशी नाथपंथ आहे म्हणून तो शोध न लावलेलाच बरा. कोणी शोधला, कधी शोधला, का शोधला याचे उत्तर शोधण्या पेक्षा त्यातून आपल्याला काय मिळत आहे ते घेऊ.

नाथपंथा चे मुळ हे गुरु-शिष्य परंपरा आहे. जगात कोणतीही गोष्ट कोणीतरी सांगितल्या शिवाय आपण करू शकत नाही किवा कोणाचे मार्गदर्शनाखाली आपण ती गोष्ट लवकर करू शकतो. म्हणून कोणीही येऊन मी हे केल आस म्हणू नये म्हणून त्या परमपिता परमात्म्याला स्वतः जन्म घेऊन गुरु करावा लागला. पण त्यातही कमी नाही, जेव्हा मच्छीन्द्रनाथ स्त्री राज्यातून बाहेर आले त्या नंतर त्यांना योगमार्गाची दीक्षा देणारे गुरु गोरक्षनाथच होते.म्हणजे गुरु ला परत शिष्य करणारे फ़क़्त नाथच होते. 

गुरु प्राप्ती हि अनेक मार्गाने होते आपल्याला कधीही गुरु शोधावा लागत नाही, तो आपल्याला शोधतो. साधारण रुद्राचे १००० आवर्तन पूर्ण झाले कि गुरुची प्राप्ती होते. गुरु गायत्री मंत्राने सुद्धा गुरूंची प्राप्ती होऊ शकते. पूर्व जन्मातल्या संचीताने, आई-वडिलांच्या पुण्याईने आपल्याला गुरुची प्राप्ती होते. आपण ह्या जन्मात नाथांची सेवा करणार हे आधीच लिहिलेलं असेल बहुदा म्हणून आपल्याला जन्माला आल्यावर अनेक सिद्धी प्राप्त झालेल्या असतात.     


Friday, 13 December 2019

मी नंदेशनाथ -१



लिहिण्यासारखे खूप काही आहे पण सुरुवात कुठून करावी हा खूप मोठा प्रश्न मला पडला होता. शेवटी सुरुवात करण्याचे ठरवले साधारण दोन वर्षापूर्वी काका मला म्हणाले होते की तू लिहीत जा पण मी मूर्ख, अडाणी बाकीचं सारखं मला लिहिता तरी कुठे ये त पण तरी जमेल तस आता लिहितो.

 नाथपंथ हा एका दृष्टिकोनातून पहायला गेलो तर महाराष्ट्रात वेगळा आणि महाराष्ट्राबाहेर वेगळा असाच आहे कारण महाराष्ट्रातली जनता गोरक्षनाथ,माया मच्छिंद्रनाथ, रेवन नाथ, चरपट नाथ, वटसिद्ध नागनाथ, भर्तरीनाथ, मीननाथ जालिंदरनाथ ,कानिफनाथ, अडबंगनाथ अशा सर्व नाथांना मानतो तेच महाराष्ट्राबाहेर गोरक्षनाथ, संतोषनाथ, सत्यनाथ, आदिनाथ, यांना नाथ म्हणतात.

महाराष्ट्रात नाथांना  मानणारे  मध्ये अंगात येणे ह्या सर्व गोष्टींना मान्यता आहे म्हणजे अप्रत्यक्षरीत्या मान्यता आहे असे आपण म्हणू शकतो पण जे साधू संत.जपी,तपी संन्यासी आहे  त्यांच्या अंगात येण्याचे कधी दिसत नाही मग जे नाथ आहेत ते फ़क़्त संसारी करण्याऱ्या भक्तांमध्ये च येतात का ?


देवावर विश्वास नाही, अंगात येत नाही सर्व खोट आहे, कर्म महत्वाचे, मी देवाला मानतो पण मंदिरात गेल्यावर मागत काहीच नाही असे म्हणणारे खूप लोक समाजात असतात पण मग लग्न जमत नाही, दारिद्र आहे, संकट येतात तेव्हा हेच लोक मठात, मंदिरात, अधिकारी व्यक्तीकडे जातात. आता यात दोष कोणाचाच नाही फ़क़्त काय तर आज मला गरज आहे म्हणून मी बघतो आहे करून किवा नातेवाईक म्हणता आहेत एकदा करून बघ काय होतंय ते पाहू  --- आता यात दोष कोणाचाच नाही, ना त्या व्यक्तीचा , ना  नातेवाईकांचा , ना जो उपाय सांगतो आहे त्याचा. पण समाजात ह्या सर्वांची गरज आहे चांगले बोलणारे, तटस्थ असणारे, माहित असून न मानणारे, अजिबात न मानणारे.

आणि अजून एक  गमतीची गोष्ट अशी कि फ़क़्त नाथ , देवी , भैरव हेच  फ़क़्त अंगात येतात, मग बाकीचे जातात कुठे नक्की, ३३ कोटी(प्रकार) चे देवी देव  आहेतआपल्याकडे  त्यातील सूर्य, रूद्र  हे आलेले ऐकण्यात नाही कधी. आणी कोणीच यावर निर्भीड भाष्य करीत नाही, जे करायचा प्रयत्न करतात ते मग श्रद्धे वरच हाथ घालतात. करायचं तर अति करायचं नाहीतर मग सर्वच अंधश्रद्धा आहे असे म्हणायचे.


 

Thursday, 12 December 2019

गिरनार परिक्रमा


गिरनार परिक्रमा


 

स्वर्णाकर्षण भैरव स्तोत्र - (suvarna aakarshan bhairav)



स्वर्णाकर्षण भैरव स्तोत्र 


YOUTUBE LINK -



Google Play Store -


https://play.google.com/store/apps/details?id=info.androidhive.Gorakshsamruddhi&hl=en




मूल-मन्त्रः-   ॐ ऐं क्लां क्लीं क्लूं ह्रां ह्रीं ह्रूं सः वं आपदुद्धारणाय अजामल-बद्धाय लोकेश्वराय स्वर्णाकर्षण-भैरवाय मम दारिद्र्य-विद्वेषणाय श्रीं महा-भैरवाय नमः
 

स्वर्णाकर्षण भैरव स्तोत्र 
श्री स्वर्णाकर्षण भैरव स्तोत्र श्री मार्कण्डेय उवाच ।।   
भगवन् ! प्रमथाधीश ! शिव-तुल्य-पराक्रम !  
पूर्वमुक्तस्त्वया मन्त्रं, भैरवस्य महात्मनः ।।  
इदानीं श्रोतुमिच्छामि, तस्य स्तोत्रमनुत्तमं ।  
तत् केनोक्तं पुरा स्तोत्रं, पठनात्तस्य किं फलम् ।।                   
तत् सर्वं श्रोतुमिच्छामि, ब्रूहि मे नन्दिकेश्वर !।।
।। श्री नन्दिकेश्वर उवाच ।।
इदं ब्रह्मन् ! महा-भाग, लोकानामुपकारक !  
स्तोत्रं वटुक-नाथस्य, दुर्लभं भुवन-त्रये ।।
सर्व-पाप-प्रशमनं, सर्व-सम्पत्ति-दायकम् ।
दारिद्र्य-शमनं पुंसामापदा-भय-हारकम् ।।  
अष्टैश्वर्य-प्रदं नृणां, पराजय-विनाशनम् ।  
महा-कान्ति-प्रदं चैव, सोम-सौन्दर्य-दायकम् ।।  
महा-कीर्ति-प्रदं स्तोत्रं, भैरवस्य महात्मनः ।
न वक्तव्यं निराचारे, हि पुत्राय च सर्वथा ।।
शुचये गुरु-भक्ताय, शुचयेऽपि तपस्विने ।  
महा-भैरव-भक्ताय, सेविते निर्धनाय च ।।  
निज-भक्ताय वक्तव्यमन्यथा शापमाप्नुयात्   ।
स्तोत्रमेतत् भैरवस्य, ब्रह्म-विष्णु-शिवात्मनः ।।  
श्रृणुष्व ब्रूहितो ब्रह्मन् ! सर्व-काम-प्रदायकम्   

विनियोगः- ॐ अस्य श्रीस्वर्णाकर्षण-भैरव-स्तोत्रस्य ब्रह्मा ऋषिः, अनुष्टुप् छन्दः, श्रीस्वर्णाकर्षण-भैरव-देवता, ह्रीं बीजं, क्लीं शक्ति, सः कीलकम्, मम-सर्व-काम-सिद्धयर्थे पाठे विनियोगः ।
 
ध्यानः- 
 मन्दार-द्रुम-मूल-भाजि विजिते रत्नासने संस्थिते । दिव्यं चारुण-चञ्चुकाधर-रुचा देव्या कृतालिंगनः ।।
भक्तेभ्यः कर-रत्न-पात्र-भरितं स्वर्ण दधानो भृशम् ।
स्वर्णाकर्षण-भैरवो भवतु मे स्वर्गापवर्ग-प्रदः ।। 
स्तोत्र-पाठ ।।  ॐ नमस्तेऽस्तु भैरवाय, ब्रह्म-विष्णु-शिवात्मने, नमः त्रैलोक्य-वन्द्याय, वरदाय परात्मने ।।
रत्न-सिंहासनस्थाय, दिव्याभरण-शोभिने ।
नमस्तेऽनेक-हस्ताय, ह्यनेक-शिरसे नमः ।
नमस्तेऽनेक-नेत्राय, ह्यनेक-विभवे नमः ।।
नमस्तेऽनेक-कण्ठाय, ह्यनेकान्ताय ते नमः   ।
नमोस्त्वनेकैश्वर्याय, ह्यनेक-दिव्य-तेजसे ।।  
अनेकायुध-युक्ताय, ह्यनेक-सुर-सेविने ।
अनेक-गुण-युक्ताय, महा-देवाय ते नमः ।।
नमो दारिद्रय-कालाय, महा-सम्पत्-प्रदायिने ।
श्रीभैरवी-प्रयुक्ताय, त्रिलोकेशाय ते नमः ।।  
दिगम्बर ! नमस्तुभ्यं, दिगीशाय नमो नमः ।
नमोऽस्तु दैत्य-कालाय, पाप-कालाय ते नमः ।।  
सर्वज्ञाय नमस्तुभ्यं, नमस्ते दिव्य-चक्षुषे ।
अजिताय नमस्तुभ्यं, जितामित्राय ते नमः ।।
नमस्ते रुद्र-पुत्राय, गण-नाथाय ते नमः ।  
नमस्ते वीर-वीराय, महा-वीराय ते नमः ।।
नमोऽस्त्वनन्त-वीर्याय, महा-घोराय ते नमः ।
नमस्ते घोर-घोराय, विश्व-घोराय ते नमः ।।  
नमः उग्राय शान्ताय, भक्तेभ्यः शान्ति-दायिने ।  
गुरवे सर्व-लोकानां, नमः प्रणव-रुपिणे ।।  
नमस्ते वाग्-भवाख्याय, दीर्घ-कामाय ते नमः  ।
नमस्ते काम-राजाय, योषित्कामाय ते नमः ।।
दीर्घ-माया-स्वरुपाय, महा-माया-पते नमः ।
सृष्टि-माया-स्वरुपाय, विसर्गाय सम्यायिने ।।  
रुद्र-लोकेश-पूज्याय, ह्यापदुद्धारणाय च ।
नमोऽजामल-बद्धाय, सुवर्णाकर्षणाय ते ।।  
नमो नमो भैरवाय, महा-दारिद्रय-नाशिने ।
उन्मूलन-कर्मठाय, ह्यलक्ष्म्या सर्वदा नमः ।।  
नमो लोक-त्रेशाय, स्वानन्द-निहिताय ते ।
नमः श्रीबीज-रुपाय, सर्व-काम-प्रदायिने ।।  
नमो महा-भैरवाय, श्रीरुपाय नमो नमः ।
धनाध्यक्ष ! नमस्तुभ्यं, शरण्याय नमो नमः ।।
नमः प्रसन्न-रुपाय, ह्यादि-देवाय ते नमः ।
नमस्ते मन्त्र-रुपाय, नमस्ते रत्न-रुपिणे ।।  
नमस्ते स्वर्ण-रुपाय, सुवर्णाय नमो नमः ।
नमः सुवर्ण-वर्णाय, महा-पुण्याय ते नमः ।।
नमः शुद्धाय बुद्धाय, नमः संसार-तारिणे ।
नमो देवाय गुह्याय, प्रबलाय नमो नमः ।।
नमस्ते बल-रुपाय, परेषां बल-नाशिने ।
नमस्ते स्वर्ग-संस्थाय, नमो भूर्लोक-वासिने ।।  
नमः पाताल-वासाय, निराधाराय ते नमः ।  
नमो नमः स्वतन्त्राय, ह्यनन्ताय नमो नमः ।।
द्वि-भुजाय नमस्तुभ्यं, भुज-त्रय-सुशोभिने ।
नमोऽणिमादि-सिद्धाय, स्वर्ण-हस्ताय ते नमः ।
पूर्ण-चन्द्र-प्रतीकाश-वदनाम्भोज-शोभिने ।
नमस्ते स्वर्ण-रुपाय, स्वर्णालंकार-शोभिने ।।  
नमः स्वर्णाकर्षणाय, स्वर्णाभाय च ते नमः ।
नमस्ते स्वर्ण-कण्ठाय, स्वर्णालंकार-धारिणे ।।  
स्वर्ण-सिंहासनस्थाय, स्वर्ण-पादाय ते नमः ।
नमः स्वर्णाभ-पाराय, स्वर्ण-काञ्ची-सुशोभिने ।।
नमस्ते स्वर्ण-जंघाय, भक्त-काम-दुघात्मने ।
नमस्ते स्वर्ण-भक्तानां, कल्प-वृक्ष-स्वरुपिणे ।।  
चिन्तामणि-स्वरुपाय, नमो ब्रह्मादि-सेविने ।  
कल्पद्रुमाधः-संस्थाय, बहु-स्वर्ण-प्रदायिने ।।
भय-कालाय भक्तेभ्यः, सर्वाभीष्ट-प्रदायिने ।
नमो हेमादि-कर्षाय, भैरवाय नमो नमः ।।
स्तवेनानेन सन्तुष्टो, भव लोकेश-भैरव !  
पश्य मां करुणाविष्ट, शरणागत-वत्सल !  
श्रीभैरव धनाध्यक्ष, शरणं त्वां भजाम्यहम् ।
प्रसीद सकलान् कामान्, प्रयच्छ मम सर्वदा ।।   
।। फल-श्रुति ।।   
श्रीमहा-भैरवस्येदं, स्तोत्र सूक्तं सु-दुर्लभम् ।  
मन्त्रात्मकं महा-पुण्यं, सर्वैश्वर्य-प्रदायकम् ।।  
यः पठेन्नित्यमेकाग्रं, पातकैः स विमुच्यते ।
लभते चामला-लक्ष्मीमष्टैश्वर्यमवाप्नुयात् ।।
चिन्तामणिमवाप्नोति, धेनुं कल्पतरुं ध्रुवम् ।  
स्वर्ण-राशिमवाप्नोति, सिद्धिमेव स मानवः ।।  
संध्याय यः पठेत्स्तोत्र, दशावृत्त्या नरोत्तमैः ।
स्वप्ने श्रीभैरवस्तस्य, साक्षाद् भूतो जगद्-गुरुः ।
स्वर्ण-राशि ददात्येव, तत्क्षणान्नास्ति संशयः ।
सर्वदा यः पठेत् स्तोत्रं, भैरवस्य महात्मनः ।।  
लोक-त्रयं वशी कुर्यात्, अचलां श्रियं चाप्नुयात् ।
न भयं लभते क्वापि, विघ्न-भूतादि-सम्भव ।।
म्रियन्ते शत्रवोऽवश्यम लक्ष्मी-नाशमाप्नुयात् ।
अक्षयं लभते सौख्यं, सर्वदा मानवोत्तमः ।।  
अष्ट-पञ्चाशताणढ्यो, मन्त्र-राजः प्रकीर्तितः ।
दारिद्र्य-दुःख-शमनं, स्वर्णाकर्षण-कारकः ।।
य येन संजपेत् धीमान्, स्तोत्र वा प्रपठेत् सदा ।
महा-भैरव-सायुज्यं, स्वान्त-काले भवेद् ध्रुवं ।।

श्राद्ध न करनेसे हानि

अपने शास्त्रने श्राद्ध न करनेसे होनेवाली जो हानि बतायी है, उसे जानकर रोंगटे खड़े हो जाते हैं। अतः आद्ध-तत्त्वसे परिचित होना तथा उसके अनुष्ठा...